zee marathi  esakal
Premier

ते येतायत! झी मराठीवर येतेय नवी मालिका, तुम्ही ओळखलंत का या जोडीला? नेटकऱ्यांनी सांगितलं मालिकेचं नाव

Zee Marathi New Serial: झी मराठी वाहिनीवर आणखी एक मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येते आहे. एका व्हिडिओवरून नेटकऱ्यांनी मालिकेचं नाव सांगितलं आहे.

Payal Naik

Zee Marathi Upcoming Serial : छोट्या पडद्यावर सध्या अनेक नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. नवनवीन विषय आणि नवीन - जुने कलाकार अशी सरमिसळ असलेल्या या मालिका प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यास सज्ज आहे. गेल्या काही महिन्यात कलर्स मराठी आणि स्टार प्रवाहवर नवीन मालिकांची रंग लागली. कलर्सने अगदी आपला चेहरा मोहरच बदलला. मात्र त्याचा म्हणावा तसा फायदा वहिनीला होताना दिसत नाहीये. तर दुसरीकडे झी मराठीने पुन्हा एकदा आपलं टीआरपी यादीमधलं दुसरं स्थान पुन्हा मिळवलं. आता हे स्थान कायम ठेवण्यासाठी झी मराठीने कंबर कसली आहे. झीवर आता एक नवीकोरी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्याचा एक व्हिडिओ चाहत्यांमध्ये व्हायरल झाला आहे. यात दिसणारे कलाकारही प्रेक्षकांनी ओळखले आहेत.

झी मराठीवर नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या मालिकेचा प्रोमो अजून आला नसला तरी मालिकेतील कलाकारांची झलक दाखवणारा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. यात पती पत्नी एका स्कुटरवरून जाताना दिसत आहेत. पतीने आपल्या पत्नीच्या खांद्यावर हात ठेवला आहे. तर जुन्या स्कुटरवरून ते दोघे जाताना दिसत आहेत. या व्हिडिओवरून अनेक नेटकऱ्यांनी त्यांच्या या कलाकारांना ओळखलं आहे. हे कलाकार आहेत तुषार दळवी आणि हर्षदा खानविलकर. तुषार आणि हर्षदा यांची एक नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या मालिकेचं नाव आहे 'लक्ष्मी निवास'. लवकरच झी मराठीवर एक नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यात हे दोघे मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.

अजून तरी या मालिकेबद्दल अधिक माहिती समोर आली नसली तरी ही मालिका कधीपासून सुरू होणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. तर दुसरीकडे कलर्सवरही काही नव्या मालिका प्रदर्शित होणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुन्हा Ee Sala Cup Namde! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा फायनलमध्ये दिमाखात प्रवेश; गुजरात टायटन्सचा लाजीरवाणा पराभव

BJP Government: भाजप सरकार देणार पाच रुपयांमध्ये मासे-भात भोजन; महिलांसाठी अन्नपूर्णा योजनेची घोषणा

Sholay Style Agitation : पाण्याच्या टाकीवर चढून शोले स्टाइलने आंदोलन; जलजीवन योजनेचे पाणी घरापर्यंत पोहोचत नसल्याने केला निषेध

Ambad Rajasthani Women: अंबडमध्ये राजस्थानी महिला मंडळाचा ‘धोंडा रो आगमन’ सोहळा; दीडशे लेकींचा पारंपरिक धोंडे जेवण, आहेर व भेटवस्तूंनी सन्मान

Sakoli Murder Case: गडकुंभली तलाव हत्याकांड उघड: निखिल कांबळे खूनप्रकरणी आरोपी जेरबंद, तलावातून धारदार चाकू व दगड जप्त

SCROLL FOR NEXT