corona free auto rickshaw will run in Pune city 
पुणे

पुण्यात धावणार 100 कोरोनामुक्त रिक्षा  

सकाळवृत्तसेवा

पुणे : स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून रिक्षा पंचायतीतर्फे ‘कोरोना मुक्त रिक्षा’हा उपक्रम पुण्यात सुरू करण्यात येणार आहे. त्यात 100 खास रिक्षांचा ताफा शुक्रवारपासून रस्त्यावर येणार आहे. त्यामुळं कोरोनाच्या परिस्थितीतही या रिक्षांमधून सुरक्षित प्रवास करता येणार आहे. 

स्वातंत्र्यदिनावर यंदा कोरोना संकटाचे सावट आहे. या परीक्षेत उत्तीर्ण होण्यासाठीच सर्वजण कोरोनाच्या संकटाशी एकजुटीने लढत आहेत. यंदाच्या स्वातंत्र्यदिना निमित्त ही लढाई पुढे नेणारा ‘ कोरोना मुक्त रिक्षा ’ हा उपक्रम रिक्षा पंचायत सुरू करत आहे. या उपक्रमातील रिक्षांना स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला विभागीय आयुक्त सौरभ राव यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवला जाणार आहे. टाळेबंदी शिथिल झाल्यावर 1 ऑगस्टपासून प्रवासी सेवा देण्यासाठी ऑटो रिक्षा खुल्या झाल्या आहेत. तरीही एकूण रिक्षांपैकी 25-30 टक्केच रिक्षा सध्या रस्त्यावर आहेत. प्रवाशांच्या मनातील कोरोनाची भीती घालवण्यासाठी आणि प्रवास करताना कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ‘कोरोना मुक्त रिक्षा’ हा उपक्रम सुरू करण्यात येत आहे.  

कशी असेल कोरोनामुक्त रिक्षा?
चालक व प्रवासी यांच्या मध्ये पारदर्शक पडदा असेल.प्रवासी चढताना व उतरताना रिक्षा निर्जंतुक करण्यासाठी रिक्षा चालकाकडे निर्जंतुकीकरण द्रव्याचा पंप असेल. रिक्षाचालकाकडे वैयक्तिक वापरासाठी सॅनिटायझर बाटली असेल.रिक्षा चालकाने मुखपट्टी (फेसमास्क) व फेसशील्ड लावले असेल. 
या रिक्षा वेगळ्या ओळखण्यासाठी रिक्षावर  दर्शनी भागात कोरोना मुक्त रिक्षा या मथळ्याचे स्टिकर लावलेले असेल.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

या ताफ्याला शुक्रवारी (14 ऑगस्ट) सायंकाळी 4 वाजता विभागीय आयुक्त सौरभ राव यांच्या हस्ते विभागीय कार्यालयाच्या आवारातून झेंडा दाखविला जाणार आहे. स्वातंत्र्य दिनाच्या तोंडावर होणारा हा उपक्रम औचित्यपूर्ण व दिशादर्शक ठरेल. यामुळे मिशन बिगिन अगेन लाही बळ मिळणार आहे, असे रिक्षा पंचायतीचे सरचिटणीस नितीन पवार यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol-Diesel Hike: आता फक्त 3 रुपये... पुढे किती महागणार पेट्रोल-डिझेल? धक्कादायक अहवाल समोर!

"त्यांना पॅरालिसीस झाला होता" दिग्दर्शक प्रवीण तरडेंचा मोहन जोशींविषयी धक्कादायक खुलासा

NCP Leaders PC: तटकरे-पटेलांच्या नाराजीनाम्याच्या चर्चांना पूर्णविराम! पत्रकार परिषदेत राष्ट्रवादी नेत्यांनी दिलं स्पष्टीकरण

Latest Marathi News Live Update : सरकारने किमान 20 रुपयात कांदा खरेदी करावा- शेतकरी

Monsoon Update: अंदमानात मान्सून आला रे! केरळात २६ मेपर्यंत पोहोचणार; कोकण किनारपट्टीवर कधी दाखल होणार?

SCROLL FOR NEXT