rekha and amitabh bachchan  esakal
Premier

अमिताभ बच्चन यांच्यासोबत गेली ४३ वर्ष काम का केलं नाही? रेखा यांनी दिलेलं स्पष्ट उत्तर, म्हणाल्या- आम्हाला एकत्र...

Amitabh Bachchan BIrthday Unknown Facts About Actor: अमिताभ बच्चन आणि रेखा यांच्या लव्हस्टोरीबद्दल जवळपास सगळ्यांनाच ठाऊक आहे पण 'सिलसिला' नंतर त्यांनी कधीही एकत्र काम केलं नाही असं का?

Payal Naik

बॉलिवूडचे शहंशाह अमिताभ बच्चन आज ११ ऑक्टोबर रोजी त्यांचा वाढदिवस साजरा करत आहेत. बिग बी आता ८२ वर्षाचे झाले आहेत. त्यांचं आयुष्य कायम चढ उतारांनी भरलेलं होतं. त्यांच्या व्यावसायिक आयुष्यासोबतच त्यांचं वैयक्तिक आयुष्यही चाहत्यांमध्ये कायम चर्चेत राहिलं. अमिताभ यांच्या फिल्मी करिअरमध्ये त्यांचं नाव एका अभिनेत्रीसोबत जोडलं गेलं त्या अभिनेत्री म्हणजे रेखा. असं म्हटलं जातं ते दोघेही एकमेकांवर प्रेम करायचे. मात्र गेली ४३ वर्ष त्यांनी एकत्र एकही चित्रपट केलेला नाही. असं का? याबद्दल अभिनेत्री रेखा यांनी एका मुलाखतीत उत्तर दिलं होतं.

रेखा यांनी दिलं उत्तर

अमिताभ आणि रेखा यांची जोडी प्रेक्षकांना प्रचंड पसंत पडायची. त्यांची जोडी पडद्यावर अगदी परफेक्ट होती. त्यांनी शेवटचं 'सिलसिला' या चित्रपटात काम केलं होतं. हा चित्रपट १९८१ मध्ये रिलीज झाला होता. मात्र त्यानंतर त्यांनी कधीही एकत्र काम केलं नाही. यावर २००६ मध्ये एका मुलाखतीत रेखा यांनी उत्तर दिलं होतं. त्या म्हणालेल्या, 'माझं नुकसान हे आहे की मला एक अभिनेत्रींच्या रूपात अमितजींच्या या मोठ्या विकासाचा भाग नाही बनता आलं. मला वाटतं की हे योग्य आहे की अमितजींसोबत काम करायला मिळेल अशी आशा मनात धरून वाट पाहत राहणं हेच जास्त योग्य आहे. सगळंकाही योग्य वेळी योग्य कारणामुळे होतं. मला वाटतं की वाट पाहण्याचं फळ गोड असतं. पण याबाबतीत वेळेला काहीच महत्व नाहीये.'

त्या पुढे म्हणाल्या, 'माझं आणि अमितजींचं कोणत्याही चित्रपटात एकत्र न दिसणं ही वेळ घालवण्याची गोष्ट नाहीये. तर दिग्दर्शकाच्या निर्णयावर अवलंबून आहे. त्यांना कदाचित आम्हा दोघांना एकत्र आणण्याच्या लायकीचा प्रोजेक्ट मिळाला नसेल.' रेखा यांचा काल १० ऑक्टोबर रोजी वाढदिवस झाला आणि आज अमिताभ यांचा वाढदिवस आहे. आजही या दोघांची जोडी अनेक प्रेक्षकांची आवडती जोडी आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Police Crackdown: पुण्यात ‘चार बेस, चार टॉप’ तरीही ध्वनिप्रदूषणाचा दणदणाट; ११०० मंडळांच्या ध्वनीची नोंद, नियमभंगावर कारवाई

Nashik Dindori crime news: लखमापूरमध्ये ७० वर्षीय मंदाकिनी सोनवणे यांची हातपाय बांधून शेततळ्यात निर्घृण हत्या; गावकऱ्यांकडून सखोल चौकशी व न्यायाची मागणी

दिल्ली इमारत दुर्घटनेत दोघांचा मृत्यू, पाच जणांची प्रकृती गंभीर; नेमकी कशी घडली घटना? कारण आलं समोर

Weekly Horoscope 7 to 13 september : या आठवड्यात पाच राशींचं नशीब पालटणार; कुणाला घ्यावी लागेल काळजी? वाचा...

Pune Highway Robbery: शिरूरमध्ये एसटी बस अडवून चालक-वाहकाला मारहाण; ₹८,९६० लुटले, चौघे जेरबंद, स्कॉर्पिओ जप्त

SCROLL FOR NEXT