Ramayana esakal
Premier

Ramayana: केजीएफ स्टार यशने नाकारली रावणाची भूमिका, त्याऐवजी 'रामायण' सिनेमासाठी करणार 'हे' काम

यशला या प्रोजेक्टमध्ये काम करायचं होतं. त्याला रामाच्या भूमिकेपेक्षा रावणाची भूमिका जास्त आव्हानात्मक वाटते आणि रणबीर प्रभू रामाची भूमिका करणार आहे हे कळल्यावर तो काम करायला अजून उत्सुक होता पण त्याच्या टीमला तसं वाटत नव्हतं.

priyanka kulkarni

Ramayana: केजीएफ (K.G.F) स्टार यश (Yash) सध्या चर्चेत आहे ते रामायण (Ramayana) या बिग बजेट सिनेमाशी त्याच्या जोडल्या गेलेल्या नावामुळे. नितेश तिवारी दिग्दर्शित या सिनेमाची चर्चा बराच काळ सुरु आहे आणि यशला या सिनेमात रावणाची भूमिका ऑफर केल्याचं म्हंटलं जात होतं. पण काही चॅनेल्सनी दिलेल्या वृत्तानुसार यशने रावणाची भूमिका नाकारली आहे.

झूम चॅनेलने दिलेल्या वृत्तानुसार यशने रावणाची भूमिका नाकारली असून त्या जागी तो या सिनेमाचा सहनिर्माता म्हणून काम करण्याचा प्रस्ताव त्याने सिनेमाच्या टीमसमोर ठेवला होता आणि तो प्रस्ताव दिग्दर्शक नितेश तिवारी यांनी मान्य केलाय. यामुळे निर्माता म्हणून यश या सिनेमासाठी कसं काम करणार हे पाहणं आता महत्त्वाचं ठरेल.

ई -टाइम्सला सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, यशला या प्रोजेक्टसाठी काम करायचं होतं. त्याला रामाच्या भूमिकेपेक्षा रावणाची भूमिका जास्त आव्हानात्मक वाटते आणि रणबीर प्रभू रामाची भूमिका करणार आहे हे कळल्यावर तो काम करायला अजून उत्सुक होता पण त्याच्या टीमला तसं वाटत नव्हतं. यशने जर निगेटिव्ह भूमिका केली तर तो त्याच्या चाहत्यांना दुखावेल असं त्यांना वाटलं आणि त्यांनी यशला ही भूमिका नाकारण्याचा सल्ला दिला.

यशने सुद्धा एका मुलाखतीत त्याच्या चाहत्यांविषयी सांगितलं होतं. तो म्हणाला होता की, "मी माझ्या फॅन्सच्या भावनांचा खूप आदर करतो आणि ते दुखावणार नाहीत याची काळजी घेतो. माझे फॅन्स जर मी त्यांच्या मनाविरुद्ध वागलो तर खूप जास्त दुखावले जातात."

दरम्यान रणबीर कपूरसुद्धा प्रभू रामाची भूमिका साकारण्यासाठी खूप मेहनत घेत असून त्याचा फिटनेस रुटीनचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. ई- टाईम्सच्या वृत्तानुसार प्रभू रामांची भूमिका साकारण्यासाठी रणबीरने मांसाहारी खाणं आणि मद्यपान करणं बंद केलं आहे. प्रभू रामांच्या भूमिकेचं पावित्र्य राखण्यासाठी त्याने हे पाऊल उचलल्याचं म्हंटलं जातंय.

यशने रावणाच्या भूमिकेतून माघार घेतल्यावर ही भूमिका कोणता साकारणार हे जाणून घेण्यास चाहते उत्सुक आहेत हे नक्की. रणबीर बरोबर या सिनेमात साई पल्लवी, सनी देओल, अरुण गोविल, आदिनाथ कोठारे, लारा दत्ता आणि शिबा चड्ढा यांच्या मुख्य भूमिका आहेत

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

थलपतीला विजय मिळाला पण सत्ता नाही! मुख्यमंत्र्याच्या खुर्चीसाठी कुणाशी हातमिळवणी करणार? राज्यात त्रिशंकू स्थिती

Assembly election results 2026 Update : आसामसह बंगालमध्ये कमळ फुललं, तामिळनाडुत थलपतीचा विजय तर केरळमध्ये पुन्हा काँग्रेस

Mamata Banarjee : ममता बॅनर्जींचा पराभव, सत्ता अन् आमदारकीही गेली; भाजपच्या सुवेंदू अधिकारी यांचा मोठा विजय

Mumbai News: धारावीतील गोंधळ संपणार? अनिर्णित म्हणजे अपात्र नाही, प्राधिकरणाचा स्पष्ट संदेश

Line Fire: सय्यदपुरात महावितरणची मुख्य तार तुटून रस्त्यावर भीषण आग

SCROLL FOR NEXT