Chandani Chowk sakal
पुणे

Chandani Chowk : चांदणी चौकात पादचाऱ्यांसाठी १०० मीटरचा लोखंडी पादचारी मार्ग उभारणार

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून चांदणी चौकात लवकरच पादचारी मार्ग (फूट ओव्हर ब्रिज) उभारला जाणार असून, त्यासाठी निविदा प्रक्रीया पूर्ण झाली आहे.

सकाळ वृत्तसेवा

मयूर कॅालनी - राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून चांदणी चौकात लवकरच पादचारी मार्ग (फूट ओव्हर ब्रिज) उभारला जाणार असून, त्यासाठी निविदा प्रक्रीया पूर्ण झाली आहे. चांदणी चौकातील ‘एसटी’चा नवीन बस थांबा ते इराणी कॅफे बावधन, असा १०० मीटरचा लोखंडी पादचारी मार्ग असणार आहे.

पादचारी मार्गाचे काम कोल्हापूर येथील ‘एमडी इंफ्र’ कंपनीला देण्यात आले असून, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि ‘एमडी इंफ्र’ यांच्यातील शेवटच्या टप्प्यातील कराराचे काम सुरू आहे. पुढील महिन्यात पादचारी पूल उभारण्याचे काम सुरू होईल, अशी माहिती राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण कार्यालयाकडून देण्यात आली.

पादचाऱ्यांच्या सुरक्षेला प्राधान्य देऊन चांदणी चौकात पादचारी पूल उभारण्यासाठी ‘सकाळ’ने सातत्याने सुरक्षेचा मुद्दा उपस्थित केला आहे. याबाबत ‘सकाळ’ने प्रवाशांच्या प्रतिक्रिया जाणून घेत ‘चांदणी चौकात पादचाऱ्यांचा जीव धोक्यात’, ‘प्रवाशांना आणले रस्त्यावर’ अशा मथळ्यांखाली वेळोवेळी वृत्त प्रसिद्ध केले होते.

दररोज हजारो प्रवाशांना स्वत:चा जीव मुठीत धरून महामार्ग ओलांडावा लागतो. महामार्गाच्या दुसऱ्या बाजूला जायचे असल्यास तीन किलोमीटर पायी जावे लागते; अन्यथा तीन किलोमीटर अंतरासाठी तब्बल १२० रुपये मोजून भाड्याने रिक्षा करून जावे लागते. पादचारी मार्ग झाल्यावर सुरक्षितरित्या पाच मिनिटांत महामार्ग ओलांडता येईल.

त्यामुळे प्रवाशांची गैरसोयीतून सुटका होईल. प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांना पत्र देऊन तत्काळ पादचारी पूल उभारण्याची मागणी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Konkan Railway: कोकण रेल्वेचा मोठा बदल! आता पश्चिम रेल्वेच्या मार्गावरून धावणार गाड्या; नवा मार्ग कसा आहे? जाणून घ्या...

Sinhgad Road News : वादळी वाऱ्यात झाड पडल्याने ज्येष्ठ महिलेचा मृत्यू

IPL 2026 Marathi News : युवराज सिंग SRH मालकीण काव्या मारनवर नाराज; म्हणाला, अभिषेक शर्माने फ्रँचायझीसाठी ७ वर्ष घासली...

Latest Marathi News Live Update: मंगळवेढ्यात फळबागांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान

मृदंगाचार्य लघाणे महाराजांच्या पत्नीनं संपवलं आयुष्य; वर्षभरापूर्वी लग्न, पतीवर अनैतिक संबंधाचे आरोप

SCROLL FOR NEXT