12 year old boy killed in leopard attack forest department Leopard caged in Jakmatha area of Otur pune sakal
पुणे

Junnar Leopard: ओतूर येथील जाकमाथा परीसरात लावलेल्या पिंजर्‍यात बिबट्या जेरबंद

ओतूर वनविभागाकडून रविवारी रात्री बिबट्याच्या हल्यात बारा वर्षीय परप्रांतीय मुलगा ठार

पराग जगताप

ओतूर : जुन्नर येथील जाकमाथा परीसरात लावलेल्या पिंजर्‍यात मंगळवारी पहाटे बिबट्या जेरबंद झाला असल्याची माहिती वनपरिक्षेत्र अधिकार वैभव काकडे यांनी दिली.

ओतूर वनविभागाकडून रविवारी रात्री बिबट्याच्या हल्यात बारा वर्षीय परप्रांतीय मुलगा ठार झाल्याच्या पाश्र्वभूमीवर वनविभागाकडून सोमवारी या परीसरातील एकूण या सहा पिंजरे लावण्यात आले होते.

तसेच रात्री बिबट्याची हालचाल टिपण्यासाठी थम्रल ड्रोन चा ही वापर करण्यात आला होता.याच पाश्र्वभूमीवर मंगळवारी पहाटे जेथे बिबट्याचा हल्ला झाला होता तेथे जवळच लावलेल्या एका पिंजर्‍यात बिबट जेरबंद झाला आहे.मात्र हाच तो नरभक्षक बिबट आहे का याबाबत खात्री लायक माहिती सांगणे कठीण असल्याचे वनविभागाच्या सूत्राकडून सांगण्यात आले.

सदर जेरबंद बिबट सुखरूप माणिकडोह बिबट निवारण केंद्रात दाखल करण्यात आले असून हा बिबट नर असून अंदाजे सहा ते सात वर्ष वयाचा आहे. (Latest Marathi News)

ओतूर वनविभागाकडून सदर बिबट जेरबंद करण्यासाठीच्या सर्व उपाययोजना सहायक वनसंरक्षक अमित भिसे यांचे मार्गदर्शनाखाली वनपरीक्षेत्र अधिकार व्ही.एम.काकडे,वनपाल रविंद्र गवांदे,संतोष साळूखे ,रूपाली जगताप,

मनिषा काळे,वनरक्षक पी.के.खोकले, के.एस. खरोड़े, व्ही.एन.वाजे वनकर्मचारी फुलचंद खंडागळे, साहेबराव पारधी यानी व इतर वनकर्मचार्यानी राबवली आहे. (Marathi Tajya Batmya)

सदर बिबट्या हा नरभक्षक आहे की नाही याबाबत त्याच्या डी एन ए च्या तपासण्या प्रयोग शाळेत करून अहवाल आल्यानंतर खात्रीलायक माहिती देता येईल,तसेच वनविभागाकडून रात्रीची गस्त,थम्रल ड्रोन पहाणी व जनजागृती मोहीम प्रभावी पणे राबवतच राहणार असल्याची माहिती ओतूरचे वनपरिक्षेत्र अधिकार वैभव काकडे यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Plane Cancel : आखाताकडे जाणारी तीन विमाने पुण्यातून रद्द

Latest Marathi News Live Update : ४ कोटींहून अधिक किमतीचा मुद्देमाल मूळ मालकांना परत

CIDCO Lottery: नवी मुंबईत घर घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सिडकोने गृहनिर्माण योजनेची अंतिम मुदत; आता शेवटची तारीख काय?

Horoscope : नवा महिना, नवा राजयोग! उद्या 1 मार्चपासून पुढचे 4 दिवस 'या' 4 राशीच्या लोकांसाठी लकी, होणार धनलाभ

Indian Embassy in Kuwait Issues Urgent Advisory : युद्ध परिस्थितीमुळे कुवेतमधील भारतीय दूतावासाने जारी केली तातडीची सूचना, म्हटले...

SCROLL FOR NEXT