Sanjay Dutt & Saira Banu Esakal
Premier

Sanjay Dutt Proposed Saira Banu : जेव्हा संजय दत्तने सायरा बानो यांना घातली लग्नाची मागणी ; अभिनेत्री म्हणाल्या,"शर्मिला आणि मी..."

Saira Banu shared actor Sanjay Dutt's funny memory : ज्येष्ठ अभिनेत्री सायरा बानू यांनी अभिनेता संजय दत्तची एक खास आठवण सोशल मीडियावर शेअर केली. संजयने त्यांना कसं प्रपोज केलं याचा किस्सा त्यांनी शेअर केला.

सकाळ डिजिटल टीम

Sanjay Dutt : अभिनेता संजय दत्तने बॉलिवूडमध्ये स्वतःचं एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. त्याच्या विनोदी भूमिका असो वा गंभीर , स्वतःचं अनोख्या शैलीने प्रत्येक भूमिका साकारत त्याने प्रेक्षकांची मनं जिंकली. आता उत्तम अभिनेता असलेला संजय लहानपणी खूप खोडकर होता. दिलीप कुमार यांच्या पत्नी आणि ज्येष्ठ अभिनेत्री सायरा बानू यांनी संजयचा एक खास किस्सा सोशल मीडियावर शेअर केला.

सायरा बानू यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली. त्यात त्यांनी संजय याच्या लहानपणीच किस्सा शेअर केला. त्यात त्या म्हणतात कि,"मला अजूनही आठवत नर्गिस आपा जेव्हा कधी आमच्या घरी कोणत्याही कार्यक्रमासाठी यायच्या तेव्हा त्या लहानग्या गोंडस संजयला घेऊन यायच्या. तेव्हा नर्गिस जी माझ्यासमोर त्याला विचारायच्या कि,'चल तू सायराजींना सांग तू मला दररोज काय सांगतोस ते ? ' तेव्हा संजय माझ्याकडे बघून त्याच्या गोड आवाजात म्हणायचं कि,'मी शैला बानूशी लग्न करणार.' मला वाटतं शर्मिला टागोर आणि मी त्याच्या सगळ्यात आवडत्या होतो." सायरा यांनी हा किस्सा शेअर करताना संजयच्या व्यक्तिमत्त्वाचं कौतुकही केलं.

त्या म्हणाल्या कि,"संजय नेहमीच आमच्यासाठी कायमच कुटूंबासारखा राहिला आहे. माझं संपूर्ण कुटुंब – अम्माजींपासून ते आपाजी आणि साहेबांपर्यंत… तो अगदी लहानगा मुलगा असल्यापासून ते तो स्टार होण्यापर्यंतचा प्रवास आम्ही पहिला आहे. आम्ही सगळेचजण त्याच्या प्रवासाचा भाग राहिलो आहोत आणि याचा मला अभिमान आहे."

Saira Banu instagram story

सायरा यांनी ही पोस्ट संजय दत्तच्या वाढदिवसानिमित्त लिहिली होती. काल २९ जुलैला त्याचा वाढदिवस होता. यानिमित्त त्यांनी त्याचा हा बालपणीचा किस्सा शेअर केला. संजय दत्त लवकरच 'केडी- द डेव्हिल' या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol-Diesel Rate: मोदींच्या इंधन बचतीच्या आवाहनानंतर पेट्रोल-डिझेलचे नवे दर किती?

पंतप्रधान मोदी ६ दिवस युरोप दौऱ्यावर; UAE, इटलीसह ५ देशांना देणार भेट

Satej Patil Vinay Kore Gokul politics : विनय कोरेंनी सतेज पाटलांची गोकुळमधील साथ सोडली; महायुतीचे पॅनेल करण्यावर भूमिका स्पष्ट

Latest Marathi News Live Update : लाडक्या बहिणींना मार्च आणि एप्रिलचे ३ हजार याच आठवड्यात मिळण्याची शक्यता

Pimpalgaon Joga Canal: पिंपळगाव जोगा कालवा फुटला; लाखो लिटर पाणी वाया, २५ एकर शेतीचे मोठे नुकसान, जुन्नरमध्ये कालवा फुटीचा थरार..

SCROLL FOR NEXT