tula japnar aahe  esakal
Premier

New Serial: झी मराठीवर सूरू होतेय नवी हॉरर मालिका, 'तुला जपणार आहे'चा प्रोमो चर्चेत, 'ही' मालिका घेणार निरोप?

Zee Marathi New Serial: लोकप्रिय वाहिनी झी मराठीवर एक नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्याचा प्रोमो वाहिनीने नुकताच शेअर केला आहे.

Payal Naik

छोट्या पडद्यावर सध्या नवनवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. या मालिकांमध्ये सगळ्यात जास्त मालिका या कलर्स मराठीच्या होत्या. मात्र यानंतर स्टार प्रवाह आणि झी मराठीने देखील काही नव्या मालिकांची घोषणा केली. नुकतीच झी मराठीवर 'सावळ्याची जणू सावली ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली. त्यानंतर झीने 'लक्ष्मी निवास' या मालिकेची घोषणा केली आहे. या मालिकेचा प्रोमो येतो ना येतो तेव्हाच झीवर आणखी एक नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ही मालिका आहे 'तुला जपणार आहे.' या मालिकेचा एक प्रोमो नुकताच प्रदर्शित करण्यात आला आहे. जो पाहून प्रेक्षक चांगलेच खुश झाले आहेत.

झी मराठीचा हॉरर मालिकांचा इतिहास आहे. झीच्या आगळ्या वेगळ्या हॉरर मालिका पाहायला प्रेक्षकांना आवडतात. 'रात्रीस खेळ चाले', 'ती परत आलीये' या मालिकांनंतर आता झी मराठीवर आणखी एक हॉरर मालिका भेटीला येणार आहे. झी मराठीच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन या मालिकेचा प्रोमो शेअर करण्यात आला आहे. 'तुला जपणार आहे' असं या मालिकेचं नाव असून 'दिसत नसली तरीही असणार आहे...तुला जपणार आहे' असं या मालिकेच्या प्रोमोमध्ये म्हटलं गेलं आहे. या प्रोमोमध्ये जंगलातील एका वाड्यात एक लहान मुलगी आणि एक साडी नेसलेली बाई दिसत आहे. त्या दोघीही आरशासमोर उभ्या आहेत. मात्र या आरशात फक्त त्या लहान मुलीचीच सावली दिसतेय.

हा प्रोमो शेअर करत झी मराठीने लिहिलं, 'कधीही न दिसणारी आणि तरीही जाणवणारी ही सावली नेमकी कोणाची? 'तुला जपणार आहे' लवकरच'. हा प्रोमो पाहून प्रेक्षकही खुश झालेत आहेत. ही मालिका रात्री १०. ३० वाजता प्रक्षेपित केली जाईल असा अंदाज आहे. त्यामुळे 'सातव्या मुलीची सातवी मुलगी' ही मालिका कदाचित निरोप घेऊ शकते. किंवा या मालिकेची वेळही बदलली जाऊ शकते. १०. ३० ची वेळ झी च्या हॉरर मालिकांसाठी नेहमीच लकी ठरलीये. त्यामुळे आता कोणती मालिका निरोप घेणार हे पाहणं औसुक्याचं ठरणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Supply Update: एलपीजीवर मोठा गेमचेंजर निर्णय! रस्त्यांवरचे टँकर गायब होणार? सरकारची नवी योजना नेमकी काय आहे…?

अमरावती लैंगिक अत्याचार प्रकरणाच्या निमित्याने..

Latest Marathi News Live Update : विधेयक राष्ट्रविरोधी, सत्ता मिळवण्याचा प्रयत्न - राहुल गांधींचा हल्लाबोल

फक्त 50 रुपये दंड ! प्राण्यांविरुद्धच्या अत्याचारांवर अभिनेत्री पूजा सावंत व्यक्त "मी पोलीस ऑफिसर असते तर"

Bhooth Bangla X Review: कसा आहे अक्षय कुमारचा 'भूत बंगला'? ट्विटरवर लोकांनी कुंडली मांडली, म्हणाले- हे तर...

SCROLL FOR NEXT