Yed Lagla Premach Marathi TV series Vishal Nikam Pooja Birari marathi Entertainment News  
Premier

Yed Lagla Premach : विशाल-पूजाची 'येड लागलं प्रेमाचं' ही मालिका आहे 'या' गाजलेल्या मालिकेचा रिमेक

Yed Lagla Premach Promo : लवकरच स्टार प्रवाह वाहिनीवर 'येड लागलं प्रेमाचं' ही नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

सकाळ वृत्तसेवा

सध्या मराठी मालिकाविश्वात अनेक नवनवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. लवकरच स्टार प्रवाह वाहिनीवर 'येड लागलं प्रेमाचं' ही नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. विशाल निकम आणि पूजा बिरारी यांची मुख्य भूमिका असलेल्या या मालिकेचा प्रोमो सध्या सोशल मीडियावर खूप गाजतोय. पण तुम्हाला माहिती आहे का? ही मालिका एका गाजलेल्या मालिकेचा रिमेक आहे ते.

पूजा आणि विशाल यांची मुख्य भूमिका असलेली ही मालिका गाजलेली तेलुगू मालिका 'गोरिंटकू' चा रिमेक आहे. २०२१ साली ही मालिका स्टार माँ या तेलुगू वाहिनीवरून प्रेक्षकांच्या भेटीस आली. त्यानंतर या मालिकेचा रिमेक 'मेहेंदी है रचनेवाली' या नावाने हिंदीमध्ये करण्यात आला. तरुणपणीच विधवा झालेली तरुणी आणि एक गुंड यांची हटके गोष्ट या मालिकेत दाखवण्यात आली होती आणि आता ही गोष्ट मराठीत पाहायला मिळणार आहे.

पहा प्रोमो:

राया नावाचा गावगुंड आणि खंबीर मंजिरी यांची वेगळी गोष्ट या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. गावगुंड असलेल्या रायाची मंजिरी तक्रार करते आणि मंजिरीला घरी पाहुणे बघायला आलेले असतानाच राया त्यांच्या घरी येऊन तमाशा करतो असं या प्रोमोमध्ये दाखवण्यात आलं आहे. मालिकेचा हा प्रोमो सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे.

पण ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीस कधी येणार हे अजून स्टार प्रवाह वाहिनीने स्पष्ट केलं नाहीये. स्वाभिमान या मालिकेनंतर पूजा बऱ्याच काळाने नवीन मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस येतेय तर विशाल निकमसुद्धा बिग बॉस सीजन ३ नंतर बऱ्याच काळाने मालिकाविश्वात कमबॅक करतोय. त्याच्या मालिकेतील लूकने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. यासोबतच विशाल 'वेडात मराठे वीर दौडले सात' या महेश मांजरेकर दिग्दर्शित सिनेमातही दिसणार आहे. हा सिनेमाही लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार असून या सिनेमात अभिनेता अक्षय कुमार छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारणार आहे तर प्रवीण तरडे सरसेनापती प्रतापराव गुजर यांच्या भूमिकेत दिसणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'38 मध्ये नवऱ्याची भेट, 39 मध्ये लग्न आणि..' जुई गडकरीला कसं हवय वैवाहिक आयुष्य? पोस्ट शेअर करत म्हणाली...

Provident Fund: तुम्ही सॅलरी अकाउंट बदललं? ‘हे’ काम नाही केलं तर PF चे पैसे अडकू शकतात!

Latest Marathi News Live Update : मंत्रालयातील लाचखोरी प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच उत्तर द्यावं- सुप्रिया सुळे

Narhari Zirwal clerk action : नरहरी झिरवळ यांच्या खात्यातील लिपिकावर कारवाई; चौकशी अहवाल येईपर्यंत खाजगी सचिवांचा कार्यभार थांबवला

Deputy CM Sunetra Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसचा निर्णय सुनेत्रा पवार यांच्या कोर्टात; अध्यक्ष निवडीचा पेच कायम, जिल्ह्यातील वरिष्ठ नेत्यांचा निर्णय

SCROLL FOR NEXT