zee marathi award 2024 esakal
Premier

असे क्षण फक्त इथेच घडू शकतात! झी मराठीचा तो व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांचे डोळे पाणावले; म्हणतात- म्हणून आम्हाला...

Zee Marathi Award 2024 Viral Video: छोट्या पडद्यावरील लोकप्रिय वाहिनी झी मराठीला लवकरच २५ वर्ष पूर्ण होणार आहेत. त्यानिमित्ताने पुरस्कार सोहळ्याचा एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे.

Payal Naik

झी मराठी वाहिनी ही छोट्या पडद्यावरील जुन्या वाहिन्यांपैकी एक आहे. या वहिनीला आता तब्बल २५ वर्ष पूर्ण होत आहेत. त्यामुळे यावर्षीचा झी मराठी अवार्ड सोहळादेखील खास असणार आहे. २६ आणि २७ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी ७ वाजता हा सोहळा झी मराठीवर प्रक्षेपित होणार आहे. अशातच या सोहळ्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. यात झी मराठीवरील मालिकांमधील कलाकार आपल्या कुटुंबातील व्यक्तींच्या आठवणीत भावुक होताना दिसतायत. हा व्हिडिओ पाहून नेटकरीही भावुक झाले आहेत. सोबत म्हणून आम्हाला झी मराठी आवडतं अशा भावना प्रेक्षक व्यक्त करताना दिसतायत.

या व्हिडिओमध्ये 'शिवा' मालिकेतील मुख्य अभिनेत्री पूर्वा कौशिक हिच्या आई वडिलांसोबतचा फोटो तिला दाखवण्यात येतो. तेव्हा ती म्हणते, आम्ही सगळे एकत्र बसून झी मराठी अवार्ड पाहायचो आणि असाच एखादा अवॉर्ड मला मिळावा असं वाटायचं. आता अवॉर्ड मिळतोय तर ते पाहायला ते दोघेही नाहीत. ते असते तर त्यांना खूप आनंद झाला असता.' त्यानंतर सगळ्यांचा लाडका एजे म्हणजे अभिनेता राकेश बापट याची याची मंचावर येताना दाखवण्यात आली आहे. आईच्या हट्टामुळे आपण मराठी सीरिअल केली असं राकेशने म्हटलं होतं. आता राकेशची आई म्हणते, 'मी त्याला सांगितलेलं की तू मराठी सिरीयल कर. मला रोज तू टीव्हीवर दिसला पाहिजे.'

त्यानंतर 'लाखात एक आमचा दादा' या मालिकेतील अभिनेता नितेश चव्हाण याचा दादा मंचावर येतो. नितेश म्हणतो, 'आज हा जो काही मी इथे उभा आहे तो माझ्या दादामुळे आहे. तू माझ्यासाठी लाखात एक नाही करोडोत एक दादा आहेस.' या कलाकारांच्या डोळ्यात अश्रू पाहून नेटकरी देखील भावुक झालेत. अनेक नेटकऱ्यांनी कमेंट करत झी मराठीचं कौतुक केलं आहे. असे अविस्मरणीय क्षण फक्त झी मराठीमध्येच होऊ शकतात, म्हणून तर आपल्याला झी मराठी खूप आवडते, अगदी अंगावर काटा आणणारा क्षण, म्हणून झी मराठी ...., खूप छान वाटलं हे पाहून जुन्या आठवणी ताज्या झाल्या, अशा अनेक कमेंट नेटकऱ्यांनी दिल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chhatrapati Sambhajinagar: मुलाच्या उमेदवारीसाठी पाठिंबा द्या, शिवसेनेच्या नेत्याची सुनेत्रा पवारांना विनंती

IPL 2026: २८१ स्ट्राईक रेट अन् ९३ धावा... रजत पाटिदार प्लेऑफचा 'दादा'; Final मध्ये पोहचताच म्हणाला, 'आम्ही तुमच्यावर चालून येतोय...'

Sant Nivruttinath Rath: संत निवृत्तिनाथांच्या रथास यंदा सुरेगावची बैलजोडी; इतिहासात प्रथमच सिन्नर तालुक्याला मान

Yavatmal: शिंदेसेनेच्या नगरसेवकांवर प्राणघातक हल्ला

NCP Internal Conflict : सुनेत्रा पवारांसमोर तटकरे-भुजबळांमध्ये वादावादी; पार्थ पवार तडकाफडकी निघून गेले, देवगिरी बंगल्यावरील वातावरण तापलं

SCROLL FOR NEXT