bigg boss marathi 5 esakal
Premier

Bigg Boss Marathi 5: एलिमिनेशनमध्ये नसतानाही वाइल्ड कार्ड संग्राम चौगुले घराबाहेर होणार? हे आहे कारण

Sangram Chougule Eliminated From Bigg Boss Marathi 5: बिग बॉस मराठी ५' मध्ये आलेला संग्राम चौगुले लवकरच घराबाहेर होण्याची शक्यता आहे. वाचा कारण.

Payal Naik

मराठी बिग बॉसची चर्चा फक्त मराठी वाहिनीवरच नाही तर हिंदी वाहिन्यांवर देखील आहे. या कार्यक्रमाने सगळ्यांना वेड लावलंय. घरात दररोज नवीन काहीतरी घडतंय. अरबाज पटेल हा या आठवड्याचा कॅप्टन ठरला आहे. तर वर्षा ताईंनी यावेळेस टीम बीची साथ सोडली आहे. आणि टीम ए मध्ये गेल्या आहेत. अशातच आता घरात आलेल्या वाइल्ड कार्ड एंट्रीबद्दल नवीन गोष्ट समोर येते आहे. दोन आठवड्यापूर्वी घरात आलेल्या संग्राम चौगुले याला लवकरच घराबाहेर जावं लागेल असं दिसतंय. त्याचं कारण म्हणजे त्याच्या हाताला झालेली गंभीर दुखापत.

संग्राम आल्यावर घरातला खेळ बदलेल असं वाटत होतं. मात्र तसं काहीही घडलेलं नाहीये. उलट त्याचा खेळ वीक आहे असं सगळ्यांचं म्हणणं आहे. प्रेक्षक त्याच्यावर आधीच नाराज आहेत. अशातच नुकत्याच झालेल्या एका टास्कदरम्यान संग्रामच्या हाताला दुखापत झाली आहे. अरबाजसोबत केलेली कुस्ती त्याला चांगलीच महागात पडली आहे. त्यामुळे संग्रामला सध्या कोणताच टास्क खेळण्याची परवानगी नाही. आता संग्रामला दुखापत झाल्याने त्याला वैद्यकीय कारणास्तव घराबाहेरही पडावे लागण्याची शक्यता असल्याचं म्हटलं जातंय. बिग बॉस लवकरच संग्रामला याबाबत निर्णय कळवणार आहेत.

संग्रामला अंड घरट्यात ठेवण्याच्या टास्कमध्ये डाव्या हाताला दुखापत झाली. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार संग्रामच्या काही वैद्यकीय चाचण्याही करण्यात आल्या आहेत. त्या चाचण्यांचे रिपोर्ट्स येईपर्यंत संग्रामला डाव्या हाताला जास्त ताण न देण्याचा सल्ला देण्यात आला होता. त्यानंतर पुन्हा एकदा बिग बॉसने त्याला बोलावून त्याच्या हाताची स्थिती सांगितली. त्यामुळे संग्रामला कॅप्टन्सीच्या टास्कमध्येही सहभाग घेता आला नाही.

संग्रामच्या ज्या चाचण्या करण्यात आल्या त्यामध्ये त्याला फ्रॅक्चर झाल्याचं आढळून आलं. यावर नक्की काय उपचार करावेत याविषयी सध्या डॉक्टरांची चर्चा सुरु असल्याचीही माहिती त्यांनी दिली. त्यामुळे ही दुखापत जास्त असेल तर त्याला घराबाहेर जावं लागू शकतं. यापूर्वीच्या सीझनमध्ये अभिनेत्री तेजस्विनी लोणारी हिच्या हाताच्या दुखापतीमुळे तिला बाहेर जावं लागलं होतं. आता पुन्हा तसं काही नक्कीच घडू शकतं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vishwas Nangre Patil Fact Check : 'भाकरी करपली नाहीच' आयपीएस विश्वास नांगरे पाटलांनी कविता लिहली की नाही?, महाराष्ट्र सरकारकडून फॅक्ट चेक

INDIA SQUAD VS AFGHANISTAN: भारताच्या संघात गुजरात टायटन्सची प्लेइंग इलेव्हन... वन डेत ४, तर कसोटीत ७ खेळाडू

Mumbai Water Supply: मुंबईकरांचं पाणी महागणार! बीएमसी मोठा निर्णय घेणार; किती टक्क्यांनी दर वाढणार?

Shaktipeeth Highway protest : शक्तीपीठ महामार्गाविरोधात कोल्हापुरात एल्गार; ७८ गावातील शेतकरी ९ जूनला जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार

BAN vs PAK 2nd Test: फिफ्टी हो गई, अब ड्रामा शुरू हो जाएगा! मोहम्मद रिझवानचे live मॅचमध्ये लिटन दाससोबत जोरदार भांडण Video

SCROLL FOR NEXT