Ajit Pawar baramati vidahsabha  sakal
पुणे

Ajit Pawar: बारामती जिंकण्यासाठी राष्ट्रवादी सज्ज, हाती घेतला महत्वाचा उपक्रम

NCP: कुटुंबनिहाय मतदारांना भेटून त्यांच्या अडचणी जाणून घेण्याचा प्रयत्न या उपक्रमात केला जाणार आहे.

मिलिंद संगई, बारामती

Baramati Vidhansabha Election 2024: लोकसभा निवडणूकीच्या निकालानंतर बारामतीत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या वतीने आता 100 दिवस पक्षासाठी हा उपक्रम राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शहराध्यक्ष जय पाटील यांनी या बाबत माहिती दिली.

बारामती विधानसभा मतदारसंघाच्या निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचण्याचा हा उपक्रम असून कुटुंबनिहाय मतदारांना भेटून त्यांच्या अडचणी जाणून घेण्याचा प्रयत्न या उपक्रमात केला जाणार आहे.

या उपक्रमाच्या नियोजनासाठी आयोजित केलेल्या बैठकीत जय पाटील यांच्यासह माजी नगराध्यक्ष सुभाष सोमाणी, योगेश जगताप, बारामती बँकेचे अध्यक्ष सचिन सातव, युवकाध्यक्ष अविनाश बांदल, प्रताप पागळे, महिला अध्यक्षा अनिता गायकवाड यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

बारामती शहर परिसरात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून केलेल्या विकासकामांची माहिती मतदारांपर्यंत पोहोचविण्यासह त्यांच्या काही समस्या अडचणी असतील तर त्या सोडविण्यासाठी सामूहिक प्रयत्न करणे हा या उपक्रमाचा एक भाग आहे.

या सुसंवादातून नागरिकांच्या अडचणी अजित पवार यांच्यापर्यंत पोहोचविल्या जाणार असून त्यावर मार्ग काढण्यासाठी पक्ष संघटना प्रयत्नशील असेल.

सुसंवाद साधण्याचा प्रयत्न

मतदारांपर्यंत पोहोचून त्यांचे मत जाणून घेणे, मतदारांसोबत सुसंवाद साधणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे. लोकांच्या अडचणी निवारणासाठी अजित पवार कायमच प्रयत्नशील असतात. या पूर्वीही एक तास पक्षासाठी या उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळाला होता. आता शंभर दिवस पक्षासाठी उपक्रम राबविला जाणार आहे.- जय पाटील, शहराध्यक्ष, बारामती शहर राष्ट्रवादी पक्ष.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPS Sandeep Karnik : नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, नेमकं प्रकरण काय? २०१९ मध्ये काय घडलं होतं?

ICUत उंदराने कुरतडला हात, १२ तासांत महिला रुग्णाचा मृत्यू; रुग्णालयाने डॉक्टरसह नर्सवर केली कारवाई

Latest Marathi News Live Update : कोल्हापुरातील बिंदू चौकात गॅस गळतीमुळे आग

LPG Import India : गॅस संकट कमी होणार ! कतारहून भारतात आणला ४६,००० मॅट्रिक टन LPG; तब्बल 'इतके' लाख सिलिंडर्स भरणार

Chhatrapati Sambhajinagar News: लातूर-नांदेडला अवकाळी पावसानं झोडपलं, वीज कोसळून १६ वर्षीय मुलीचा मृत्यू; वादळी वाऱ्यानं मोठं नुकसान

SCROLL FOR NEXT