Kangana Ranaut slapgate Esakal
Premier

Kangana Ranaut slapgate: कंगनाला कानशिलात लगावणारी CISF जवान कुलविंदर कौर कोण? कसा आहे आधीचा रेकॉर्ड

Kangana Ranaut slapgate: ज्या CISF जवानांवर कंगनावर कानशिलात लगावल्याचा आरोप आहे. कुलविंदर कौर असे तिचे नाव आहे. 35 वर्षीय कुलविंदर 15 वर्षांपासून सीआयएसएफमध्ये कार्यरत आहे आणि त्याचा आतापर्यंतचा रेकॉर्ड निष्कलंक आहे. आत्तापर्यंत ती तिची जबाबदारी चोख पार पाडत आहे. तिचा नवराही सीआयएसएफचा जवान आहे. कुलविंदर ही पंजाबमधील कपूरथला येथील रहिवासी आहे.

अंकिता खाणे (Ankita Khane)

Kangana Ranaut slapgate: चंदीगड विमानतळावर बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणौतसोबत झालेल्या गैरवर्तनामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. मंडीच्या खासदार कंगना राणौत गुरुवारी दिल्लीला जाण्यासाठी चंदीगड विमानतळावर पोहोचली होती. येथील सुरक्षा तपासणीनंतर एका महिला सीआयएसएफ जवानाने तिच्या कानशिलात लगावल्याचे समोर आले आहे. या घटनेने खळबळ उडाली. सीआयएसएफच्या महिला कर्मचाऱ्याला तत्काळ ताब्यात घेण्यात आले. चौकशीनंतर तिला निलंबित करण्यात आले असून सीआयएसएफने त्याच्याविरुद्ध एफआयआरही नोंदवला आहे.

15 वर्षे CISF मध्ये

ज्या सीआयएसएफ जवानांवर कानशिलात लगावल्याचा आरोप आहे. कुलविंदर कौर असे तिचे नाव आहे. 35 वर्षीय कुलविंदर 15 वर्षांपासून सीआयएसएफमध्ये कार्यरत आहे आणि आतापर्यंतचा तिचा रेकॉर्ड निष्कलंक आहे. आत्तापर्यंत ती तिची जबाबदारी चोख पार पाडत आहे. तिचा नवराही सीआयएसएफचा जवान आहे. कुलविंदर पंजाबमधील कपूरथला येथील रहिवासी आहे. कुलविंदर कौर यांना २ मुले आहेत. त्यांचा भाऊ शेर सिंग हा शेतकरी नेता असून किसान मजदूर संघर्ष समितीमध्ये संघटन सचिव पदावर आहे.

कुलविंदरचे कुटुंब सुल्तानपूर लोधीचे रहिवासी असून, ती गेल्या दोन वर्षांपासून चंदीगड विमानतळावर तैनात आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कुलविंदर कौर ही पंजाबमधील सुल्तानपूर लोधी येथील रहिवासी आहे. सध्या ती मोहालीच्या फेज एक्समध्ये सेक्टर 64 मध्ये राहते. तिचे कुटुंब शेतकरी चळवळीशी जोडले गेले आहे. सध्या कुलविंदर चंदिगड आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या अंतर्गत सुरक्षेत तैनात होती.

कंगनाने दिलेल्या तक्रारीत म्बटले आहे की, ती चंदीगड विमानतळावर सुरक्षा तपासणीनंतर ती बोर्डिंगसाठी जात असताना एलसीटी कुलविंदर कौर (सीआयएसएफ युनिट चंदीगड विमानतळ) हिने तिला कानशिलात लगावली. त्यानंतर कंगना राणौतसोबत प्रवास करणाऱ्या मयंक मधुरने कुलविंदर कौरला कानशिलात मारण्याचा प्रयत्न केला. आरोपी सीआयएसएफ जवानांना ताब्यात घेण्यात आले आहे.

आरोपी सीआयएसएफ जवान निलंबित

यासोबतच आरोपी सीआयएसएफ महिला कर्मचाऱ्याला निलंबित करण्यात आले असून तिच्याविरोधात एफआयआरही नोंदवण्यात आल्याचे समोर आले आहे. दरम्यान, एका CISF जवानाचा एक व्हिडिओही समोर आला आहे, ज्यामध्ये ती कंगना राणौतच्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाबाबत केलेल्या वक्तव्यावर नाराजी व्यक्त करत आहे.

या प्रकरणी काय म्हणाली कंगना राणौत?

दरम्यान, या प्रकारानंतर कंगनानं एका व्हिडिओद्वारे आपल्यासोबत नेमकं काय घडलं? हे सांगितलं. तिनं म्हटलं की, "मला मीडिया आणि माझ्या शुभचिंतकांकडून अनेक फोन कॉल्स आले आहेत. त्यांना मला सांगायचं आहे की मी पूर्णपणे सुरक्षित आहे. आज चंदीगड विमानतळावर जी घटना घडली ती सिक्युरिटी चेकदरम्यान घडली.

जेव्हा मी तपासणीनंतर पुढे निघाले तेव्हा दुसऱ्या केबिनमध्ये एक सीआयएसएफची महिला सुरक्षा रक्षक होती, तिनं मला पुढे जाऊ दिलं आणि माझ्या तोंडावर चापट मारली आणि शिवीगाळ केली. यानंतर मी त्या महिलेला विचारलं की त्यांनी असं का केलं? तर तिनं सांगितंल की, शेतकरी आंदोलनाची ती समर्थक आहे. पण मला काळजी याची वाटतेय की, पंजाबमध्ये जो दहशतवाद वाढतो आहे त्याला तुम्ही कशा पद्धतीनं हाताळणार आहात?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shaha : शिवरायांनी स्वराज्याचे संस्कार रुजविले... पेशव्यांनी स्वराज्य पुढे नेले; अमित शाहांचे पुण्यात गौरवोद्गार

ENG vs IND, 2nd Test: रवींद्र जडेजानं मोडला BCCI चा 'हा' नियम; आता काय होणार कारवाई नेमक काय घडलं, वाचा!

Latest Maharashtra News Updates : पेशवे बाजीरावांच्या स्मारकासाठी सर्वात योग्य जागा म्हणजे NDA - गृहमंत्री अमित शाह

'ज्याने हे केलय त्याच्यावर आता...' मुलाबद्दल फेक न्यूज पसरवणाऱ्यावर रेशम टिपणीस भडकली, म्हणाली, 'तो ठणठणीत आहे.'

शरद उपाध्ये स्वतःची चूक स्वीकारायला तयारच नाहीत; उलट नेटकऱ्यांनाच दिलं ज्ञान, मग नेटकरीही भडकले, म्हणाले-

SCROLL FOR NEXT