Sharad Pawar And Tatya Vinchu  Esakal
Premier

Sharad Pawar : 'आणि तात्या विंचू पोहोचला लंडनला '; 'झपाटलेला' सिनेमा आणि शरद पवार यांचं खास कनेक्शन

When Sharad Pawar helps Mahesh Kothare for movie : अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक महेश कोठारे यांनी 'झपाटलेला' सिनेमाचा खास किस्सा नुकताच शेअर केला.

सकाळ डिजिटल टीम

Mahesh Kothare : मराठी इंडस्ट्रीतील नावाजलेले दिग्दर्शक महेश कोठारे यांनी आजवर अनेक भन्नाट सिनेमे मराठी इंडस्ट्रीला दिले. अक्शन आणि कॉमेडी यांनी पुरेपूर असलेल्या त्यांच्या सिनेमांनी प्रेक्षकांचं चांगलंच मनोरंजन केलं. त्यांचा एक गाजलेला सिनेमा म्हणजे 'झपाटलेला.' या सिनेमातील तात्या विंचू आणि लक्ष्या ही पात्र चांगलीच गाजली. हा सिनेमा लंडनला कसा प्रदर्शित झाला याचा खास किस्सा नुकताच शेअर केला.

शरद पवार यांनी केली मदत

लोकमत फिल्मीला दिलेल्या मुलाखतीमध्ये महेश कोठारे यांनी या सिनेमाविषयी खास किस्सा शेअर केला. या मुलाखतीमध्ये ते म्हणाले कि,"जेव्हा माझा चित्रपट ‘झपाटलेला’ रिलीज झाला तेव्हा माझी अशी इच्छा होती की, मराठीतला पहिला चित्रपट परदेशात प्रदर्शित करायचा. कारण, चित्रपट गाजला होता आणि लोकांनाही खूप आवडला होता. तर मला असं वाटलं हा चित्रपट आपण लंडनमध्ये प्रदर्शित करूया. लंडनमध्ये बऱ्यापैकी मराठी प्रेक्षक आहेत. त्यामुळे आम्ही मग लंडनला गेलो. आमचं सगळं कुटुंब गेलं होतं. आम्ही फिरायला म्हणून गेलो होतो. तेव्हा म्हटलं, आपल्याला तिकडे प्रिमियर करता येतो का? बघू या.

माझा सख्खा चुलत भाऊ लंडनमध्ये राहत होता. आता तो हयात नाहीये. मधूकर कोठारे असं त्याचं नाव. तेव्हा लंडनमध्ये तो बराच प्रसिद्ध होता. त्याची पत्नी शिला कोठारे. त्यावेळेला लंडनचं मराठी महामंडळ होतं त्याची शिला वहिनी अध्यक्ष का सेक्रेटरी होती. लंडनला गेल्यानंतर त्यांच्याजवळ मी माझी इच्छा व्यक्त केली. ती म्हणाली, येस, कल्पना मस्त आहे. मी प्लॅनिंग करते. आपण प्रीमियर इथे करायचा. तिनं तिथल्या सगळ्या मराठी लोकांना याबाबत सांगितलं. पत्रक, वेबसाईट, ई-मेल या माध्यमातून तिनं सगळ्यांना कळवलं. तो शो हाऊसफुल्ल झाला. आम्ही १३ फेब्रुवारी १९९४ साली हा प्रीमियर केला होता. पण त्यावेळेला आम्ही सगळे परत आलो होतो. त्यामुळे प्रीमियरसाठी पुन्हा लंडनला जायला लागलं होतं.

माझ्या चुलत बहिणीचा नवरा आहे जो माझा चांगला मित्र होता. त्याची शरद पवारांबरोबर चांगली ओळख होती. माझी पण ओळख होती. पण त्याची अधिक चांगली ओळख होती. मग तो मला शरद पवारांकडे घेऊन गेला. तेव्हा शरद पवार इतके बिझी होते ना. त्यावेळेस ते नुकतेच मुख्यमंत्री झाले होते. तसंच यावेळेला बॉम्बस्फोट झाले होते, बॉम्बस्फोटानंतर त्यांना मुख्यमंत्री म्हणून आणलं होतं. तेव्हा त्यांच्याकडे खूप काम होती. सतत भेटीगाठी सुरू होत्या. मला त्यांनी कसाबसा वेळ दिला होता. त्यांनी मला लगेच आतमध्ये बोलावलं. मला वेळ नाहीये, लवकर आतमध्ये या, काय आहे सांग लवकर. मी म्हटलं, असं असं आहे वगैरे. आटकेपार झेंडा वगैरे शब्द वापरले. म्हटलं लंडनला पुन्हा जायचं आहे तर माझ्याकडे तेवढा फंड नाहीये. ते म्हणाले, ओके तू आता जा. मला आता वेळ नाहीये वगैरे. त्यामुळे मला वाटलं आता काही होणार नाही. पण दोन दिवसांत मुख्यमंत्र्यांच्या ऑफिसमधून फोन आला तुमचा चेक तयार आहे घेऊन जा. मी लगेच म्हटलं तयारीला लागा, तिकिट काढा, मी चाललो. यावेळी मी एक जाहिरात दिली होती. माननीय मुख्यमंत्री शरद पवार यांच्या आशीर्वादाने तात्या विंचू निघाला लंडनला"

महेश कोठारे यांचं निर्मिती आणि दिग्दर्शन असलेला 'झपाटलेला' हा सिनेमा चांगलाच गाजला. या सिनेमात लक्ष्मीकांत बेर्डे यांची मुख्य भूमिका होती तर यातील तात्या विंचूचा बाहुला खूप गाजला होता. आता महेश कोठारे लवकरच 'झपाटलेला ३' घेऊन प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

निवडणूक आयोगाविरोधात इंडिया आघाडी आक्रमक, राहुल गांधींसह ११ नेत्यांनी दाखल केली याचिका, सुनावणी कधी?

Laptop Mobile Cleaning Tips: मोबाईल बाथरूमपासून बेडरूमपर्यंत कुठेही नेता? मग जंतूंचा संपर्क कमी करण्यासाठी स्वच्छतेच्या 'या' टिप्स वापराच

Latest Marathi News Live Update : राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे अजूनही सर्वोच्च न्यायालयात, इंडिया आघाडीचे नेतेही उपस्थित

रेल्वे प्रवासात प्रवाशांची घुसमट, अपुऱ्या सुविधांमुळे दररोज गर्दीशी सामना; अतिरिक्त लोकलची मागणी

मायकल जॅक्सनला टिळा लावून स्वागत करणारी एकमेव अभिनेत्री; कसा होता तो अनुभव? सोनाली बेंद्रे म्हणाली- मी कधीच.

SCROLL FOR NEXT