millets esakal
साप्ताहिक

Millet food: भरडधान्यांचे स्नॅक्स: पौष्टिक आणि रुचकर देखील..!

सकाळ डिजिटल टीम

मृणाल तुळपुळे

बाजरी व पालकच्या पुऱ्या

वाढप : साधारण १० पुऱ्या

साहित्य

एक वाटी बाजरीचे पीठ, १ मोठा चमचा तांदळाचे पीठ, अर्धी वाटी बारीक चिरलेला पालक, १ मोठा चमचा तेलाचे मोहन, १ चमचा तीळ, चिमूटभर हळद व चवीला मीठ.

कृती

बाजरी व तांदळाचे पीठ एकत्र करावे. त्यात पालक, तीळ, हळद व मीठ घालून कालवावे. गरम तेलाचे मोहन व जरुरीप्रमाणे पाणी घालून घट्ट पीठ मळावे. थोडावेळ झाकून ठेवावे. त्या पिठाच्या लाट्या करून पुऱ्या लाटाव्यात व गरम तेलात लालसर तळून घ्याव्यात.

नाचणीच्या इडल्या

वाढप : साधारण १२ इडल्या

साहित्य

एक वाटी नाचणीचे पीठ, १ वाटी इडली रवा, अर्धी वाटी उडीद डाळ, मीठ.

कृती

इडली रवा आणि उदीद डाळ वेगवेगळे भिजत घालावे. चार तास भिजल्यावर उडीद डाळ बारीक वाटून घ्यावी. एका भांड्यात काढून त्यात भिजलेला इडली रवा घालावा. नाचणीचे पीठ पाण्यात कालवून घ्यावे आणि नंतर डाळ व रव्याच्या मिश्रणात घालून चांगले एकजीव करावे. झाकून उबदार जागेत फुगण्यास ठेवावे. पीठ चांगले फुगल्यावर त्यात चवीला मीठ घालून इडली पात्रात इडल्या वाफवून घ्याव्यात.

टोमॅटो ऑमलेट

वाढप : चार ऑमलेट

साहित्य

प्रत्येकी अर्धी वाटी ज्वारी, बाजरी व डाळीचे पीठ, १ मोठा टोमॅटो व अर्धा कांदा बारीक चिरून, १ लहान चमचा आले व हिरवी मिरची वाटून, चमचाभर बारीक चिरलेली कोथिंबीर, चवीला मीठ.

कृती

ज्वारी, बाजरी व डाळीचे पीठ एकत्र करून घ्यावे. त्यात उरलेले सर्व जिन्नस घालावेत. थोडे थोडे पाणी घालून सरसरीत पीठ भिजवावे. तव्यावर तेल घालून त्यावर डावभर मिश्रण पसरावे व झाकण ठेवावे. अशा पद्धतीने दोन्ही बाजूंनी भाजावे.

ज्वारीच्या पिठाची धिरडी

वाढप : ४ धिरडी

साहित्य

१ वाटी ज्वारीचे पीठ, अर्धी वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर, चिमूटभर खायचा सोडा, थोडी जिरे पूड , १ चमचा तेल. चवीला मीठ .

कृती

सर्व पदार्थ एकत्र करून त्यात पाणी घालून पळीवाढे पीठ भिजवावे. तव्यावर तेल गरम करून त्यावर पीठ घालावे. वरून थोडे तेल घालावे . दोन्ही बाजूंनी खरपूस भाजावे.

वरीची खीर

वाढप : ४-५ वाट्या

साहित्य

दोन मोठे चमचे वरीचे तांदूळ, ३ वाट्या दूध, २ मोठे चमचे साखर, १ चमचा तूप, चिमूटभर वेलची पूड, सुकामेवा.

कृती

वरी तुपावर परतून घ्यावी, परतल्यावर दूध घालून शिजवून घ्यावी. गार झाल्यावर हाताने कुस्करावी. पातेल्यात उरलेले दूध, साखर, सुकामेवा, वेलची पावडर असे एकत्र करावे. त्यात कुस्करलेली वरी घालून एकजीव करावे. गॅसवर ठेवून चमच्याने हलवत हलवत खीर उकळावी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नगराध्यक्षांची निवड जनतेतूनच! दिवाळीतच वाजणार निवडणुकांचा बिगुल; पहिल्या टप्प्यात नगरपालिका किंवा झेडपी, पंचायत समित्यांची निवडणूक

Morning Breakfast Recipe: सकाळी नाश्त्यात बनवा हेल्दी एग रोल, पाहा रेसिपीचा Video

आजचे राशिभविष्य - 03 ऑक्टोबर 2025

अग्रलेख : अस्वस्थ स्वातंत्र्ययोद्धा

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 03 ऑक्टोबर 2025

SCROLL FOR NEXT