पुणे

जुन्नर तालुक्यातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या पोहोचली दहावर...

दत्ता म्हसकर

जुन्नर : मुंबईहून सावरगाव ता.जुन्नर येथे आलेल्या कुटुंबातील दोन पॉझिटिव्ह रुग्णाच्या सहवासात आलेले आणखी चार जणांचा तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे  सावरगाव येथील एकूण रुग्णांची संख्या सहा झाली असून, तालुक्यातील रुग्णांची संख्या दहावर गेली आहे. त्या दोघांच्या संपर्कात आलेल्या तेरा जणांच्या घशातील द्रव्याचे नमुने लेण्याद्री येथील कोविड सेंटर येथे घेण्यात आले होते. तेरापैकी सात जणांचे अहवाल प्राप्त झाले असून, यातील चार पॉझिटिव्ह तर तीन निगेटिव्ह आहेत. उर्वरित सहा जणांच्या अहवालाची प्रतीक्षा आहे.

संबंधित रुग्णाच्या संपर्कात सावरगाव येथील त्याचे घरातील आठ जण तसेच एक नातेवाईक यांच्यासह सलूनवाला,आचारी व मित्राचा समावेश असल्याचे सांगण्यात आले. मुंबईहून हे चौघेजण १९ मे रोजी आले होते. यानंतर दोनच दिवसांनी वडील व मुलीस सर्दी, खोकला, ताप येऊ लागल्याने खासगी व नंतर प्राथमिक आरोग्य केंद्रात त्यांनी तपासणी करून घेतली तर नारायणगाव येथे एक्स-रे काढला. त्यांच्या स्वॅब तपासणीनंतर ते पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाल्याने प्रशासनाने तातडीने कारवाई सुरू केली.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

प्राथमिक आरोग्य केंद्रात त्यांची तपासणी करणारे डॉक्टर व अन्य कर्मचारी यांनी होम क्वारंटाईन करून घेतले आहे. मुंबईहून आल्यानंतर घरी न बसता इकडे तिकडे मुक्त फिरण्यामुळे आज गावास त्रास सोसावा लागत असल्याने मुंबईकरांनो तुम्ही या पण घरातच थांबा! असा सल्ला प्रशासनाने दिला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Praful Patel : ''होय, 2004 पासून भाजपशी युती व्हावी म्हणून मी आग्रही होतो'', प्रफुल्ल पटेलांनी सगळाच इतिहास काढला

SRH vs PBKS Live Score : अभिषेक-क्लासेनची शानदार खेळी, हैदराबाद विजयासह प्लेऑफमध्ये; मात्र पंजाबची पराभवासह सांगता

Farooq Abdullah: फारुख अब्दुल्लांच्या सभेत चाकूहल्ला; 3 कार्यकर्ते जखमी, दोघांची स्थिती गंभीर

काँग्रेसमध्ये धुसफूस! मल्लिकार्जुन खरगेंच्या फोटोला काळे फासले, अधीर रंजन चौधरींबाबत केलेल्या वक्तव्यामुळे कार्यकर्ते नाराज

जम्मू काश्मीरमध्ये लोकसभेच्या मतदानापूर्वी दहशतवाद्यांचा हल्ला! भाजप कार्यकर्त्याचा मृत्यू, तर एक दाम्पत्य जखमी

SCROLL FOR NEXT