पुणे

उरुळी कांचन ग्रामपंचायतीत गेल्या 24 तासांत कोरोनाचे नवे 12 रुग्ण

जनार्दन दांडगे

लोणी काळभोर (पुणे) : उरुळी कांचन ग्रामपंचायत हद्दीतील तळवाडी चौकातील कोरोनाबाधित 'स्वीटहोम' मालकापाठोपाठ पत्नी, दोन मुले व स्वीटहोममधील तीन नोकर असे सहा जण कोरोना पॉझिटीव्ह असल्याचे बुधवारी (ता. १५) रात्री उशीरा आढळून आले आहे. 

बहुचर्चित स्वीटहोमशी निगडीत सहा रुग्णांबरोबरच उरुळी कांचन हद्दीत बुधवारी दिवसभरात आणखी नव्याने सहा रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले. यामुळे बुधवारी दिवसभरात आढळून आलेल्या रुग्णांची संख्या बारा झाली आहे. तर उरुळी कांचन हद्दीतील ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या चाळीसवर पोचली आहे. 

उरुळी कांचन येथील प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या आरोग्य अधिकारी डॉ. सुचिता कदम यांनी तळवाडी चौकातील वरील स्विटहोम शी निगडीत सहा नव्या रुग्णांबरोबरच, उरुळी कांचन हद्दीत मागील 24 तासात बारा रुग्ण आढळून आल्याची कबुली दिली आहे. पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेतील एका कर्मचाऱ्यांचाही 12 रुग्णात समावेश असून, या बारा रुग्णांच्या संपर्कात आलेल्या २८ जणांचे स्वॅब तपासणीसाठी पुण्यातील शासकीय प्रयोगशाळेत पाठवले असल्याची माहितीही डॉ. सुचिता कदम यांनी दिली आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

तळवाडी चौकातील स्विटहोमचे मालक सोमवारी (ता. १३) कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळून येताच, आरोग्य विभागाने वरील "स्विटहोम" मालकाचे कुटुंबीय व स्विटहोममधील नोकर अशा बारा जणांचा स्वॅब (घशातील द्रव) तपासणीसाठी पाठवला होता. यात स्विटहोम मालकाची पत्नी, दोन मुले व स्विटहोममधील तीन नोकर असे सहा जण कोरोना पॉझिटीव्ह असल्याचे आढळून आले आहेत. यामुळे वरील दुकानातून सोमवारपूर्वी मिठाई खरेदी केलेले 100 हून अधिक जण संकटात सापडले आहेत. मात्र, स्वीटहोमचे मालक अथवा दुकानातील नोकरांनी दुकानातून मिठाई खरेदी करणाऱ्यांची नोंदच ठेवली नसल्याचे तुणतुणे वाजविण्यास सुरुवात केल्याने आरोग्य विभाग हवालदिल बनला आहे. यामुळे उरुळी कांचमनधील रुग्णांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

स्विटहोम मालकापाठोपाठ, बँक कर्मचारी पॉझिटिव्ह

दरम्यान, पुणे जिल्हा मध्यवर्ती बॅँकेच्या उरुळी कांचन शाखेतील एका युवा कर्मचारीही बुधवारी कोरोना पॉझिटीव्ह आढळून आला आहे. यामुळे बॅंकेतील अधिकारी, स्टाफ व मागील तीन दिवसात बॅंकेत आलेले ग्राहक यांची तपासणी करण्यात येणार आहे. उर्वरित पाच रुग्ण हे यापूर्वींच्या रुग्णांच्या संपर्कात आलेले आहेत. 12 रुग्णांमुळे उरुळी कांचन हद्दीतील मागील पंधरा दिवसांच्या कालावधीतील रुग्णांची एकूण संख्या ६६ वर गेली आहे. त्यापैकी २६ जण मागील काही दिवसांत उपचार घेऊन, होम क्वारंटाईन 
झाले आहेत. तर सध्या चाळीस ऍक्टिव्ह रुग्ण विविध रुग्णालयात उपचार घेत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Supriya Sule: ‘कर्जमाफी अन् सातबारा कोरा होईपर्यंत स्वस्थ बसू देणार नाही’; पंढरपुरात सुप्रिया सुळे आक्रमक, तुरुंगात जावे लागले तरी चालेल

'अंबा येडू दोघी बहिणी…’ ऐश्वर्या नारकरांसोबत लेकीचाही ठसकेबाज डान्स! VIDEO VIRAL

Asian Games, IND vs AFG: वैभव सूर्यवंशी की संजू सॅमसन, कशी असू शकते Playing XI? कुठे पाहाणार उपांत्यपूर्व सामना?

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या औषध निरीक्षक पेपरफुटीप्रकरणी मोठी अपडेट

सरकारने माझ्या मागण्या मान्य केल्या, ३० दिवसांचा रिचार्ज, डेटाशिवाय प्लान मिळणार; राघव चड्ढांची पोस्ट

SCROLL FOR NEXT