MSMEs Expo esakal
साप्ताहिक

Defence Expo : महाराष्ट्रातील पहिलाच 'डिफेन्स एक्स्पो' कुठे झाला? जाणून घ्या

दोनशेहून अधिक सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग, स्टार्ट-अप आणि अभियांत्रिकी विद्यार्थी या एक्स्पोच्या निमित्ताने आले होते एकत्र..

साप्ताहिक टीम

महाराष्ट्रातील संरक्षण उत्पादन क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना (MSMEs) बळकटी देण्याच्या उद्देशाने राज्य शासनाच्या उद्योग विभागाने आयोजित केलेल्या 'महाराष्ट्र एमएसएमई डिफेन्स एक्स्पो'ला मोठा प्रतिसाद मिळाला.

पिंपरी-चिंचवडमधील आंतरराष्ट्रीय प्रदर्शन आणि कन्व्हेन्शन सेंटर येथे झालेला हा एक्स्पो महाराष्ट्रातील पहिलाच डिफेन्स एक्स्पो होता. या एक्स्पोमध्ये तिन्ही सेना दलांचा महत्त्वाचा सहभाग होता. दोनशेहून अधिक सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग, स्टार्ट-अप आणि अभियांत्रिकी विद्यार्थी या एक्स्पोच्या निमित्ताने एकत्र आले होते.

आत्मनिर्भर भारत योजनेअंतर्गत संरक्षण उत्पादन क्षेत्राला चालना देण्यासाठी महाराष्ट्राने २०१७ मध्ये संरक्षण आणि हवाई उत्पादन धोरण आखले होते, त्यात सुधारणा केली जाईल, असे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २४ फेब्रुवारी रोजी या एक्स्पोचे उद्‌घाटन करताना सांगितले.

तिन्ही सेना दलांच्या प्रमुखांची उपस्थिती, संरक्षण उत्पादन क्षेत्रातील उद्योजकांची संरक्षण- संबंधित उत्पादने, तंत्रज्ञान आणि सेवांचे प्रदर्शन आणि त्यानिमित्ताने झालेल्या चर्चा, नॉलेज सेमिनार हे या एक्स्पोचे वैशिष्ट्य ठरले.

  • क्षेपणास्त्रसज्ज लष्करी वाहन

  • वायुदलाच्या हेलिकॉप्टरने अनेकांना असे आकर्षून घेतले.

  • एक्स्पोच्या उद्‌घाटनानंतर प्रदर्शनातील स्वयंचलित रायफल घेऊन नेम धरण्याचा मोह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही आवरला नाही.

  • बॉम्बशेल

  • ड्रोन

  • अँटि-ड्रोन गन माउंट सिस्टिम

  • नौसैनिकांची खिळवून ठेवणारी प्रात्यक्षिके

  • लष्करप्रमुख जन. मनोज पांडे (उजवीकडे)

  • वायुसेनाप्रमुख एअर चिफ मार्शल विवेक राम चौधरी (डावीकडे) यांच्यासमवेत एक्स्पोचे नॉलेज पार्टनर निबे लिमिटेडचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक गणेश रमेश निबे

  • पिनाक रॉकेट लाँचर

  • नौदलप्रमुख ॲडमिरल आर. हरी कुमार प्रदर्शनाची पाहणी करताना

    ------------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पहिला गुन्हा दाखल झाल्यानंतर काय होती राज ठाकरेंची प्रतिक्रिया? अमित ठाकरेंनी भूमिका स्पष्ट करत सगळंच सांगितलं...

Pune Youth Murder in College Campus : पुण्यात खळबळ!, सिंहगड कॉलेज परिसरात भरदिवसा तरूणाची कोयत्याने वार करून हत्या

Sheikh Hasina: शेख हसीना यांना फाशीची शिक्षा; भारत आता त्यांना परत बांगलादेशात पाठवणार का? जाणून घ्या नियम...

Latest Marathi Breaking News:आदित्य ठाकरेंनी ट्विट करत केलं अमित ठाकरेंचं समर्थन

Kolhapur News: गोकुळच्या लिंगनूर कार्यक्रमात ‘लाडकी बहीण’ वरुन रंगले कलगीतुरे

SCROLL FOR NEXT