Pune Rain Update Sakal
पुणे

Pune Rain Update : पाऊस पडला, पण पाणी साठेना; पुण्यासाठी १२.२६ टक्के साठा शिल्लक

Pune Water Storage : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला प्रकल्पातील चार धरणांमध्ये मिळून सध्या फक्त ३.५८ टीएमसी पाणी शिल्लक राहिले आहे.

सकाळ वृत्तसेवा

Pune News : शहरात जूनच्या पहिल्या आठवड्यात पाऊस पडून आणि गेल्या दोन दिवसांपासून पुन्हा पाऊस पडण्यास सुरुवात होऊनही, शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला प्रकल्पातील चार धरणांमध्ये अद्याप पाणी जमा होण्यास सुरुवात झालेली नाही. याउलट पाणीसाठा कमी झाला आहे.

यामुळे धरणांची अवस्था ही ‘पाऊस पडला, पण पाणी साठेना’ अशी झाली आहे. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला प्रकल्पातील चार धरणांमध्ये मिळून सध्या फक्त ३.५८ टीएमसी पाणी शिल्लक राहिले आहे.

या प्रकल्पांतील पाणीसाठ्याचे प्रमाण अवघे १२.२६ टक्के इतके आहे. गतवर्षीच्या तुलनेत पाणीसाठा ०.८२ टीएमसी इतका कमी आहे. खडकवासला प्रकल्पांत गेल्या वर्षीच्या आजच्या तारखेला ४.४० टीएमसी पाणीसाठा शिल्लक होता.

गतवर्षीच्या उपलब्ध पाणीसाठ्याचे प्रमाण १५.१० टक्के इतके होते. उपलब्ध पाणीसाठ्याची गतवर्षीची आजच्या तारखेची आणि या वर्षीच्या आजच्या तारखेच्या टक्केवारीची तुलना केल्यास, गतवर्षीच्या तुलनेत यंदा २.८४ टक्के इतका पाणीसाठा कमी झाला आहे.

पुण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला प्रकल्पात टेमघर, वरसगाव, पानशेत आणि खडकवासला अशी चार धरणे येतात. या धरणांमधील मिळून एकूण उपयुक्त पाणीसाठा २९.१५ टीएमसी इतका आहे. यापैकी सध्या केवळ ३.५८ टीएमसी पाणी शिल्लक राहिले आहे.

दरम्यान, जिल्ह्यातील २६ धरणांव्यतिरिक्त टाटा समूहाच्या सहा धरणांमधील पाणीसाठा वेगळा आहे. जिल्ह्यात एकूण ३२ धरणे आहेत. यापैकी सहा धरणे टाटा समूहाची आहेत, ती वगळता उर्वरित २६ धरणे आहेत.

जिल्ह्यातील धरणांमध्ये उजनी, भामा आसखेड, माणिकडोह, चासकमान, पवना, मुळशी, टेमघर, वरसगाव, पानशेत, गुंजवणी, नीरा देवधर, भाटघर, वीर आदी प्रमुख धरणांचा समावेश आहे. प्रमुख धरणांसह सर्व मिळून एकूण उपयुक्त पाणीसाठा क्षमता १९८.३४ टीएमसी इतकी आहे.

‘खडकवासला’तील उपलब्ध

पाणीसाठा - (टीएमसीमध्ये)

  • टेमघर- ०.०३

  • वरसगाव -१.१५

  • पानशेत -१.३६

  • खडकवासला- १.०३

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan T20 WC Qualification Scenario : भारताकडून हार अन् पाकिस्तानी बेजार! गुणतालिकेत उलथापालथ, अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर, पाकडे Super 8s मध्ये कसे पोहोचणार?

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

Harshvardhan Sapkal : 'मुंबईतील रस्त्याला 'टिपु सुलतान'चं नाव देण्याचा भाजपने दिला होता प्रस्ताव', हर्षवर्धन सपकाळांनी थेट पुरावाच सादर केला..

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

SCROLL FOR NEXT