पुणे

महापालिकेच्या रुग्णालयांसाठी ११ कोटींची औषध खरेदी

सकाळवृत्तसेवा

पिंपरी - महापालिकेची रुग्णालये व दवाखान्यांसाठी सुमारे साडेअकरा कोटी रुपयांची औषधे व वैद्यकीय साहित्य खरेदी करण्यात येणार आहे. सर्वसामान्य रुग्णांना त्याचा लाभ मिळणार आहे.

पिंपरीतील संत तुकारामनगरमध्ये महापालिकेचे यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय (वायसीएम) आहे. त्याच पद्धतीची सेवा शहर परिसरातील रुग्णांना मिळावी व वायसीएम रुग्णालयावरील ताण कमी व्हावा, यासाठी चिंचवड गावातील तालेरा आणि पिंपरी गावातील जिजामाता या रुग्णालयांचा विस्तार करण्याचे नियोजन महापालिकेने  केले आहे. त्यापैकी तालेराचे विस्तारीकरण झालेले असून, जिजामाताचे काम प्रगतिपथावर आहे. शिवाय महापालिकेची भोसरी, सांगवी, यमुनानगर, आकुर्डी, थेरगाव आदी रुग्णालये व दवाखानेही आहेत. त्या ठिकाणी उपचार घेणाऱ्या रुग्णांना काही औषधे मिळत नव्हती. रुग्ण व त्यांच्या नातेवाइकांना ती औषधे खासगी मेडिकलमधून घ्यावी लागत होती. त्यामुळे महापालिकेच्या स्थायी समिती सभेने औषधे खरेदीचा निर्णय घेतला आहे. 

दोन वर्षांतील खरेदी
महापालिकेची रुग्णालये व दवाखाने यांसाठी औषधे व वैद्यकीय साहित्य खरेदीसाठी औषधे निविदा समिती स्थापन केलेली आहे. या समितीने शिफारस केल्यानंतर औषधे खरेदीच्या निविदा मागविल्या जातात. दोन वर्षांपूर्वी चार निविदा मागविल्या होत्या. त्यानुसार ॲलोपॅथीची ८०९, शस्त्रक्रियेसाठीचे साहित्य ४४९, आयुर्वेदिक औषधे १९८ आणि दंतविषयक औषधे व साहित्य २११ असे एकूण एक हजार ६६७ प्रकारची औषधे व साहित्य खरेदी केली होती. तसेच गेल्या आर्थिक वर्षात ७५ हजार ४० हजार ५८१ रुपयांची औषधे खरेदी केली आहे. त्यासह चालू आर्थिक वर्षात औषधे व वैद्यकीय साहित्य खरेदीसाठी ११ कोटी ५० लाख रुपये महापालिका स्थायी समितीने मंजूर केलेले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sainik Takli Protest : आमदार यड्रावकरांच्या समर्थकांकडून सैनिक टाकळीच्या आंदोलकांना मारहाण?, शिरोळ तालुका बंदची हाक; तिरंग्याच्या काठीने मारल्याला आरोप

Panvel-Karjat Railway Line: कर्जतहून नवी मुंबई आता आणखी जवळ! नवा रेल्वेमार्ग लवकरच खुला होणार; किती टक्के काम पूर्ण?

Koyna Dam: कोयना धरणाच्या दरवाजातून होणार विसर्ग पुर्णपणे बंद; धरणात सध्या 93.02 टीएमसी पाणीसाठा

Yavatmal Politics: जमिनीवर बसले, काळा चहा घेतला, झुनका-भाकरी खाल्ली; पालकमंत्री संजय राठोडांचा आदिवासी बांधवांसोबत दिवस

Religious Travel: ६ महिने स्केटिंग, ३ महिने सायकलिंग! श्रद्धेला जिद्दीची साथ; बाराही ज्योतिर्लिंगांसाठी निघालेल्या दोन तरुणांची अनोखी कहाणी

SCROLL FOR NEXT