ek number  esakal
Premier

Yek Number Trailer: तेजस्विनी पंडितच्या 'येक नंबर'चा खतरनाक ट्रेलर समोर; मलायकाला पाहून उंचावल्या नेटकऱ्यांच्या भुवया

Tejaswini Pandit's Yek Number Movie Trailer Release : लोकप्रिय मराठी अभिनेत्री तेजस्विनी पंडीत हिच्या 'येक नंबर' या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे.

Payal Naik

लोकप्रिय मराठी अभिनेत्री तेजस्विनी पंडित हिच्या 'येक नंबर' या चित्रपटाची गेल्या काही दिवसांपासून प्रचंड चर्चा होती. या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत होते. आता या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. प्रदर्शित होताच या चित्रपटाने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरचा ग्रँड प्रीमिअर करण्यात आला. आता हा ट्रेलर पाहून नेटकरी त्यांच्या प्रतिक्रिया देत आहेत. सोबतच ट्रेलरमध्ये काही हटके चेहेरेही पाहायला मिळत आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेने, राज ठाकरे आणि 'येक नंबर' या चित्रपटाचा नेमका संबंध काय याचं उत्तर हा ट्रेलर पाहिल्यावर लक्षात येतं.

ट्रेलरच्या सुरुवातीलाच अभिनेता धैर्य घोलप म्हणजेच चित्रपटातील प्रताप शेठ या मुख्य पात्राचा आवाज येतो. तो पिंकीला विचारतो तुला नेमकं आवडतं तरी कोण? त्यावर ती म्हणते मला राज ठाकरे आवडतात. धैर्यची दोनच स्वप्न आहेत आमदार बनणं आणि त्यांना पिंकीशी लग्न करायचंय. मात्र लग्नासाठी पिंकी त्याच्यासमोर एक अट ठेवते. तू राज ठाकरेंना गावात घेऊन ये. मी तुझ्याशी लग्न करते असं ती म्हणते. त्यानंतर सुरू होतो प्रतापचा मुंबईला येण्याचा आणि राज ठाकरेंना भेटण्याचा प्रवास. त्यांना गावाकडे नेण्यासाठी धडपडत असलेला प्रताप जेव्हा हरतो तेव्हा तो त्यांनाच मारायची सुपारी देतो. मग सुरू होतो खरा खेळ.

एकीकडे या चित्रपटाच्या कथेची चर्चा सुरू असताना ट्रेलरमध्ये सिद्धार्थ जाधव आणि बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा यांचेही चेहरे दिसतात. मलायकाचं या चित्रपटामध्ये एक गाणं असल्याचं अंदाज लावला जातोय. चित्रपटाची कथा वेगळी असून ट्रेलरही नेटकऱ्यांच्या पसंतीस पडला आहे. हा चित्रपट १० ऑक्टोबर पासून चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाची टक्कर प्राजक्ता माळीच्या 'फुलवंती' या चित्रपटाशी होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shirol Kolhapur village dispute : कोल्हापूरच्या शिरोळ तालुक्यात एका झाडावरून दोन गावात वाद उफाळला, वडाच्या झाडावरून तणावपूर्ण स्थिती

A. Krishnamurthy: 'हिम्मतवाला' फेम ज्येष्ठ चित्रपट निर्मात्यांचे निधन, सिनेसृष्टीवर शोककळा

Konkan Hapus Mango Crisis : चक्रीवादळ ते अवकाळी पाऊस; जागतिक कीर्तीचा हापूस आंबा आता धोक्यात? वाचा सविस्तर रिपोर्ट

प्रेमासाठी धर्म बदलायला तयार होती नयनतारा, मग का नाही झालं प्रभुदेवाशी लग्न? 'त्या' अटींमुळे होत्याचं नव्हतं झालं

iPhone 17 मिळतोय निम्म्या किंमतीत! ४४ हजारात खरेदीसाठी रांगा; कुठे सुरुय ही अजब ऑफर? पाहा एका क्लिकवर

SCROLL FOR NEXT