bribe sakal
पुणे

होर्डिंगची 'वर्क ऑर्डर' मिळण्यासाठी १० लाखांची लाच

होर्डिंग लाच प्रकरण; तक्रारदार आणि पिंगळे यांच्यातील संभाषण

सकाळ वृत्तसेवा

पुणे : होर्डिंगची ‘वर्क ऑर्डर’ मिळण्यासाठी १० लाखांची लाच मागितल्याप्रकरणी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या अध्यक्षांचे स्वीय सहाय्यक ज्ञानेश्वर पिंगळे याने तक्रारदार ठेकेदाराला टक्केवारीचे पैसै ‘वर सोळा जणांना द्यावे लागतात’ असे सांगितले. तसेच स्थायी समितीचे अध्यक्ष नितीन लांडगे यांनीच पिंगळे याला टक्केवारी तीनऐवजी दोन करा, असे आदेश दिल्याचे संभाषण व्हॉइस रेकॉर्डवर रेकॉर्ड झाले आहे.

या प्रकरणात अटक पाचही आरोपींना गुरुवारी (ता. १९) न्यायालयात हजर करण्यात आले होते. अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. बी. हेडाऊ यांनी त्यांना २१ आॅगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. स्थायी समिती अध्यक्ष नितीन लांडगे, त्यांचा पीए ज्ञानेश्वर किसनराव पिंगळे (वय ५६, रा. भोसरी), शिपार्इ अरविंद भीमराव कांबळे (रा. भीमनगर पिंपरी), संगणक आॅपरेटर राजेंद्र जयवंत शिंदे (रा. थेरगाव वाकड) आणि लिपिक विजय शंभुलाल चावरिया (रा. धर्मराजनगर) यांना पोलिस कोठडी सुनावण्यात आली. तक्रारदार हे जाहिरात ठेकेदार आहे. त्यांनी पिंपरी चिंचवड महापालिकेडील २६ वेगवेगळ्या जागांमध्ये होर्डिंग उभारण्यासाठी निविदा भरल्या होत्या. २०१९ व २०२० च्या निविदा मंजूरही झाल्या. मात्र वर्क आॅर्डर निघाली नसल्याने त्यांनी स्थायी समितीचे अध्यक्षांचे स्वीय सहाय्यक ज्ञानेश्वर पिंगळे याच्याशी संपर्क केला. त्याने बोली रकमेच्या तीन टक्के रक्कमेनुसार १० लाख रुपयांची मागणी केली. तडजोडीअंती सहा लाख रुपयांचे देण्याचे ठरले. त्यातील एक लाख १८ हजार रुपयांची रक्कम पहिल्या टप्प्यात देण्याचे ठरले आणि उर्वरित रक्कम वर्क आॅर्डर प्राप्त झाल्यानंतर देण्याचे ठरले. एक लाख १८ हजार रुपयांची रक्कम पिंगळे यांनी स्वीकारल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने त्यांना अटककारवाई केली आणि पाच जणांना अटक केली.

मोठे रॅकेट :

हे एक प्रकारचे मोठे रॅकेट असल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. यामध्ये कोणकोण सामील आहे याचा तपास करणे गरजेचे आहे. त्यामुळे सरकारी वकील रमेश घोरपडे यांनी आरोपींना चार दिवस पोलिस कोठडी देण्याची मागणी केली. नितीन लांडगे यांच्या मालमत्तेचा शोध सुरू असून, त्यांच्या घराची झडती घेण्यात आली आहे. त्यांची या व्यतिरिक्तही मालमत्ता असल्याचे उघडकीस आले आहे.

पिंगळेकडे मिळाले पाच लाख ६८ हजार :

सापळा कारवाई दरम्यान पिंगळे याच्याकडे पाच लाख ६८ हजार ५६० रुपयांची रक्कम मिळाली आहे. त्यातील पाच लाख २० हजार रुपये स्थायी समितीच्या सभापतींना देण्यात आल्याचे पिंगळे याने सांगितले आहे. राजेंद्र शिंदे यांच्याकडेही २४ हजार ४८० रुपयांची रक्कम मिळाली आहे, असे पोलिसांनी न्यायालयात सादर केलेल्या रिमांड रिपोर्टमध्ये नमूद आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bihar Government Formation Update: बिहारमध्ये सरकार स्थापनेच्या घडामोडींना वेग ; JDU नेते अमित शहांच्या भेटीला दिल्लीत!

Pachod Crime : भरदिवसा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या कर्मचाऱ्याला पंचवीस लाखाची रोकड घेऊन जातांना चोरट्यांनी लुटले

Bihar Election Result 2025: एनडीएच्या प्रचंड विजयावर उत्तराखंडचे सीएम पुष्कर सिंह धामी म्हणाले, 'मोदीमय झाले बिहार!'

CSK Captain: संजू सॅमसनला संघात घेतलं, पण IPL 2026 मध्ये कर्णधार कोण? चेन्नईने स्पष्टच सांगून टाकलं

MP Murlidhar Mohol : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा राज्यातील महायुतीवर परिणाम होणार नाही

SCROLL FOR NEXT