Reconsideration petition regarding Tukde Bandi Act Bench decision Registration property  esakal
Land

Tukde Bandi Act : तुकडा बंदीबाबतची फेरविचार याचिका फेटाळली

खंडपीठाचा निर्णय ; खरेदी खत नोंदविणे सुरूच राहणार

सकाळ वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर : तुकडाबंदी संबंधी काही महिन्‍यांपूर्वी खंडपीठाने दिलेल्या आदेशासंबंधी शासनाने दाखल केलेली पुनर्विलोकन याचिका गुरुवारी (ता. १३) मुंबई उच्‍च न्‍यायालयाच्‍या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. रवींद्र घुगे, न्‍या. एस. जी. मेहेरे यांनी फेटाळून लावली. त्‍यामुळे काही महिन्‍यांपूर्वी दिलेल्या खंडपीठाचा निर्णय कायम असून खरेदीखत सुरुच राहणार आहे.

राज्‍य शासनाने १२ जुलै २०२२ ला तुकडाबंदीसंदर्भात परिपत्रक काढले होते. महाराष्‍ट्र नोंदणी नियम १९६१ चे नियम क्रमांक ४४ (९) (ई) अन्वये सर्व जिल्हा निबंधक, दुय्यम निबंधकांना आदेश दिले होते. औरंगाबाद खंडपीठाने हे परिपत्रक रद्द करत, नोंदणीसाठी आलेले दस्त परिपत्रकामुळे नाकारू नये असे आदेश दिले होते.

या निर्णयाला राज्य शासनाने पुनर्विलोकन याचिकेद्वारे औरंगाबाद खंडपीठात आव्‍हान दिले. याचिकेनुसार, न्‍यायालयाने दिलेला निकाल चुकीचा आहे. अशा प्रकारे दस्‍त नोंदणी व्‍हायला लागले तर इतर कायद्यांच्‍या तरतुर्दीचा भंग होईल असे मुद्दे मांडण्यात आले होते. पुनर्विलोकन याचिकेवर नुकत्‍याच झालेल्या सुनावणीवेळी मूळ याचिकाकर्त्‍यांतर्फे सांगण्‍यात आले की, खंडपीठाने दिलेला निकाल योग्य आहे.

शासनाने नोंदणी कायद्याच्‍या कलम ३४३ व ३३५ नुसार नोंदणी करतेवेळी दस्‍त नोंदणी करणाऱ्या व्‍यक्तीने नोंदणी करणाऱ्यांचा चेहरा, त्‍यांचे दस्‍त व्‍यवस्थित आहेत का, स्‍टॅम्पड्युटी भरली आहे का, काळ्या शाईचा उपयोग केला आहे का आदी बाबी तपासल्या पाहिजेत, असा युक्तिवाद केला. दोघांचे म्हणणे ऐकून खंडपीठाने शासनाने दाखल केलेली पुनर्विलोकन याचिका फेटाळली.

असे आहे प्रकरण

नोंदणी महानिरिक्षक व मुद्रांक नियंत्रक (पुणे) यांनी १२ जुलै २०२१ रोजी परिपत्रक काढून व महाराष्ट्र नोंदणी नियम १९६१ चे नियम ४४ (१)(I) अन्वये सर्व जिल्हा निबंधक, दुय्यम निबंधक यांना आदेश दिले होते. महाराष्ट्र धारण जमिनीचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध असल्याने खरेदीखत नोदवण्यापूर्वी मंजूर केलेला पोट विभाग किंवा रेखांकन खरेदी दस्तासोबत जोडलेला नसल्यास नोंदणीसाठी स्वीकारण्यात येऊ नये असे आदेश दिले होते.

त्यामुळे याचिकाकर्ते गोविंद रामलिंग सोलापुरे, प्रकाश गडगूळ व कृष्णा रावसाहेब पवार यांनी ॲड. रामेश्वर तोतला यांच्या मार्फत नोंदणी महानिरिक्षकांच्या परिपत्रकाला आव्हान दिले होते.

सर्वोच्‍च न्‍यायालयात दाद मागता येणार

या आदेशविरोधात सर्वोच्‍च न्‍यायालयात दाद मागण्‍यासाठी या आदेशाला चार आठवडे स्‍थगिती द्यावी अशी विनंती शासनाने केली. त्‍यावर खंडपीठाने तुकडा बंदीबाबत यापूर्वी दिलेला आदेश चार आठवड्यांसाठी कायम ठेवला आहे.

त्‍यामुळे शासनाला सर्वोच्‍च न्‍यायालयात दाद मागण्‍याचा मार्ग मोकळा झाला. याचिकाकर्त्यातर्फे ॲड रामेश्वर तोतला यांनी काम पाहिले, त्यांना ॲड राहुल तोतला, ॲड. रिया जरीवाला, ॲड. स्वप्नील लोहिया, ॲड. रजत मालू, ॲड. गणेश यादव यांनी सहकार्य केले. तर शासनातर्फे ॲड. आर.एन. धोर्डे यांनी काम पाहिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: गुरुपौर्णिमेनिमिच्या दिवशी सोन्याची गोड बातमी! सलग दुसऱ्या दिवशी भाव घसरले; मुंबई-पुण्यातील ताजा सोनं-चांदीचा भाव पाहा

Pandharpur Flood: चंद्रभागा नदी दुथडी भरून वाहू लागली; उजनीचे पाणी पंढरीत पोचले, दगडी पुलासह आठ बंधारे पाण्याखाली

१६ दिवसांपूर्वी उद्घाटन, १६ कोटींचा पूल पहिल्याच पावसात खचला; काँग्रेस नेता पोहोचला दुर्बिण घेऊन

Live Marathi News Update : शेतकऱ्यांना मोबदला न दिल्याने बांधकाम विभागावर जप्तीची कारवाई

Nashik Earthquake: भूकंपाने नाशिक जिल्हा हादरला, 4 दिवसांत 7 सौम्य धक्के; सुरगाणा-दिंडोरीच्या भूगर्भीय रचनेचा परिणाम

SCROLL FOR NEXT