पुणे

Coronavirus : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात 100 जणांची विलगीकरणाची व्यवस्था 

सकाळवृत्तसेवा

पुणे - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या 'अ‍ॅकेडमीक गेस्ट हाऊस'मध्ये विलगीकरण कक्ष तयार केला आहे. तेथे 100 खाटांची व्यवस्था केली आहे. हे गेस्ट हाऊस प्रशासनाच्या ताब्यात दिले आहे. मात्र, अद्याप तेथे विलगीकरणासाठी कोणालाही ठेवलेले नाही, असे कुलसचिव डाॅ. प्रफुल्ल पवार यांनी सांगितले. 

महाराष्ट्रात 'कोरोना'चे रुग्ण सापडण्यामध्ये मुंबई नंतर पुण्याचा क्रमांक लागत आहे. पुणे शहरातील पाॅजिटीव्ह रुग्णांची संख्या 60 च्या पुढे गेली आहे. तर पाच जणांचा मृत्यू झाला आहे. रुग्णांची संख्या वाढत असल्याने महापालिकेच्या नायडू रुग्णालयाची क्षमता संपत आली आहे. नायडूमध्ये 100 खाटांची क्षमता असून, सध्या तेथे 85 जणांवर उपचार सुरू आहेत. त्यामुळे रुग्णांवर उपचार करण्यासाठी व विलगीकरणासाठी पर्यायी जागांचा शोध सुरू आहे. सरकारने राज्यातील सर्व वसतिगृह बंद करून ते प्रशासनाच्या ताब्यात देण्याचे आदेश दिले होते. त्यात खासगी संस्थांच्या वसतिगृहांसह पुणे विद्यापीठाचाही समावेश होता. पुणे विद्यापीठातील विद्यार्थी व विद्यार्थिनीचे वसतिगृह बंद असले तरी ते ताब्यात दिले नाहीत. 

महापालिकेचे सहायक आरोग्य प्रमुख डाॅ. संजीव वावरे म्हणाले, "सध्या विलगीकरणासाठी लायगुडे रुग्णालय सिंहगड रस्ता, सणस ग्राऊंड, बोपडी, दळवी रुग्णालय आणि खराडी रक्षक नगर येथे सुमारे 450 जणांची व्यवस्था केली आहे. गरज पडल्यास इतर ठिकाणच्या वसतिगृहात विलगीकरणाची व्यवस्था केली जाईल. 

विद्यार्थ्यांचे साहित्य सुरक्षित 
विद्यार्थ्यांना अचानक वसतीगृह रिकामे करावे लागले. त्यामुळे काही पुस्तक, कपडे घेऊन विद्यार्थी गावाकडे गेले आहेत. रूमच्या कुलुपाच्या चाव्या त्यांच्याकडेच आहेत. या ठिकाणी विलगीकरण कक्ष केले जाणार नाहीत, असे पवार यांनी सांगितले. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024, RCB vs CSK: चेन्नईचा 17 व्या हंगामातील प्रवास थांबला! धोनीचीही कारकिर्द संपली? सामन्यानंतरचा पाहा Video

Loksabha Election 2024 : हुश्श..! प्रचार संपला, राज्यात तोफा शांत, तलवारी म्यान

IPL 2024: RCB चा आनंद गगनात मावेना! प्लेऑफमध्ये पोहचताच केला जोरदार जल्लोष, पाहा Video

‘चार सौ पार’ पासून बहुमताच्या आकड्यापर्यंत

सत्ता ठरवणारा उ त्त र रं ग

SCROLL FOR NEXT