Small-Business 
पुणे

पिंपरीतील शंभर उद्योगांचे स्थलांतर (व्हिडिओ)

सकाळवृत्तसेवा

पिंपरी - महाराष्ट्राच्या तुलनेत मध्यम उद्योगांना अन्य राज्यांमध्ये मिळणाऱ्या रेड कार्पेट सुविधांमुळे शहरातल्या सुमारे १०० उद्योगांनी गुजरात, उत्तरांचल, कर्नाटक आणि तमिळनाडू राज्यांमध्ये स्थलांतर करण्यास पसंती दिल्याचे समोर आले आहे.

शहरातील लघुउद्योजकांसमोरील आव्हाने या विषयावर ‘कॉफी विथ सकाळ’ या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. त्यात ही बाब पुढे आली आहे. 

या कार्यक्रमाला पिंपरी-चिंचवड लघुउद्योजक संघटनेचे अध्यक्ष संदीप बेलसरे, उपाध्यक्ष संजय जगताप, विनोद नाणेकर, सचिव जयंत कड, संचालक प्रभाकर धनोकर, विजय खळदकर, संजय सातव, प्रमोद राणे, विनोद मित्तल उपस्थित होते. 

उद्योग बाहेर जाण्याची कारणे
गुजरात, उत्तरांचल, कर्नाटक आणि तमिळनाडू या राज्यांमध्ये येणाऱ्या मध्यम उद्योगांना रेड कार्पेट सुविधा मिळत आहेत. पहिल्या दहा वर्षांसाठी त्यांना आवश्‍यक असणाऱ्या वीज, पाणी, अन्य सुविधांमध्ये मोठ्या प्रमाणात सवलती देण्यात येत आहेत. नव्या उद्योगांमुळे रोजगारदेखील उपलब्ध होत असून, राज्याच्या विकासासाठी या बाबी फायदेशीर ठरत आहेत. 

मध्यम आकाराच्या उद्योगांना पाच ते दहा एकरांपर्यंतची जागा या ठिकाणी सहजपणे उपलब्ध करून देण्यात येत असल्याने या उद्योगांना विस्तार करणे सहजशक्‍य होत आहे. 

अडचणीत लघुउद्योग 
शहरातील मध्यम उद्योगांनी अन्य राज्यांमध्ये स्थलांतर केल्याने लघुउद्योग अडचणीत आले आहेत. लहान उद्योगांचे काम मध्यम उद्योगांकडून येणाऱ्या कामावर अवलंबून असते. स्थलांतरामुळे लघुउद्योगाकडील काम कमी झाले आहे; तर काहींचे पूर्ण बंद पडले आहे. 

उपाययोजना 
अन्य राज्यांमध्ये स्थलांतरित होणाऱ्या मध्यम उद्योगांना थांबवण्यासाठी राज्य सरकारने पुढाकार घेऊन उपाययोजना करण्याची आवश्‍यकता आहे. नव्याने आकाराला येणाऱ्या एमआयडीसी क्षेत्रात या उद्योगांना रेड कार्पेट सुविधा द्याव्यात. अन्य राज्यांपेक्षा सक्षम मॉडेल राज्य सरकारने राबविल्यास स्थलांतर थांबून लघुउद्योगांना संजीवनी मिळू शकते.

शहरातून स्थलांतरित झालेल्या उद्योगांना परत आणण्यासाठी राज्य सरकारच्या उद्योग विभागाने त्यांच्यासाठी आकर्षक योजना जाहीर करणे अपेक्षित आहे. तसेच सरकारकडून विशेष प्रयत्न होण्याची आवश्‍यकता आहे. आतापर्यंत मध्यम उद्योगांच्या स्थलांतराचा रोजगारावर २५ टक्‍के परिणाम झाला आहे. याखेरीज लघुउद्योगांना देखील ३० टक्‍क्‍यांपर्यंत फटका बसला आहे. नजीकच्या काळात स्थलांतराचे सत्र असेच सुरू राहिले, तर रोजगाराला त्याचा मोठा फटका बसणार आहे. 
- संदीप बेलसरे, अध्यक्ष, पिंपरी-चिंचवड लघुउद्योजक संघटना

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Municipal Election 2026 Results : मुंबईत भाजप सर्वाधिक जागा जिंकणार पक्ष, महापौर महायुतीचाच होणार

Eknath Shinde Statement: मुंबईच्या महापौर पदाबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, म्हणाले..

BMC Election 2026 Result : मुंबई महापालिका निवडणूक निकालाबाबत ‘साम मराठी’चा 'एग्झिट पोल' ठरला तंतोतंत खरा!

End of the World : जगातलं शेवटचं शहर माहितीये का? जिथे पृथ्वीच संपते..लाखो लोकांना नाही माहिती

निवडणूक नियोजन, तिकीट वाटप ते रणनीतीपर्यंत... महापालिका निकालांत ‘देवेंद्र–रविंद्र’ जोडीचा करिष्मा! केमिस्ट्री ठरली गेमचेंजर

SCROLL FOR NEXT