Premier

Anant Radhika Wedding : लाडक्या मुलाच्या लग्नात निता अंबानी यांनी हातात धरलेल्या दिव्याचं काय आहे महत्त्व?

सकाळ डिजिटल टीम

आशियातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी आज राधिका मर्चंटसोबत विवाहबंधनात अडकले आहेत. गेल्या काही दिवसांपासून या लग्नाची जोरदार चर्चा सुरु होती. अनेक विधींनी हा शाही विवासोहळा पार पडला. अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा विवाह पारंपारिक वैदिक हिंदू रितीरिवाजांनुसार पडला असला तरी दोघेही गुजराती कुटुंबातील आहेत, त्यामुळे त्यांच्या लग्नात फक्त गुजराती विधी पाहायला मिळाल्या.

यामुळेच अनंत राधिकाच्या लग्नाची सुरुवात मामेरू विधीने झाली. अनंत यांच्या लग्नावेळी आई नीता अंबानी आणि वडील मुकेश अंबानी प्रत्येक विधी आणि प्रथेची पूर्ण काळजी घेताना दिसले. नीता अंबानी आणि मुकेश अंबानी दोघेही धर्म आणि परंपरांचे अनुयायी आहेत.

लाडक्या मुलाच्या विवाहित जीवनात आनंद राहावा आणि कुटुंब आनंदी राहावे यासाठी प्रत्येक परंपरा आणि विधी ते पाळत असतात. आजही त्या त्यांची परंपरा पाळताना दिसल्या.

आज लग्नात निता अंबानी यांच्या हातात एक दिवा होता. त्याला गुजराती भाषेत रमण दिवो असं म्हटलं जातं. रमण दिवो हा दिवा आहे, या दिव्याशी श्रद्धेची मोठी परंपरा आहे. हा दिवा शुभ आणि समृद्धीचे प्रतीक आहे. या दिव्याची रचनासुद्धा युनिक आहे. स्वस्तिक आणि गणपतीची मूर्ती कोरलेली या दिव्यावर दिसत आहे.

गुजराती समाजात, लग्नाच्या निमित्ताने वराची आई हातात रमण दिवो धरते आणि आपल्या मुलाच्या वैवाहिक जीवनाच्या यशासाठी शुभेच्छा देते. हा दिवा वरापासून नकारात्मक ऊर्जा देखील दूर ठेवतो आणि लग्नाच्या यशासाठी गणेशाचा आशीर्वाद देतो.

रमण दिवो हा देखील मंगलदीपचा एक प्रकार आहे जो गुजराती समाजात केवळ विवाह विधींमध्येच वापरला जात नाही तर कोणत्याही शुभ कार्यातही वापरला जातो.

मुलाचा जन्म झाल्यावर घरात रमण दिवाही लावला जातो. विशेष पूजा विधी दरम्यान आणि दिवाळीच्या निमित्ताने, घरामध्ये सुख, शांती आणि समृद्धीसाठी रमण दिवाळी प्रज्वलित केली जाते. रमन दिवो हे वास्तू दोष दूर करण्याचेही काम करते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Home Loan EMI: महिन्याला ३.५ लाख पगार, तरीही १.७ कोटींचं घर घेतलं नाही! EMI पाहून कपलने का घेतला मोठा निर्णय?

IND vs SL 2nd Test: श्रीलंकेने दुसऱ्या कसोटीसाठी जाहीर केला १४ सदस्यीय संघ; दुखापतीचा फटका, तरी मालिका बरोबरीत सोडवण्यासाठी मजबूत मोर्चेबांधणी

Mumbai News: जमीन योग्य प्रक्रियेविना वापरू नका, धोबीघाटाच्या पुनर्विकासावरुन न्यायालयाने महापालिकेला सुनावले

Marathi News Live Updates : जयपूरमध्ये आशुतोष रांका यांच्यावर हल्ला; ‘भाजपच्या गुंडांकडून सीजेपी कार्यकर्त्यांना मारहाण’ - अभिजीत दिपके यांचा आरोप

Viral News : खेळता खेळता ५ वर्षांच्या मुलीने गिळलं ५० ग्रॅम सोनं; डॉक्टरांनी असं काढलं बाहेर!

SCROLL FOR NEXT