टाऊनशीपचा ट्रेंड
टाऊनशीपचा ट्रेंड Esakal
Home Loan

Property Investment : निवासी प्रकल्पातील मधली गुंतवणूक ठरेल अधिक फायद्याची

नरेंद्र जोशी

निवासी संकुल संकल्पना आजकालच्या पिढीला आवडणारी संकल्पना ठरते आहे. या संकुलातील घरे महागडी असली तरी आरामदायी आणि सर्व सोयी सुविधा उपलब्ध असल्याने अशा प्रकारच्या संकुलाकडे Complex झुकता कल दिसून येतो. Township Trend increasing in Metro cities like Pune Mumbai

मागील पाच-सहा वर्षांपासून पुणे- मुंबईत Pune Mumbai उभारण्यात येणाऱ्या निवासी प्रकल्पातील अधिकाधिक प्रकल्प हे निवासी संकुल Residential Complex प्रकारातील असल्याचे दिसून येते. हा ट्रेंड अन्य शहरातही विस्तारत असून नाशिक Nashik, नागपूर भागात निवासी संकुल मोठ्या संख्येने वाढलेले आहेत.  

विशेषतः मोठे उद्योग समूह निवासी संकुल उभारणीसाठी पुढाकार घेताना दिसून येतात. आपण राहत असलेल्या घराचे कालांतराने प्रॉपर्टीत रुपांतर होते.

घर विकत घेताना त्याकडे केवळ गुंतवणूक किंवा वीकेंडसाठी वेळ घालविण्याचे ठिकाण असा विचार न करता अनेकांची त्यात भावनिक आणि आर्थिक गुंतवणूक असते. अशा प्रकारच्या निवासी संकुलात घर घेण्यामागे अनेक कारणे असू शकतात.  

साधारणत: तीन प्रकारची निवासी संकुल असलेली दिसतात. जसे की, कॉम्पलेक्स, अल्ट्रा स्मॉल बिल्डींग आणि स्मॉल बिल्डींग्ज. एका निवासी संकुलामध्ये साधारणत: ५०- ६० अपार्टमेंट असतात. एखादे छोटे गाव म्हणूनही याकडे आपल्याला पाहता येईल. 

हे देखिल वाचा-

 निवासी संकुलाच्या प्रकल्पात इमारती हायराईज (उंच) असतात आणि या संकुलाच्या परिसरात असणारी अपार्टमेंटमधील घरांचे आकार वेगवेगळा असतो. या ठिकाणी जिम्नॅशियम, स्पोर्टस् कॉम्पलेक्स, मोठे वाहनतळ, गार्डन कोर्ट, मंदिर, स्विमिंग पूल, कम्युनिटी हॉल यांसारख्या सुख सोयी निवासी संकुलात आपणास पाहावयास मिळतात.

येथील सुरक्षा यंत्रणा उत्तम दर्जाची असते. शहरालगत उभारलेल्या या निवासी संकुलातील मुबलक पाणी, सौरऊर्जेवरील दिव्यांचे नियोजन, वाहतूक व्यवस्था याबाबत नेटके नियोजनामुळे अनेक ग्राहक अशा संकुलाकडे आकर्षित होताना दिसतात.  

शहरालगतच अशा प्रकारची संकुल असल्याने शहराची कनेक्टव्हिटीही कायम असते. स्मॉल बिल्डिंगमध्ये तीस ते साठ सदनिका असतात तर लहान प्रकल्पांमध्ये हीच संख्या ३० घराच्या आसपास असतात. तर स्वतंत्रपणे राहण्याचा जे विचार करतात त्यांना स्मॉल आणि अल्ट्रा स्मॉल बिल्डिंग सारखे पर्याय चांगले घर मिळवून देतात. मात्र ही घरे तुटक असतात.  

गुंतवणुकदारांसाठी देखील निवासी संकुल हा एक उत्तम पर्याय मानला जातो. निवासी संकुलाचे काम सुरू होताना आणि पूर्ण झाल्यानंतर घराच्या किंमतीत झालेला बदल आपल्याला खूप लाभदायी ठरू शकतो. निवासी संकुलाचे महत्त्व पाहता या ठिकाणी केली जाणारी गुंतवणूक ही निश्चितच अपेक्षेपेक्षा अधिक फायदा मिळवून देणारी ठरते.  

महानगरात चांगल्या ठिकाणी घर मिळणे ही एक कठीण बाब बनलेली जाणवते. पुण्याचाच विचार करायचा म्हटले तर सर्वांनाच कोथरूड किंवा कोरेगाव पार्कसारख्या जागेची उपलब्धता व किंमत लक्षात घेता शहरालगत उभारण्यात येणार्‍या मोठ्या निवासी संकुलात घराची निवड करून शहरातील वातावरण अनुभवण्याचा प्रयत्न करावयास हरकत नाही. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Lok Sabha 2024 phase 4 Election Voting LIVE : लोकसभेच्या चौथ्या टप्प्यातील मतदानाला सुरूवात; अल्लू अर्जुन, ज्यु. एनटीआरने केलं मतदान

मतदार यादीतून तुमचे नाव वगळले आहे का? 2 कागदपत्रांसह ‘येथे’ फार्म नंबर-6 भरा, 7 दिवसात समाविष्ठ होईल नाव; लोकसभेला मतदार यादीत नाव नसल्याच्या तक्रारी

Sakal Podcast: महाराष्ट्रात आज ११ जागांसाठी मतदान ते महाराष्ट्रात आढळला कोरोनाचा नवा व्हेरियंट!

Latest Marathi News Live Update : राज्यभरात वळवाचा दणका सुरूच, बहुतांश ठिकाणी आजही ढगाळ हवामान

नवीन शिक्षकांना ‘पुन्हा बदली मागणार नाही’ असे लेखी देण्याचे बंधन! विनंती बदल्यानंतर नवीन भरती झालेल्यांना नियुक्ती; विनंती बदलीसाठी 3000 अर्ज

SCROLL FOR NEXT