John Cena at Ambani's wedding  Esakal
Premier

John Cena Video : 'दिसला' जॉन सिना ! भारतीय पेहरावात अंबानींना दिल्या मुलाच्या लग्नाच्या खास शुभेच्छा

John Cena at Anant Ambani's wedding : WWE स्टार जॉनी सीनाने भारतीय पोशाखात अनंत अंबानीच्या लग्नाला हजेरी लावली.

सकाळ डिजिटल टीम

Anant Ambani & Radhika Merchant Wedding : अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नाकडे अख्ख्या देशाचं लक्ष लागून राहिलय. अंबानी कुटुंबातील हा लग्नसोहळा अगदी प्री वेडिंग पासूनच चर्चेत राहिलाय. अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट आज १२ जुलै रोजी मुंबईत लगीनगाठ बांधणार आहेत. या ग्रँड वेडिंग सोहळ्यासाठी देश विदेशातून पाहुणी मंडली हजेरी लावताना दिसत आहेत. या लग्नात अनेक आंतरराष्ट्रीय कलाकारांची हजेरी आणि त्यांचे परफॉर्मन्स लक्ष वेधून घेत आहेत. १२ जुलै रोजी होत असलेल्या विवाह सोहळ्यासाठी देखील अनेक लोकप्रिय सेलिब्रिटींची हजेरी पाहायला मिळतेय. यातच आणखी एका कलाकाराने मुंबई विमानतळावर लक्ष वेधून घेतलय.

WWE स्टार जॉनी सीना अंबानींच्या लग्नसोहळ्यात सहभागी होणार असल्याची चर्चा होती. मात्र अंबानींनी हे देखील करुन दाखवलं असं म्हणावं लागेल. थेट जगप्रसिद्ध जॉन सीनाला देखील अंबानी कुटुंबाकडून लग्नाचं आमंत्रण होतं. म्हणूनच जॉन सीनाने देखील मुंबई गाठली आणि तो अंबानी कुटुंबाच्या आनंदात सहभागी होताना दिसतोय. मुंबई विमानतळावर जॉन सीना मुंबईत दाखल झाल्याचे व्हिडीओ तर चर्चेत आलेच मात्र लग्नसोहळ्यात सहभागी झालेल्या जॉन सीनाने असं काही केलं की सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं. यावेळी जॉन सीना चक्क भारतीय पेहरावात दिसला. जॉनने यावेळी खास इन्डो वेस्टर्न शेरवानी परिधान केली होती. त्याच्या खास अंदाजात एन्ट्री करत त्याने अंबानी कुटुंबाची भेट घेतली. यावेळी मुकेश अंबानी यांनी जॉन सीनाचं स्वागत केलं.

https://www.facebook.com/reel/465110779567902

तेव्हा अनेक आंतरराष्ट्रीय कलाकारांची हजेरी आणि त्यांच्या परफॉर्मन्सी सजलेला असा हा विवाहसोहळा असणार आहे. अनंत आणि राधिकाच्या प्री वेडिंग सोहळ्यात रिहानाने देखील हजेरी लावली होती. तर अनंत - राधिकाच्या संगीत कार्यक्रमात जस्टिन बीबरची हजेरी पाहायला मिळाली होती. जस्टिन बीबरने देखील संगीत कार्यक्रमात परफॉर्म केलं होतं. लग्नसोहळ्याच्या कार्यक्रमात खास परफॉर्मन्स सादर करण्यासाठी आंतरराष्ट्रीय सिंगर रेमा देखील मुंबईत दाखल झालाय.

तेव्हा विविध क्षेत्रातील दिग्गज मंडळी,सेलिब्रिटी आणि आंतरराष्ट्रीय स्टार्स यांच्या उपस्थितीत अनंत अंबानी आणि राधिका मर्चंड यांचा लग्नसोहळा थाटात मुंबईत पार पडतोय. अंबानींच्या घरातून अनंत अंबानीची वरात देखील थाटात निघाली. यावेळी अंबानींच्या गाड्या देखील खास सजवण्यात आल्या होत्या. विवाहस्थळी सध्या पाहुण्यांची आणि अनेक दिग्गज मंडळींची या लग्नसोहळ्यासाठी हजेरी पाहायला मिळतेय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Air Ambulance Crash: भीषण विमान दुर्घटना!,रांचीहून दिल्लीला निघालेली 'एअर अ‍ॅम्ब्यूलन्स' घनदाट जंगलात कोसळली

Team India Semi Final Scenario : टीम इंडियाला नेट रन रेट रडवणार! झिम्बाब्वेविरुद्ध ११ षटकं अन् विंडीजविरुद्ध १८३ धावांनी विजय... तिसरं समीकरणही लैय अवघड

Onion Rate Issue : कांदा उत्पादकांना एकरी ५० हजारांचा तोटा; शेतकऱ्यांत बाजारभावाअभावी चिंता, उत्पादन खर्च भागविण्याचाही प्रश्न

Bangladesh Politics : पंतप्रधान तारिक रहमान यांचा मोहम्मद युनूस यांना मोठा धक्का!

Yavatmal News : जिल्हा परिषद कर्मचार्‍यांच्या बदल्या एप्रिलमध्ये होणार; सीईओंचे गटविकास अधिकार्‍यांना पत्र

SCROLL FOR NEXT