IPL 2026: २८१ स्ट्राईक रेट अन् ९३ धावा... रजत पाटिदार प्लेऑफचा 'दादा'; Final मध्ये पोहचताच म्हणाला, 'आम्ही तुमच्यावर चालून येतोय...'

IPL 2026 Playoffs: Rajat Patidar Storm: आयपीएल २०२६ स्पर्धेच्या क्वालिफायर १ सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने गुजरात टायटन्सला पराभूत केले आणि अंतिम सामन्यात प्रवेश केला. या सामन्यात रजत पाटिदारने ९३ धावांची आक्रमक खेळी केली. त्यानंतर तो काय म्हणाला जाणून घ्या.
Rajat Patidar | RCB vs GT | IPL 2026

Rajat Patidar | RCB vs GT | IPL 2026

Sakal

Updated on

Rajat Patidar in IPL Playoffs: इंडियन प्रीमियर लीग २०२६ स्पर्धेत गतविजेता रॉयल चॅलेंजर्स बंगळूरच्या संघाने मंगळवारी (२६ मे) गुजरात टायटन्सचा ९२ धावांनी धुव्वा उडवला. कर्णधार रजत पाटीदार याने झळकावलेल्या नाबाद अर्धशतकी खेळीच्या जोरावर बंगळूर संघाने ‘क्वालिफायर वन’ लढतीत दिमाखदार खेळ केला आणि आयपीएल या टी-२० स्पर्धेची सलग दुसऱ्यांदा अंतिम फेरी गाठली.

बंगळूरकडून (RCB) गुजरात संघासमोर (GT) २५५ धावांचे आव्हान ठेवण्यात आले. मात्र, मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करताना गुजरातचे फलंदाज दबावाखाली १६२ धावांवर ढेपाळले.

Rajat Patidar | RCB vs GT | IPL 2026
RCB vs GT Qualifier 1 : RCB चा विक्रम! IPL इतिहासातील प्ले ऑफमधील सर्वोच्च धावसंख्या... रजत, विराट, कृणाल, देवदत्त यांचे वादळ
Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com