riteish deshmukh esakal
Premier

Riteish Deshmukh Fees: 'बिग बॉस मराठीसाठी रितेश देशमुख किती घेतोय फी? वाचा प्रत्येक भागाचं मानधन

Riteish Deshmukh Fees For Bigg Boss Marathi Season 5: लोकप्रिय अभिनेता रितेश देशमुख हा 'बिग बॉस मराठी ५'चं सूत्रसंचालन करताना दिसतोय. त्यासाठी त्याने किती मानधन घेतलंय ठाऊक आहे का?

Payal Naik

Riteish Deshmukh Fees: 'बिग बॉस मराठी ४' प्रेक्षकांच्या भेटीला येऊन दोन वर्ष उलटून गेली. त्यानंतर प्रेक्षक 'बिग बॉस मराठी ५' ची आतुरतेने वाट पाहत होते. आता २८ जुलै २०२४ पासून बिग बॉस मराठीचा सीझन ५ प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या सीझनमध्ये अनेक बदल पाहायला मिळत आहेत. या सिझनचा ग्रँड प्रीमिअर नुकताच पार पडला. या सीझनमध्ये कार्यक्रमाचा सूत्रसंचालक बदलण्यात आला. यापूर्वीचे चार सीझन महेश मांजरेकर हा कार्यक्रम होस्ट करत होते. मात्र त्यांनी कार्यक्रमाचा निरोप घेतला आणि त्यांची जागा आता अभिनेता रितेश देशमुख त्यांच्या जागी ही जबाबदारी सांभाळताना दिसतोय. मात्र या सीझनच्या सूत्रसंचालनासाठी रितेशने किती मानधन घेतलंय तुम्हाला ठाऊक आहे का?

'बिग बॉस मराठी ५' दररोज रात्री ९ वाजता कलर्स मराठीवर प्रक्षेपित करण्यात येतं. यावेळेस बिग बॉसच्या घरात अनेक क्षेत्रातील व्यक्ती आले आहेत. कीर्तनकारांपासून ते कन्टेन्ट क्रिएटर्सपर्यंत अनेक व्यक्ती बिग बॉसच्या घरात पाहायला मिळत आहेत. घरातील टास्क पाहण्यासाठी आता चाहते उत्सुक आहेत. अशात रितेश देशमुख आता कसं सूत्रसंचालन करणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. अशातच आता त्याच्या मानधनाच्या बाबतीतही अनेक चर्चा सुरू आहेत.

प्रत्येक एपिसोडसाठीचं मानधन

फिल्मीबीटने दिलेल्या माहितीनुसार, 'बिग बॉस मराठी ४' चे होस्ट महेश मांजरेकर हे सूत्रसंचालनासाठी प्रति एपिसोड 25 लाख रुपये घेत होते. आता हा शो दोन वर्षांनंतर पुन्हा सुरू झाला आहे. आता रितेश प्रत्येक एपिसोडसाठी 25 लाखांपेक्षा जास्त पैसे आकारण्याची शक्यता आहे. तो प्रत्येक एपिसोडसाठी सुमारे 30 ते 40 लाख रुपये मानधन घेत असल्याचं बोललं जातंय. त्यामुळे त्याचं एकूण मानधन दोन ते अडीच कोटींच्या आसपास आहे. तर रितेश एका चित्रपटासाठी सुमारे ७ ते ८ कोटींचं मानधन घेतो.

या सीझनमध्ये अभिजीत सावंत, निक्की तांबोळी, अरबाज पटेल, वैभव चव्हाण, आर्या जाधव, वर्षा उसगावकर हे कलाकार दिसत आहेत. तर यावेळेस घरात चक्रव्यूहही थीम आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : लाडकी बहिण योजना बंद होणार? 'या' बड्या नेत्याच्या दाव्याने महिलांमध्ये खळबळ

तुझे न्यूड फोटो पाठवशील का? अक्षय कुमारच्या १२ वर्षाच्या मुलीला आला घाणेरडा मेसेज; अभिनेत्याने सांगितलं नेमकं काय घडलं

Cough Syrup Deaths : 'कफ सिरप'ने घेतला 12 बालकांचा जीव, पाच मुले गंभीर; औषधात आढळला विषारी घटक, नागपूर प्रयोगशाळेत झाली महत्त्वाची चाचणी

Mumbai Political News : नवी मुंबईत भाजपचाच महापौर, कार्यकर्त्यांचा मान राखला जात नसेल तर युती होऊ नये : गणेश नाईक

ICC Women's World Cup : पाकिस्तानच्या पराभवाने टीम इंडियाची डोकेदुखी वाढवली! आता एक चूक हरमनप्रीत कौरच्या संघाला पडू शकते महागात

SCROLL FOR NEXT