Karisma Lovestory Esakal
Premier

Karisma Kapoor : म्हणून, करिश्माने मोडला अभिषेकबरोबरचा साखरपुडा ; आईने केलेली मागणी होती चर्चेत

Karisma broke engagement with Abhishek Bachchan : बॉलिवूडमधील एकेकाळची आघाडीची अभिनेत्री करिष्मा कपूर आणि अभिषेक बच्चन ही जोडी चर्चेत होती पण काही कारणांमुळे त्यांचा साखरपुडा मोडला. नेमकं काय घडलं जाणून घेऊया.

सकाळ डिजिटल टीम

Karisma : जेव्हा बॉलिवूड अभिनेत्रींना एका साचेबद्द भूमिका साकाराव्या लागत होत्या त्यावेळी एका अभिनेत्रीने बोल्ड भूमिका साकारत सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं. ही अभिनेत्री आहे करिश्मा. एकेकाळी बॉलिवूड गाजवणाऱ्या करिश्माचा आज वाढदिवस आहे.

करिश्मा एकेकाळी बिग बी अमिताभ बच्चन यांची सून होणार होती. पण काही कारणामुळे हे लग्न मोडलं. नेमकं काय होतं कारण जाणून घेऊया.

आईने केलेलं कष्ट आणि करिश्माने बनवलेली ओळख

रणधीर कपूर आणि बबिता कपूर यांच्या पोटी करिश्माचा जन्म झाला. पण काही काळानंतर बबिता रणधीर यांच्यापासून वेगळं राहू लागल्या. त्यामुळे दोन्ही मुलींना बबिता एकटीने वाढवत होत्या. एक काळ असा आला कि महिन्याचा खर्च चालवण्यासाठी बबिता यांना त्यांचे दागिने विकावे लागले. त्यामुळे फार कमी वयात आईला मदत करण्यासाठी करिश्माने बॉलिवूडमध्ये प्रवेश केला आणि अल्पावधीतच ती बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री बनली.

चर्चेत राहिलेलं वैयक्तिक आयुष्य

प्रोफेशनल लाईफमध्ये जरी करिश्मा यशस्वी असली तरीही तिचं वैयक्तिक आयुष्य कायमच वादग्रस्त राहिलं. करिश्माचं पहिलं गाजलेलं रिलेशनशिप म्हणजे अभिनेता अजय देवगणबरोबर. या दोघांनी सुहाग आणि जिगर सिनेमात काम केलं होतं. पण त्यावेळी अजय रविनालाही डेट करत होता त्यानंतर ती काही काळ अक्षय खन्नाबरोबरही रिलेशनशिप मध्ये होती. या रिलेशनमुळे रणधीर कपूर खुश होते पण बबिता यांचा या लग्नाला विरोध होता. त्यामुळे त्यांचं ब्रेकअप झालं.

अभिषेकशी ठरलेलं लग्न मोडलं

अक्षयबरोबर ब्रेकअप झाल्यानंतर करिश्माची भेट झाली अभिषेक बच्चनबरोबर. अभिषेक आणि करिश्मा एकमेकांच्या प्रेमात पडले. त्यानंतर करिश्माचे काका ऋषी यांनी पुढाकार घेत करिश्मा आणि अभिषेकचं लग्न ठरवलं. पाच वर्षं ते दोघेही एकमेकांना डेट करत होते. त्यानंतर जया बच्चन यांनी करिश्मा आणि अभिषेकचं लग्न ठरल्याची बातमी जाहीर केली पण नंतर वर्षभरातच त्यांचं लग्न मोडल्याची बातमी समोर आली. त्याच कारण त्यांनी जाहीर केलं नाही पण सूत्रांच्या माहितीनुसार, बबिता यांच्यामुळे हे लग्न मोडल्याचं म्हंटल जातं. लग्न करण्यापूर्वी बबिता यांनी अमिताभ यांच्याकडे प्रीनअप करण्याची मागणी केली होती आणि यानुसार अमिताभ यांनी काही प्रॉपर्टी आधीच अभिषेकच्या नावावर करावी असं त्यांचं म्हणणं होतं. ही गोष्ट अमिताभ आणि जया यांना आवडलं नाही त्यामुळे त्यांनी हे लग्न मोडलं.

यानंतर करिश्माने संजय कपूर बरोबर लग्न केलं पण सात वर्षांनी त्यांचा घटस्फोट झाला. करिश्माला कियान आणि समायरा ही दोन मुलं आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Yashasvi Jaiswal: मला एक दिवस कॅप्टन व्हायचंय! जैस्वालची 'मन की बात'; शुभमन गिलसमोर उभा राहिला स्पर्धक

Prashant Kishor Statement : बिहार निवडणुकीच्या तारखांच्या घोषणेनंतर, आता प्रशांत किशोर यांनी केलं मोठं विधान, म्हणाले...

PM Modi Calls Chief Justice Gavai: सरन्याधीश गवईंना पंतप्रधान मोदींचा फोन; सर्वोच्च न्यायालयातील 'त्या' घटनेची घेतली गंभीर दखल!

तयारीला लागा! सोलापूर जिल्ह्यातील १७ पैकी ‘या’ १३ नगरपरिषदांमध्ये महिला होणार नगराध्यक्षा; नगरसेवकांच्या आरक्षणाची बुधवारी सोडत

Pune News : आमदार बापू पठारे यांना धक्काबुक्कीप्रकरणी २० जणांवर गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT