पुणे

दहावी निकाल अकरावी प्रवेश प्रक्रिया

CD

उत्तीर्ण विद्यार्थ्यांपेक्षा अकरावीच्या २६,५७३ जागा जास्त
उत्तीर्णांची संख्या ५८ हजार ७२७ तर जिल्ह्यात प्रवेशासाठी ८५,३०० जागा

सकाळ वृत्तसेवा
सोलापूर, ता. ८ : दहावीचा निकाल शुक्रवारी जाहीर झाला आहे. यंदा दहावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी धावपळ करावी लागणार नाही. कोणत्याही महाविद्यालयात सहज प्रवेश मिळणार आहे. कारण उत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या संख्येपेक्षा प्रवेशाच्या जागा २६ हजार ५७३ ने अधिक आहेत. जिल्ह्यात ५८ हजार ७२७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून अकरावीच्या ८५ हजार ३०० जागा आहेत. १०० टक्के विद्यार्थ्यांचा प्रवेश झाला तरी २६ हजार ५७३ जागा रिक्त राहण्याची शक्यता आहे.

दहावीचा निकाल पाहता सर्वाधिक मागणी आणि स्पर्धा विज्ञान शाखेसाठी राहणार आहे. विज्ञान शाखेकडे विद्यार्थ्यांचा अधिक कल असल्याने ग्रामीण भागात कला व वाणिज्य शाखांच्या जागा मोठ्या प्रमाणात रिक्त राहण्याची शक्यता आहे. महाविद्यालयांमध्ये १० टक्के इन-हाउस आणि ५ टक्के मॅनेजमेंट कोटा असल्याने प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना थेट महाविद्यालयाशी संपर्क साधता येणार आहे.

नामवंत महाविद्यालयांत असणार स्पर्धा
जागांची संख्या जास्त असली तरी शहरातील नामांकित महाविद्यालयांमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये मोठी चढाओढ पाहायला मिळणार आहे. विशेषतः विज्ञान (Science) शाखेसाठी ८० ते ९० टक्क्यांवरील गुण असलेल्या विद्यार्थ्यांमध्ये मेरिटसाठी स्पर्धा असेल. मात्र, ग्रामीण भागातील महाविद्यालयांसमोर विद्यार्थी संख्या पूर्ण करण्याचे मोठे आव्हान राहणार आहे. मागील काही वर्षांच्या तुलनेत यंदा निकालाची टक्केवारी घटल्याचा थेट परिणाम विद्यार्थी संख्येवर होणार आहे.

अकरावी प्रवेश महाविद्यालये व जागा...
- उत्तीर्ण विद्यार्थी : ५८ हजार ७२७
- विज्ञान : ३२१ महाविद्यालयांत ३६ हजार ३०० जागा
- वाणिज्य : १५४ महाविद्यालयांत १५ हजार ०२० जागा
- कला : ३४४ महाविद्यालयांत ३३ हजार ९८० जागा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gokul Dudh Election Date : ‘गोकुळ’च्या निवडणुकीचा कार्यक्रम ठरला? ऑक्टोबर महिन्यात मतदान, मतमोजणी होणार

पंजाब नॅशनल बँकेच्या तिजोरीत तब्बल १७ कोटी २९ लाख रुपयांच्या बनावट नोटा; मॅनेजरला अटक, तीन कर्मचारीही निलंबित

स्टार प्रवाहच्या 'मी कात टाकली'मध्ये दिसणार नवा चेहरा; कोण आहे हा अभिनेता? नवा प्रोमो चर्चेत; 'ही' मालिका घेणार निरोप

'दातापासून ते चेहऱ्याच्या हावभावापर्यंत; ‘दुआ तर अगदी रणवीरची कॉपीच’ नेटकऱ्यांनी रणवीरचे लहाणपणीचे फोटो काढले शोधून, Photo Viral

Marathi News Live Updates : लातूर जिल्ह्यात कोरडा दुष्काळ; शेतकऱ्यांच्या स्वप्नांची माती, मायबाप सरकारला आर्त हाक

SCROLL FOR NEXT