cri.jpg
cri.jpg 
पुणे

मोबाईल खरेदी...पुण्यातील 'ती' तरुणी...अन् सव्वा लाख...

सकाळवृत्तसेवा

पुणे ः कॉर्पोरेट कंपनीमध्ये काम करणाऱ्या एका तरुणीचा मोबाईल खरेदी करण्याचा बहाणा करून सायबर गुन्हेगाराने तरुणीच्या मोबाईलसह सव्वा लाख रुपयांची फसवणूक केली. याप्रकरणी सायबर पोलिसांनी अनोळखी व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. 

याप्रकरणी महंमदवाडी येथील 21 वर्षीय तरुणीने सायबर पोलिसांकडे फिर्याद दिली. सायबर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक जयराम पायगुडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या शहरातील एका कॉर्पोरेट कंपनीमध्ये काम करतात. त्यांच्याकडील महागडा मोबाईल त्यांना विकायचा होता. त्यासाठी त्यांनी त्यांच्या 90 हजार रुपये किमतीच्या मोबाईलची ओएलएक्‍स या ऑनलाइन वस्तू खरेदी-विक्री करणाऱ्या संकेतस्थळावर जाहिरात केली.

त्यानुसार, सहा जून रोजी त्यांना एका अनोळखी व्यक्तीने संपर्क साधला. त्यांना फिर्यादीचा मोबाईल पसंत पडला. त्यानंतर त्याने फिर्यादीचा विश्‍वास संपादन करून त्यांचा मोबाईल कुरिअरद्वारे मागवून घेतला. त्यानंतर त्याने फिर्यादी 90 हजार रुपयांची रक्कम पाठविण्यापूर्वी त्याने दिलेल्या बॅंक खात्यावर 30 हजार रुपये जमा करण्यास सांगितले. त्यानुसार, तरुणीने 30 हजार रुपये संबंधित खात्यावर जमा केले. त्यानंतर एक लाख 20 हजार रुपयांची रक्कम मिळावी, यासाठी संबंधित व्यक्तीकडे पाठपुरावा केला, मात्र तिला प्रतिसाद मिळाला नाही. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तिने पोलिसांकडे तक्रार दाखल केली. त्यानुसार, पोलिसांनी अनोळखी व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

(Edited by : Sagar Diliprao Shelar)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Solapuri Chaddar : मोदींना गिफ्ट दिलेल्या सोलापुरी चादरीचा इतिहास माहित आहे का ?

Latest Marathi News Live Update : तुमची संपत्ती लुटणारं सरकार तुम्हाला हवं आहे का? पंतप्रधान मोदींची पुन्हा काँग्रेसवर टीका

Heat Wave : विदर्भात आजपासून उष्णतेची लाट, नागरिकांनी काळजी घेण्याची गरज

Sangli Lok Sabha : 'जयंत पाटील काड्या करण्यात आणि संजय पाटील थापेबाजीत पटाईत'; माजी आमदाराची जोरदार टीका

Babil Khan: इरफान खानच्या लेकाचं होतंय कौतुक; पाण्याच्या समस्येसाठी काम करणाऱ्या संस्थेला केली मोठी आर्थिक मदत

SCROLL FOR NEXT