Serum Institute of India Sakal
पुणे

आदर पूनावाला यांच्या नावे बनावट संदेश पाठवून सीरम इन्स्टिट्युटची एक कोटी फसवणूक

सीरम इन्स्टिट्युटचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदर पूनावाला यांच्या नावाने समाजमध्यमावर बनावट संदेश पाठवून सीरम इन्स्टिट्युटची तब्बल एक कोटी रुपयांची फसवणुक करण्यात आली.

सकाळ वृत्तसेवा

सीरम इन्स्टिट्युटचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदर पूनावाला यांच्या नावाने समाजमध्यमावर बनावट संदेश पाठवून सीरम इन्स्टिट्युटची तब्बल एक कोटी रुपयांची फसवणुक करण्यात आली.

पुणे - सीरम इन्स्टिट्युटचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदर पूनावाला यांच्या नावाने समाजमध्यमावर बनावट संदेश पाठवून सीरम इन्स्टिट्युटची तब्बल एक कोटी रुपयांची फसवणुक करण्यात आली. याप्रकरणी बंडगार्डन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी सीरम इन्स्टिट्युटचे वित्तीय अधिकारी सागर कित्तुर (वय 44 , रा. कोंढवा) यांनी बंडगार्डन पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सागर कित्तुर हे सीरम इन्स्टिट्युटमध्ये वित्तीय व्यवस्थापक आहेत. तर सतीश देशपांडे हे कंपनीचे संचालक आहेत. दरम्यान, काही दिवसांपुर्वी आदर पूनावाला यांच्या नावाने देशपांडे यांना संदेश पाठविण्यात आला. त्यामध्ये काही बॅंक खात्यांचे तपशील देऊन त्यावर तत्काळ पैसे पाठविण्यास सांगण्यात आले.

संबंधित संदेश हा खरा वाटल्याने देशपांडे यांनी त्यांच्या कंपनीच्या खात्यावरुन विविध बॅंक खात्यावर एकूण एक कोटी एक लाख रुपये भरले. त्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर याप्रकरणी पोलिसांकडे फिर्याद देण्यात आली. या प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अश्विनी सातपुते करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Audio Clip: उद्घाटनाच्या कार्यक्रमाला 70 हजार रुपये; हॉटेल भाग्यश्रीच्या मालकाचा रेट फिक्स! ऑडिओ क्लिप व्हायरल

हृदयद्रावक! ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या संघातील फुटबॉलपटू Diogo Jota चा कार अपघातात मृत्यू, १० दिवसांपूर्वीच झालं होतं लग्न

Thackeray Rally: मुंबईत ५ जुलैला ठाकरे बंधूंची संयुक्त रॅली, तयारीसाठी बैठकांचा सपाटा, पण अजून पोलिसांची परवानगी नाही

Nashik Police Transfers : नाशिक पोलिस उपायुक्तांच्या बदल्या; नवीन नियुक्तीला उशीर का?

‘गुलाबी साडी’ फेम संजू राठोडची मराठी गाणी बॉलिवूडमध्ये झळकणार....

SCROLL FOR NEXT