govind namdev sakal
Premier

एक चेन स्मोकर तर दुसरा... सुपरस्टार असूनही सेटवर कसे वागतात शाहरुख आणि सलमान? ऑनस्क्रीन बॉसने केली पोलखोल

Salman Khan Vs Shahrukh Khan: लोकप्रिय अभिनेते गोविंद नामदेव यांनी अभिनेता सलमान खान आणि अभिनेता शाहरुख खान याच्याबद्दल केलेलं वक्तव्य सध्या चर्चेत आहे.

Payal Naik

Govind Namdev: सलमान खान आणि शाहरुख खान ही बॉलिवूडमधील लोकप्रिय नावं आहेत. त्यांनी इंडस्ट्रीमध्ये स्वतःचं अढळ स्थान निर्माण केलं आहे. शाहरुख आणि सलमान कधीकाळी चांगले मित्र होते. मध्यंतरी त्यांच्यात अबोला आला होता मात्र तो कालांतराने दूर झाला. असं असलं तरी हे दोघेही सुपरस्टार आहेत आणि या दोघांचं सेटवरचं वागणं खूप वेगळं असतं. लोकप्रिय बॉलिवूड अभिनेते गोविंद नामदेव यांनी एका मुलाखतीत या दोन्ही कलाकारांची पोलखोल केली आहे. हे दोन्ही अभिनेते एकमेकांच्या अगदी विरुद्ध आहेत असं ते मुलाखतीत बोलताना म्हणाले.

गोविंद यांनी शाहरुखसोबत 'फिर भी दिल है हिंदुस्तानी' या चित्रपटात काम केलं होतं. बॉलिवूड बबल ला दिलेल्या मुलाखतीत गोविंद म्हणाले, 'मी आधी शाहरुखबद्दल ऐकलं होतं की तो खूप काम करतो. तो वर्कोहोलिक आहे. पण मी पूर्ण दिवस त्याच्यासोबत काम केलं. आम्ही पूर्ण दिवस काम केलं. मग रात्री तो सगळ्या टीमसोबत बोलला. सोबत जेवला. तो निर्माताही होता तर त्याने २ वाजेपर्यंत काम केलं. दुसऱ्या दिवशी सकाळी एका कार्यक्रमासाठी चेन्नईची फ्लाइट पकडून तो गेला आणि परत येऊन पुन्हा शूटिंग सुरू केलं. तो फक्त चार तास झोपायचा. त्याला सतत काम करायचं असतं.'

पुढे गोविंद म्हणाले, 'तो सतत सिगारेट ओढत असतो आणि काम करतो. सिगारेटचा धूर उडवत विचार करत असतो आणि काय काम करायचं बाकी आहे. त्याच्यात अजिबात नखरे किंवा अ‍ॅटीट्युड नाहीये. पण सलमान याच्या अगदी उलट आहे. तो जास्त बोलत नाही. फक्त आपल्या कामाशी काम ठेवतो. आमचं वैयक्तिक असं काही बोलणं नाही झालं. फक्त कधी कधी सांगायचा की वडील सलीम कसे कडक होते आणि काही चुकीचं केलं की कसा मार पडायचा. सलमान सेटवरही लेट यायचा.' गोविंद यांनी सलमानसोबत 'वॉन्टेड' चित्रपटात काम केलं होतं. गोविंद यांच्या कामाबद्दल सांगायचं तर ते विकी कौशल याच्या 'सॅम बहादूर' या चित्रपटात दिसले होते. त्यांनी वल्लभभाई पटेल यांची भूमिका साकारली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Will MS Dhoni Play IPL 2027? महेंद्रसिंग धोनी पुढच्या वर्षी पिवळ्या जर्सीत दिसेल का? ऋतुराज गायकवाडचं उत्तर, नेमकं काय म्हणाला?

IPL 2026 Playoff Scenario : चेन्नईचे आव्हान संपुष्टात! गुजरातची Qualifier 1 साठी दावेदारी; आता एका जागेसाठी चार संघांमध्ये स्पर्धा

Abhijeet Dipke: दिल्लीत पोहोचताच पोलीस तिहार जेलमध्ये टाकतील... ‘कॉकरोच जनता पार्टी’चे संस्थापक अभिजीत दीपकेंना भीती सतावतेय

Congress politics : ‘कॉक्रोच जनता पक्ष’ हा असंतोषाचा इशारा; काँग्रेसला नव्याने उभारी देण्याचे हर्षवर्धन सपकाळ यांचे आवाहन

NEET Paper Leak: नीट पेपरफुटी प्रकरणात लातूरचे बालरोगतज्ज्ञ डॉ. मनोज शिरुरे सीबीआय ताब्यात; मुलासाठी प्रश्नपत्रिका खरेदीचा आरोप

SCROLL FOR NEXT