Prasad Vedpathak ESAKAL
Premier

Prasad Vedpathak: "अचानक त्यांनी मला 'बायकोजीवी' म्हणायला सुरुवात केली..."; ट्रोलर्सला युट्यूबर प्रसादचं रोखठोक उत्तर

Prasad Vedpathak: प्रसादनं ट्रोलर्सबाबत नुकतेच एक ट्वीट (X) शेअर केलं आहे. त्याच्या या ट्वीटनं अनेकांचे लक्ष वेधले आहे.

priyanka kulkarni

Prasad Vedpathak Tweet: युट्यूबर प्रसाद वेदपाठक (Prasad Vedpathak) आणि त्याची पत्नी दीपिका (Deepika Vedpathak) हे सोशल मीडियावर बरेच चर्चेत असतात. प्रसिका नावानं प्रसिद्ध असलेलं हे जोडपं सोशल मीडियावर विविध पोस्ट शेअर करत असतं. कधी दीपिका आणि प्रसादच्या पोस्टला नेटकऱ्यांची पसंती मिळते, तर कधी नेटकरी त्यांना ट्रोल करतात. अशातच आता प्रसादनं ट्रोलर्सबाबत नुकतेच एक ट्वीट (X) शेअर केलं आहे. त्याच्या या ट्वीटनं अनेकांचे लक्ष वेधले आहे.

प्रसादचं ट्वीट

प्रसादनं त्याला ट्रोल करणाऱ्यांना ट्वीटच्या माध्यमातून सडेतोड उत्तर दिलं आहे. त्यानं या ट्वीटमध्ये लिहिलं, "भक्तांनी आमचा संघर्ष पाहिला नाही आणि अचानक त्यांनी मला 'बायकोजीवी' म्हणायला सुरुवात केली. खरंसांगू तर मला अभिमान वाटतो त्यागोष्टीचा. जे लोक त्यांच्या आयुष्यात कधीही स्त्रियांना स्वातंत्र्य आणि आदर देत नाहीत त्यांना मी जे काही अनुभवतोय ते कसे कळणार. मंत्रालयातली नोकरी सोडून स्वतःचा cake चा व्यवसाय सुरूकेला हजारो लोकांना घरी भेटून cake दिले आणि आज एवढी मोठी इन्फ्लुएन्सर झाली आहे ती. अरे बायकोसोड्याला पुजणाऱ्यांनो, बायकोजीवी काय तिचा गुलाम बनायला तयार आहे मी!"

दीपिका आणि प्रसाद यांनी याआधी देखील अनेकवेळा ट्रोल करणाऱ्यांना उत्तर दिलं आहे. दीपिकानं ट्वीट केलं होतं, "बरेच लोक माझ्या पतीला पैसे कमावण्यासाठी वापर करत असल्याचे सांगून त्याची बदनामी करण्याचा प्रयत्न करतात. या सर्व लोकांना मी हे सांगते की,आम्ही जोडीदारापूर्वी बिझनेस पार्टनर आहोत आणि शालेय मित्र आहोत. आम्ही मिळून आमचं साम्राज्य उभं केलं आहे, जलो मत दोबारा करो. तुम्ही भाग्यवान आहात मी फुकटात ट्विट केलं."

दीपिका आणि प्रसाद हे दोघेही सोशल मीडिया इन्फ्लुएंसर आहेत. दीपिकाला इन्स्टाग्रामवर 160K फॉलोवर्स आहेत तर प्रसादला 167K फॉलोवर्स आहेत. तसेच त्यांचे प्रसादचे Ur IndianConsumer नावाचे युट्यूब चॅनल आहे. या चॅनलला 1.22 मिलियन्स subscribers आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT