Sonu Nigam Old Video Goes Viral eSakal
Premier

Sonu Nigam Birthday: जेव्हा सोनू निगमने घेतलं होतं रस्त्यावर राहणाऱ्या संगीतकाराचं रूप ; व्हिडीओ आला पुन्हा चर्चेत

Sonu Nigam Old Video Goes Viral: गायक सोनू निगमचा एक जुना व्हिडीओ पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. सोनूने काही वर्षांपूर्वी रस्त्यावर राहणाऱ्या संगीतकाराचं रूप घेतलं होतं.

सकाळ डिजिटल टीम

बॉलिवूडमधील आघाडीचा गायक सोनू निगमने त्याच्या सुरेल आवाजाने अनेकांची मनं जिंकली आहेत. उत्तम गायकी आणि सुरांवर कमालीची पकड असलेल्या या गायकाचा आज ३० जुलैला वाढदिवस असून त्याने वयाची ५१ वर्षं पूर्ण केली होती. पण तुम्हाला माहितीये का ? बऱ्याच वर्षांपूर्वी सोनुने एका भिकाऱ्याचा वेष घेऊन रस्त्यावर गाणी गात सगळ्यांची मनं जिंकली होती. काय आहे हा किस्सा जाणून घेऊया.

२०१६ या वर्षातील सोनूचा एक व्हिडीओ सध्या पुन्हा सोशल मीडियावर चर्चेत आला आहे. सोनुने त्यावेळी एका रस्त्यावर राहणाऱ्या भिकाऱ्याच्या वेष घेतला होता. खोटी दाढी, डोळ्याला गॉगल आणि घाणेरडे कपडे असा वेष करून तो रस्त्यात बसला होता आणि हार्मोनियम वाजवत त्याने त्याचीच काही गाणी सादर केली होती. त्यावेळी हा व्हिडीओ बराच गाजला होता.

त्याने त्याची गायलेली गाजलेली गाणी आणि कल हो ना होचं गाणं बरंच चर्चेत राहिलं होतं. रोडसाइड उस्ताद असं नाव देत हा व्हिडीओ त्यावेळी सोशल मीडियावर शेअर करण्यात आला होता. कल्चर मशिनच्या डिजिटल चॅनल बीइंग इंडियन या कार्यक्रमातंर्गत ही गोष्ट सोनुने केली होती.  एका गरीब वृद्धाच्या गाण्यावर पादचाऱ्यांची काय प्रतिक्रिया असेल हे पाहण्यासाठी हा प्रयोग करण्यात आला होता.

या शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये, प्रवासी संगीतकाराच्या भावपूर्ण आवाजाने मंत्रमुग्ध होऊन ऐकण्यासाठी थांबताना दिसत आहेत. जसजशी गर्दी वाढत गेली तसा उत्तम प्रतिसाद या संगीतकाराला मिळाला. काही वेळातच लोक त्याला पैसे देऊ लागले आणि कौतुकाचा वर्षाव करू लागले. एक व्यक्ती फोनवर त्याचा आवाज रेकॉर्ड करू शकतो का असं विचारतानाही दिसली. संगीत सर्वांना कसं एकत्र आणतं आणि त्याला कोणत्याही सीमा नसतात याचं प्रतिबिंब या प्रयोगात पाहायला मिळालं.

या व्हिडिओमध्ये सोनुने हा वेष धारण करण्यासाठी केलेला मेकअप आणि त्यासाठी घेतलेली मेहनतही दिसून येत आहे. "मी कोणत्याही अपेक्षेशिवाय तिथे गेलो होतो. पहिल्यांदाच मी स्वतःलाही ओळखू शकत नव्हतो. माझा मेकअप इतका उत्तम होता कि लोक मला जवळ बसूनही ओळखू शकत नव्हते. मला मिळालेलं इतकं प्रेम पाहून मला खूपच नम्र वाटत आहे."

सोनूने त्याचा वाढदिवस त्याचा परिवार आणि कुटूंबाबरोबर साजरा केला. गेला बराच काळ त्याचं कोणतंही नवीन गाणं प्रेक्षकांच्या भेटीस आलं नाहीये. त्यामुळे प्रेक्षक त्याच्या नवीन गाण्याची वाट पाहत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Delhi Pollution Master Plan : दिल्लीत ५० टक्के कर्मचाऱ्यांना 'WFH' अनिवार्य, पार्किंग शुल्कातही दुप्पट वाढ; प्रदूषण नियंत्रणासाठी नवे धोरण लागू

Pune Highway Upgrade: घोडेगाव–मंचर–बेल्हे महामार्ग विकासाला ४७० कोटींचा मुबलक निधी; भीमाशंकर प्रवास २० किमीने कमी, भाविकांना मोठा दिलासा

Parbhani News: घरी परतताना काळाचा घाला! जिंतूरमध्ये पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या शेतकरी महिलेचा दुसऱ्या दिवशी मृतदेह सापडला

Nanded Accident: परभणीच्या कुटुंबावर काळाचा घाला! नांदेडमध्ये अपघातात कुटुंबप्रमुखाचा मृत्यू, पत्नी व दोन मुले गंभीर

Food Adulteration Crackdown: अन्न भेसळ पथकाच्या धास्तीने टाकळी राजेरायमध्ये सर्व दुकाने बंद; गुटखा व भेसळयुक्त सुट्या तेलाच्या खुलेआम विक्रीचा पर्दाफाश

SCROLL FOR NEXT