May the Fourth eSakal
Premier

Star Wars Day 2024 : दरवर्षी 4 मे रोजी का साजरा केला जातो 'स्टार वॉर्स डे'? अगदी खास आहे कारण..

May the Fourth be with You : स्टार वॉर्सचे फॅन आज एकमेकांना शुभेच्छा देताना 'मे द फोर्थ बी विथ यू' असं म्हणतात.

Sudesh

Star Wars Day : स्टार वॉर्स ही हॉलिवूडच्या सर्वात लोकप्रिय आणि यशस्वी फ्रँचायजीपैकी एक. 90's किड्ससाठी तर स्टार वॉर्स ही सीरीज म्हणजे त्यांच्या बालपणीचा खजिनाच आहे. जगभरात या मूव्ही सीरीजचे अब्जावधी चाहते आहेत. हे सर्व मिळून आजचा दिवस 'स्टार वॉर्स दिन' म्हणून साजरा करतात. यासाठी ते एकमेकांना अगदी अनोख्या शुभेच्छा देखील देतात.

स्टार वॉर्सचे फॅन आज एकमेकांना शुभेच्छा देताना 'मे द फोर्थ बी विथ यू' (May the Fourth be with You) असं म्हणतात. स्टार वॉर्स मूव्हीजमध्ये खरंतर हे वाक्य थोडं वेगळं आहे. या युनिव्हर्समध्ये असणारी पात्रं एकमेकांना 'May the Force be with you' असं म्हणत असतात. चार मे ही तारीख 'May the Fourth' अशीही म्हटली जाते. ही कोटी होत असल्यामुळेच आजच्या दिवशी स्टार वॉर्स दिन साजरा केला जातो.

डिज्नीचं फॅन्सना गिफ्ट

यंदाच्या 'स्टार वॉर्स डे' निमित्ताने डिज्नीने फॅन्सना एक गिफ्ट दिलं आहे. आजच्या दिवशी या सीरीजचे दोन स्पिनऑफ डिज्नी प्लसवर रिलीज होणार आहेत. 'Star Wars : Visions Volume 2' आणि 'Star Wars : Young Jedi Adventures' हे दोन नवीन शो आता तुम्ही Disney+ वर स्ट्रीम करू शकता. यासोबतच डिज्नीने आजचा दिवस साजरा करण्यासाठी इतर डील्स, DIY प्रोजेक्ट आणि ड्रिंक/फूड आयडियाज देखील दिल्या आहेत.

कुठून झाली सुरुवात?

'मे दि फोर्थ..' या कोटीची सुरुवात खरंतर या फ्रँचायजीशी संबंधित कोणत्याही व्यक्तीने केलेली नाही. अगदी स्टार वॉर्सचे डिरेक्टर जॉर्ज लुकास यांनाही हे सुचलं नव्हतं. याची सुरुवात ही 1979 साली झाली होती. यावर्षी मार्गारेट थॅचर यांनी यूकेच्या पंतप्रधान म्हणून शपथ घेतली होती. हा दिवस 4 मे होता. या दिवशी त्यांच्या पक्षाने वृत्तपत्रात जाहिरात देत त्यांचं अभिनंदन केलं होतं. या जाहिरातीमध्ये "May the Fourth Be with You, Maggie" असं म्हटलं होतं. ही फ्रेज वापरली जाण्याची ही पहिलीच वेळ समजली जाते. अर्थात, आता ही जगभरातील स्टार वॉर्स फॅन्सची कॅचफ्रेज झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Maharashtra News Updates : कोकण, घाटमाथा, विदर्भात ‘ऑरेंज अलर्ट’; उर्वरित कोकण, विदर्भात जोरदार पाऊस शक्य

Shubman Gill: भारताच्या सर्वात मोठ्या विजयासह कर्णधार गिलने मोडला गावसकरांचा ४९ वर्षांपूर्वीचा विक्रम अन् घडवला नवा इतिहास

MS Dhoni Birthday: धोनी का आहे दिग्गज खेळाडू, याची साक्ष देणारे हे रेकॉर्ड्स माहित आहेत का?

ENG vs IND: आकाश दीपने १० विकेट्ससह विक्रम कामगिरी बहिणीला केली समर्पित! कारणही आहे खूपच भावूक

CA Result: ‘सीए’च्या अंतिम परीक्षेत छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा देशात प्रथम; १४ हजार २४७ उमेदवार पात्र ठरले

SCROLL FOR NEXT