how to save money on home loan re-payment EMI
how to save money on home loan re-payment EMI Esakal
Home Loan

Home Loan मुळे चिंताग्रस्त आहात तर या टिप्सच्या मदतीने गृह कर्जातून होवू शकते बचत

सकाळ डिजिटल टीम

Save Money on Home Loan Re-payment: स्वत:च घर असावं असं प्रत्येकालाच वाटत. ते घेण्यासाठी प्रत्येकजण काटकसर करत असतो. मात्र अलिकडे घरांच्या वाढलेल्या किमती पाहता गृहकर्जाशिवाय पर्याय उरत नाही. होम लोन Home loan घेऊन घर घेतलं तरी त्यानंतर चिंता असते ती हे होम लोन फेडण्याची.

गृहकर्जाचा कालावधीदेखील (Home Loan Tenure) बराच मोठा म्हणजेच साधारण १५-२० वर्ष इतका असतो. Save Money By Planning Repayment of Home Loan

कर्जाची रक्कम आणि व्याजाची रक्कम मिळून आपण प्रत्यक्षात मोठी रक्कम भरत असतो. एकीकडे प्रत्येक वर्षाला वाढणारी महागाई त्यात दर महिन्याला घराचा हप्ता भरणं Home loan EMI यामुळे मोठा ताण येतो. मात्र गृहकर्ज घेताना आणि घेतल्यानंतर काही गोष्टींची दखल घेतली तर होम लोन फेडणं सोप जाऊ शकतं शिवाय तुमची बचही होवू शकते. 

गृहकर्जात रिपेमेंट आणि प्रिपेमेंट यासह आणखी काही गोष्टी अशा आहेत ज्यामुळे तुमची बचत होवू शकते त्या कोणत्या हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. 

व्याजदर कमी करण्यासाठी बँकेसोबत चर्चा- गृहकर्ज घेताना आपण सगळ्यात आधी कोणत्या बँकेत व्याजदर कमी आहे हे पाहवं. त्यानंतरही बँकेत व्याजदर कमी करण्यासाठी विनंती करावी. एक प्रकारे बार्गेनिंग करणं इथेही गरजेचं असतं. बर्याचदा पूर्ण टक्का नव्हे पण अर्धा टक्का किंवा त्याहून कमी व्याज दर कमी झाला तरी त्यात तुमचा फायदा असतो.

कारण गृहकर्जाची रक्कम मोठी असल्याने त्याचं व्याजही जास्त असतं. मोठा फरक पडतो, तुम्ही बँकेची जुने ग्राहक असला किंवा तुमचं रेकॉर्ड चांगलं असेल तर व्याजदर कमी होण्याची शक्यता असते. अर्थात हे प्रत्येक बँकेच्या धोरणावर अवलंबून असतं. त्यामुळे व्याजदर कमी होईलच याची शाश्वती नाही.

होम लोनचं प्रिपेमेंट- गृहकर्ज घेतल्यानंतर सुरुवातीचा काही काळ हा तुम्ही प्रिन्सिपल पेक्षा जास्त व्याज भरत असता. म्हणजेच जर तुमचा हप्ता २५ हजार रुपये आहे तर जवळपास १५ हजार तुम्ही व्याज भरत असता.

त्यामुळे कर्ज घेतल्यानंतर काही काळात तुमच्याजवळ एखादी मोठी रक्कम आल्यास तुम्ही प्रिपेमेंट करून कर्जाचा कालावधी कमी करू शकता. हे करत असताना मात्र प्रिपेमेंट चार्जेसची माहिती घ्यावी. तसचं लोन लवकर म्हणजेच प्रिक्लोझ करण्यासाठीच्या चार्जेसती माहिती घ्यावी. Lone Foreclosure Charges

EMI वाढवणे- कर्जाचा कालावधी हा मोठा म्हणजेच १५-२० वर्षांचा असतो. कर्ज घेते वेळी सुरु असलेल्या उत्पन्नानुसार एकूण खर्च लक्षात येऊन मासिक हप्ता म्हणजेच EMI लागू केला जातो. मात्र बर्याचदा काही वर्षांनंतर उत्पन्नात वाढ होते. जसं की पगारवाढ, बोनस, व्यवसाय विस्तार अशावेळी आपण बँकेशी चर्चा करून EMIची रक्कम वाढवू शकता.

यामुळे तुमच्या कर्जाची मुद्दल कमी होईल परिणामी कर्जावर आकारण्यात येणार व्याजही कमी होईल. आणि कर्जातून तुमची काही वर्ष लवकर सुटका होईल. त्यामुळे उत्तन्न वाढल्यानंतर वाढलेल्या गरजांवर किंवा चैनीच्या वस्तूंवर खर्च न करता तो EMI कडे वळवणं गरजेचं आहे. 

हे देखिल वाचा-

गृहकर्ज हस्तांतरित करणे- तुमची बँक तुमच्याकडून अधिक व्याज आकारतेय असं तुम्हाला वाटत असेल आणि याचवेळी इतर बँकेत व्याजदर कमी आहे असं वाटल्यास तुम्ही होम लोनचा बॅलन्स दुसऱ्या बँकेत ट्रान्सफर करू शकता.

म्हणजेच तुमचं कर्ज दुसऱ्या बँकेकडे हस्तांतरित करू शकता. (Transfer Home Loan). मात्र हे करण्यापूर्वी तुम्हाला तुमच्या बँकेला भरावी लागणारी पेनल्टी फी आणि दुसऱ्या बँकेची प्रोसेसिंग फी याचा हिशोब करावा लागेल.

यात तुमचं नुकसान होत नाही ना हे लक्षात घेऊनच लोन ट्रान्सफर करावं. दुसऱ्या बँकेत व्याज कमी असल्याने तुमच्याकडे EMIची रक्कम वाढवण्याचा पर्यायदेखील उपलब्ध होतो.

वेळीच गुंतवणूक करा- योग्य ठिकाणी गुंतवणूक करणं हा बचतीचा उत्तम पर्य़ाय आहे. जर तुम्ही वेगवेगळ्या ठिकाणी गुंतवणूक केली असेल तर घर खरेदी करताना तुमच्याकडे डाउन पेमेंटसाठी चांगली रक्कम जमू शकते.

घर घेतेवेळी डाउन पेमेंट जास्त करून कमी कर्ज घेणं हा कधीही चांगला पर्याय. यासोबतच तुम्ही आधी गुंतवणूक केली नसली तरी घर घेण्याचा विचार करत असाल तर गंतुवणूक सुरू करा. बऱ्याचदा घर घेण्याचा विचार सुरू केल्यानंतर २-३ वर्षांनी प्रत्यक्षात घर घेतलं जातं.

त्यामुळे आधीच गुंतवणूक करून बचत सुरू करा. यासाठी तुम्ही म्युचिअल फंड किंवा शेअर्स खरेदी करू शकता. याशिवाय गृहकर्ज घेतल्यानंतर ५-७ अशी कालांतराने गुंतवणूक केलेली गुंतवणूक नफ्यासह परत आल्यास त्यातून प्रिपेमेंटही करू Loan pre-payment शकता. 

त्याचप्रमाणे तुम्ही वर्षाला एक EMI जास्त भरूनही दिलासा मिळवू शकता. म्हणजेच यासाठी तुम्हाला १२ महिन्यांमध्ये १३ EMI भरावे लागतील.  

गृहकर्ज फेडणं हे परवडणारं नसलं तरी काही युक्त्या वापरून तुम्ही बचत करू शकता शिवाय कमी कालावधीत कर्ज फेडू शकता. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha Election 2024 : हुश्श..! प्रचार संपला, राज्यात तोफा शांत, तलवारी म्यान

‘चार सौ पार’ पासून बहुमताच्या आकड्यापर्यंत

सत्ता ठरवणारा उ त्त र रं ग

प्रसारणाचं धोरण नवं उत्तमातलं उत्तम हवं

सिक्स जी : भविष्यातली डिजिटल-क्रांती

SCROLL FOR NEXT