Ye Re Ye Re Paisa esakal
Premier

Ye Re Ye Re Paisa: "कुणी पैशात खेळतं, तर कुणी पैशासाठी..!"; 'येरे येरे पैसा 3' ची घोषणा, 'या' दिवशी रिलीज होणार चित्रपट

Ye Re Ye Re Paisa: संजय जाधव यांच्या 'येरे येरे पैसा 3' या चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे. तसेच या चित्रपटाची रिलीज डेट देखील जाहीर करण्यात आलेली आहे.

priyanka kulkarni

Ye Re Ye Re Paisa: मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध दिग्दर्शक संजय जाधव (Sanjay Jadhav) यांच्या चित्रपटांना प्रेक्षकांची विशेष पसंती मिळते. त्यांच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत असतात. अशातच आता संजय जाधव यांच्या आगामी चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे. येरे येरे पैसा (Ye Re Ye Re Paisa) या चित्रपटाच्या पहिल्या आणि दुसऱ्या भागाच्या यशानंतर आता या चित्रपटाचा तिसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकतीच संजय जाधव यांच्या 'येरे येरे पैसा 3' या चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे. तसेच या चित्रपटाची रिलीज डेट देखील जाहीर करण्यात आलेली आहे.

कधी रिलीज होणार 'येरे येरे पैसा 3'?

संजय जाधव यांनी सोशल मीडियावर 'येरे येरे पैसा 3' या चित्रपटाचं पोस्टर शेअर करुन या चित्रपटाची घोषणा केली आहे. या पोस्टरला त्यांनी कॅप्शन दिलं, "कुणी पैशात खेळतं, तर कुणी पैशासाठी..! पुन्हा मनोरंजनाचा पाऊस पाडायला येत आहे.. 'येरे येरे पैसा ३'" संजय जाधव यांनी 'येरे येरे पैसा 3' या चित्रपटाची रिलीज डेट देखील जाहीर केली आहे. हा चित्रपट 1 नोव्हेंबरला थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन संजय जाधव यांनी केलं असून या चित्रपटाची कथा देखील त्यांनीच लिहिली आहे.

'येरे येरे पैसा 3' ची स्टार कास्ट

संजय नार्वेकर,सिद्धार्थ जाधव,उमेश कामत, तेजस्विनी पंडित, आनंद इंगळे,वनिता खरात, विशाखा सुभेदार हे कलाकार 'येरे येरे पैसा 3' या चित्रपटात काम करणार आहेत. प्रेक्षक या चित्रपटाची उत्सुकतेने वाट बघत आहेत.

सिद्धार्थ जाधव आणि तेजस्विनी पंडित यांनी देखील 'येरे येरे पैसा 3' या चित्रपटाचं पोस्टर सोशल मीडियावर शेअर केलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कॅब लवकर हवी? आता आधीच टिप देण्याचा खेळ संपला! सरकारचा Uber-Ola ला मोठा आदेश

Gelatin Blast: पुण्यातल्या कामगाराचं भयंकर कृत्य! कमरेला स्फोटकं बांधून सासरवाडीत पोहोचला, एक बटण दाबलं अन् सगळं संपलं

Onion Rate : मंचर बाजार समितीत कांद्याला दहा किलोस मिळाला ४११ रुपये उच्चांकी बाजार भाव

Sangli Accident: रेणावी घाटात काळाचा घाला! दोन एसटी बस समोरासमोर धडकल्या, तीन जणांचा मृत्यू, काही जखमी

Pune News : प्रशासनातील वाद चव्हाट्यावर! वरिष्ठ अधिकारी दुजाभाव करतात; महापालिका आयुक्तांकडे तक्रार

SCROLL FOR NEXT