true face of human  esakal
साप्ताहिक

Marathi Poem : कुणास ठाऊक...

Marathi Kavita : खरे चेहरे, की मख्ख मुखवटे? कुणास ठाऊक...

साप्ताहिक टीम

By : प्रा. संभाजी पाटील

आयुष्याच्या वाटेवर आणखी काय लिहून ठेवलंय,

कुणास ठाऊक...

चाल..चाल... अथक चालतोय, कुणासाठी,

कुणास ठाऊक...

सावली धरण्याचा प्रयत्न...

अन् स्वतःची प्रतिमा जपण्यासाठीच का?

कुणास ठाऊक...

कित्येक भेटले, अविस्मरणीय अनुभव दिले...

खरे चेहरे, की मख्ख मुखवटे?

कुणास ठाऊक...

ओळखतो.. पारखतो पुन्हा पुन्हा निरखतो...

आता नजरही मरू लागलीय?

कुणास ठाऊक...

आशावादी राहून...

विश्वासाने पाठीवर घेऊन अनेकांना सुरक्षित किनारे दाखवले

त्याच किनाऱ्यावरुन कुत्सितपणे पाहणारे चेहरेही पाहिले...

तरीही आपणच जन्माला का घालतो?

कुणास ठाऊक...

संकटसमयीच असतो माणूस...

सुखात असता दुसऱ्यांना का दुःख देतो!

कुणास ठाऊक...

प्रश्न आहे की हे उत्तर? ज्याने त्याने ठरवावे...

कोण खरे अन् कोण खोटे... पुरता होतोय गोंधळ...

बुद्धीला ताण, कशासाठी!

कुणास ठाऊक..

अल्पसे हे आयुष्य आपले...

नेमकी धडपड कशासाठी ?

कुणास ठाऊक...

या कलियुगी प्रत्येकाने शोधावा स्वतःमधील खरा माणूस....

अन्यथा सारंच व्यर्थ वाटतंय

का कुणास ठाऊक...?

का कुणास ठाऊक...?

------------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Election Commission of India : SIR वरून निवडणूक आयोगात मतभेद?, आयोगाकडून स्पष्टीकरण; दोन आयुक्तांनी १० महिन्यांत १४ वेळा आक्षेप घेतल्याचा दावा

Job Fair: दहावी पास तरुणांना LIC सह १८ कंपन्यांत थेट मुलाखतीतून नोकरीची संधी! फक्त एकच अट, कसा करायचा अर्ज ?

Ausа Drought Crisis : देवाभाऊ, शेतकऱ्यांसाठी देवदूत बना! दुष्काळात होरपळलेल्या शेतकऱ्यांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टाहो

Marathi News Live Updates : मतांची चोरी हा भारतीय जनतेविरुद्धचा गुन्हा आणि संविधानावरील थेट हल्ला : राहुल गांधी

Devendra Fadnavis Drought Tour : दुष्काळावर सरकारचा ॲक्शन प्लॅन; मुख्यमंत्र्यांची लातुरात कर्जमाफी, पाणी आणि मदतीबाबत मोठी घोषणा !

SCROLL FOR NEXT