How to identify Deep fake
How to identify Deep fake E sakal
प्रीमियम ग्लोबल

How to identify Deep fake कतरिना, रश्मिका यांच्यासाठी डोकेदुखी ठरलेले deep fake कसे ओळखाल? सरकारी अधिसूचना काय सांगतात?

स्वाती केतकर-पंडित

रश्मिका मंदानाचा डीप फेक व्हिडीओ व्हायरल झाला आणि सगळीकडे एकदम हा विषय चर्चेला आला. अगदी अमिताभ बच्चनपासून इतरही अनेक कलाकारांनी त्याविरुद्ध आवाज उठवला. पार बॉलिवूडपासून हॉलिवूडच्या कलाकारांपर्यंत त्याची चर्चा झाल्यानंतर मग त्यावर पुढे कारवाईची पावलंही उचलण्यात आली.

एकट्या रश्मिकाबाबत नव्हे तर कॅटरीना बाबतही हा प्रकार झाला होता. हॉलिवूडमधील टॉम हँक्स, स्कार्लेट जोहान्सन, बॅटमॅनफेम रॉबर्ट पॅटीसन, ख्रिस्टन बेल अशा अनेकांच्या बाबतीत हे घडलं आहे.

पण मुळात हे डीप फेक तंत्रज्ञान काय आहे? डीप फेक व्हीडिओ म्हणजे काय?

डीप फेक व्हिडिओ हा कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात AI आणि मशिन लर्निंग तंत्रज्ञानाचा वापर करून तयार केलेला एक व्हिडीओ असतो.

हा व्हिडीओ खोटा आणि अनैतिक यासाठी असतो की त्या व्हिडीओमध्ये जी व्यक्ती दिसते ती नसतेच.

म्हणजेच एखाद्या माणसाला दुसऱ्याचा चेहरा लावून हे अशाप्रकारचे व्हिडीओ केले जातात. फोटो मॉर्फिंग आपल्याला माहिती असेल. त्याच पद्धतीने व्हिडीओ फुटेजमध्ये फेरफार करून व्यक्तींनी प्रत्यक्षात कधीही न केलेल्या गोष्टी, अॅक्शन्स त्यांच्याकडून डिजिटली करून घेण्याचा हा अत्यंत किळसवाणा प्रकार आहे.

यात व्यक्तीचा चेहरा आणि शरीरयष्टी याच्यातच बदल होत नाही तर आवाजातही बदल होऊ शकतो.

माणसाचा चेहरा आणि आवाजही बदलू शकणारे हे तंत्रज्ञान अत्यंत घातक आहे.

डीप फेक व्हिडीओ कसे ओळखाल ?

  • डोळ्यांची उघडझाप - आपण माणसं साधारणत: एका विशिष्ट पद्धतीने चेहऱ्याच्या हालचाली करतो. विशेषत: डोळ्यांच्या. डीपफेक व्हिडीओमध्ये डोळे आणि चेहऱ्याच्या हालचालीत विसंगती असते. वरवर पाहता ते कळत नाही पण थोडंसं निरखून पाहिलं की लगेच लक्षात येऊ शकते.

  • ओठ आणि आवाजाचा समन्वय - काही डीप फेक व्हिडीओमध्ये ओठांची हालचाल आणि उच्चारला गेलेला शब्द याचा मेळ लागत नाही.

  • त्वचेचा विचित्र पोत - अनेकदा या डीप फेक व्हिडीओमध्ये त्वचेचा रंग बदललेला असू शकतो. काहीवेळा ती फारच जास्त गुळगुळीत भासते तर काहीवेळा त्यावर पडणारा उजेड आणि त्याच्या सावल्या यात गडबड जाणवते. त्याकडे लक्ष ठेवा.

  • बॅकग्राऊंड- डीप फेक व्हिडीओमध्ये बरेचदा मूळच्या बॅकग्राऊंड्स बदलल्या जातात. त्यामुळे एखाद्या ठिकाणी प्रत्यक्षात घडलेली घटना दुसऱ्या ठिकाणची म्हणून खपवली जाऊ शकते. म्हणूनच त्या व्हिडीओतील आवाज, भाषा, भाषेचे उच्चार आणि त्यातील बॅकग्राऊंड यांचा एकमेकांशी ताळमेळ लागतो आहे का, हे लक्षात घ्या.

  • आवाज आणि दृश्य यांच्यात फरक - बरेचदा व्हिडीओचा आवाज आणि त्यातील दृश्य याच्यात एक फरक जाणवतो. म्हणजे व्यक्ती बोलताना आवाज आधी येऊन ओठ नंतर हलतात किंवा उलटही होऊ शकतं.

  • चेहरा आणि केसांत फरक - एखाद्या सेलिब्रिटीचा किंवा ज्यांचा डीप फेक करायचं आहे, त्यांचा चेहरा जेव्हा मूळ व्हिडीओत चिकटवला जातो तेव्हा त्यात फरक दिसतो.

  • शरीरयष्टीतला फरक - काहीवेळा डीपफेक करताना शरीराच्या काही अंगांना उगाचच उठाव दिला जातो. मात्र प्रत्येक व्यक्तीच्या शरीराचं एक प्रमाण असतं. त्याच प्रमाणात त्यांचे सगळे अवयव असतात. तसे नसतील तर लक्ष द्या.

  • डिजिटल गोंगाट वा शांतता- कधीकधी डीपफेक व्हिडीओतील नेमक्या एडिटेड भागातच आवाज अजिबात नसतो किंवा इतर व्हिडीओपेक्षा काहीसा वेगळा येतो. याचं कारण तो तुकडा तिथे जोडलेला असतो. त्यामुळे त्याकडे लक्ष जरूर ठेवा.

सरकारने याविषयी कारवाई करण्याचं सांगितलं आहे आणि काही अधिसूचनाही जारी केल्या आहेत. त्या काय आहेत?

१.खोटा कंटेट ओळखा : कंपन्यांनी आपल्या प्लॅटफॉर्म्सवर येणारा कंटेंट खरा आहे की खोटा हे ओळखावे. त्याचबरोबर हा कंटेट करताना त्यात डीपफेकचा कोणता वापर केलेला नाही ना, याचा शोध घ्यावा. केवळ डीपफेकच नव्हे तर कोणताही कंटेंट ज्यामध्ये सायबर आणि आयटी कायद्यांचं उल्लंघन होत असेल त्याची ओळख कंपनीने पटवावी, त्यासाठीची एक यंत्रणा तयार करावी आणि अशाप्रकारच्या कंटेंटवर योग्य ती त्यावर कारवाई करावी.

२.जलद कारवाई - २०२१च्या आयटी नियमावलीनुसार असा कोणताही आक्षेपार्ह कंटेट आपल्या प्लॅटफॉर्मवर जात आहे, असे कळल्यास कंपन्यांनी त्यावर तातडीने कारवाई करावी.

३. वापरणाऱ्यांची जबाबदारी - ज्याप्रमाणे कारवाई करणं ही सरकार आणि यंत्रणेची जबाबदारी आहे त्याचप्रमाणे असा कोणताही आक्षेपार्ह कंटेंट किंवा डीपफेक कंटेंट आपण न वापरणं, फॉरवर्ड करणं ही वापरकर्त्यांची जबाबदारी आहे. वापरकर्त्यांनी दिशाभूल करणारा, खोटा अथवा डीपफेक कंटेंट वापरू नये आणि त्याचा प्रचार, प्रसार करू नये.

४. रिपोर्ट करणे - आपण सगळेच सोशल मीडिया अकाऊंट्स वापरत असतो पण या सगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर रिपोर्ट द अकाऊंट असा एक पर्याय असतो. त्याचा योग्य तो वापर केला गेला पाहिजे. म्हणजे वापरणाऱ्यांनीसुद्धा काही चुकीचे आढळल्यास संबंधित सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला ते सांगायला हवं आणि युजरनी रिपोर्ट केल्यानंतर त्यावर त्या प्लॅटफॉर्मने योग्य ती कारवाई तातडीने करायला हवी. रिपोर्ट केलेली अशी कोणतीही गोष्ट, कंटेट ३६ तासांच्या आत काढून टाकला गेला पाहिजे.

५.उत्तरदायित्व आणि डिजिटल बांधिलकी - सोशल मीडिया मध्यस्थांना आठवण करून दिली जाते की माहिती तंत्रज्ञान कायदा आणि नियमांच्या संबंधित तरतुदींनुसार जर त्यांनी कारवाई केली नाही, टाळली अथवा त्यात दिरंगाई केली तर 2021 च्या आयटी नियमावलीतील नियम 7 अंतर्गत दंडात्मक कारवाई होऊ शकते. त्याचबरोबर 2000 च्या माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम 79(1) अंतर्गत वापरकर्त्यांच्या अधिकारांचे संरक्षण करण्यात अयशस्वी ठरलेली संस्था म्हणूनही त्यांच्यावर कारवाई होऊ शकते.

केंद्रीय राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर म्हणाले,“नागरिकांची डिजिटल सुरक्षा आणि विश्वास आमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यामुळेच खोटी माहिती, डीपफेकमुळे उद्भवलेल्या या अडचणी पाहता इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने गेल्या ६ महिन्यात ही दुसरी अधिसूचना जारी केली आहे. त्यातून आम्ही या ऑनलाइन प्लॅटफॉर्म्सना अशाप्रकारे डीपफेकवर कारवाई करण्यास सांगितले आहे.

डीपफेकचे निराकारण करण्यासाठी सरकार सक्रिय आहेच. शिवाय सोशल मीडियावर तयार होणाऱ्या डिजिटल इकोसिस्टीमचीही सरकारला काळजी आहे. त्यामुळेच डिजिटल प्लॅटफ़ॉर्मवरील नागरिकांच्या संरक्षणासाठी सरकार सजग आहे, अशी ग्वाही मंत्र्यांनी दिली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024, KKR vs SRH: कोण गाठणार फायनल? कोलकता-हैदराबादमध्ये रंगणार ‘क्वॉलिफायर वन’चा थरार

Pune Porsche Car Accident : ''जबाबदार लोकप्रतिनिधी म्हणून मी घटनास्थळावर पोहोचलो अन्...'', आमदार टिंगरेंनी अपघाताबद्दल आरोपावर स्पष्टच सांगितलं

Beed Bogus Voting : ''बोगस वोटिंग प्रकरणात कठोर कारवाई करा'' बीडच्या प्रकरणात शरद पवारांनी घातलं लक्ष

Nashik Crime News: आयुक्तालय हद्दीत आचारसंहिता भंगचे 7 गुन्हे! विविध पोलीस ठाण्यांमध्ये अदखलपात्र गुन्हे दाखल

Julian Assange : 'विकीलिक्स'चे संस्थापक असांज यांना लंडनमधील कोर्टाचा मोठा दिलासा! प्रत्यार्पणाला देता येणार आव्हान

SCROLL FOR NEXT