corona.jpg 
पुणे

पुणेकरांनो, मृत्यूचा 'हा' आकडा पाहा आणि आतातरी काळजी घ्या!

सकाळवृत्तसेवा

पुणे : शहरात गेल्या नऊ दिवसांमध्ये कोरोना विषाणूंचा संसर्ग झालेल्या 120 जणांचा मृत्यू झाला. आतापर्यंत साठी ओलांडलेल्यां आणि इतर आजारांच्या रुग्ण कोरोनामुळे मृत्यूमुखी पडत असल्याचे दिसत होते. पण, आता नऊ दिवसांमध्ये वयाच्या तिशी-चाळीशीचे रुग्णांचे प्राण कोरोना घेत असल्याचे निरीक्षण वैद्यकीय तज्ज्ञांनी नोंदविले. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

शहरात कोरोनाचा पहिला मृत्यू 30 मार्चला झाला. त्यानंतर 92 दिवसांमध्ये 613 रुग्ण कोरोनामुळे मृत्यू झाल्याची नोंद महापालिकेत झाली. पण, यापैकी 120 (20 टक्के) मृत्यू हे गेल्या नऊ दिवसांमधील असल्याचे महापालिकेच्या आरोग्य खात्याने दिलेल्या माहितीवरून स्पष्ट होते. 

पुण्याचा मृत्यूदर 3.80 टक्के- प्रत्येक शंभर कोरोनाबाधीतांपैकी चार रुग्णांचा पुण्यात मृत्यू होत आहे. गेल्या काही दिवसांपर्यंत मृत्यू होणाऱया कोरोनाबाधीत रुग्णाचे वय हा उपचारातील मोठा अडथळा असल्याचे दिसत होते. कारण, बहुतांश रुग्ण हे वयाची साठी ओलांडलेले असायचे. वयापाठोपाठ मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयविकार अशा आजारांमुळे उपचारातील गुंतागुंत वाढायची. त्यामुळे मृत्युमूखी पडणाऱया रुग्णांमध्ये वय आणि इतर आजाराच्या रुग्णांचे प्रमाण सर्वाधिक असल्याचे दिसून येते. पण, गेल्या काही दिवसांपासून वयाची तिशी-चाळीशीतील रुग्णांचा मृत्यू महापालिकेत नोंदले गेले. त्यापैकी बहुतांश जणांना इतर कोणतेही आजार नव्हते. त्यांचा मृत्यू कोरोनामुळे झाला, अशी नोंदही झाली. अशा रुग्णांमुळे आता पुण्यातील कोरोनाच्या मृत्यूचा आकडा सहाशेच्या पुढे गेला आहे.

पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दररोज सरासरी 466 रुग्णांचे निदान- पुण्यात गेल्या दहा दिवसांमध्ये चार हजार 660 रुग्णांना कोरोनाचे निदान झाले आहे. त्यामुळे दररोज सरासरी 466 रुग्णांना कोरोनाचा झाल्याचे शहरातील वेगवेगळ्या प्रयोगशाळांमधून निदान झाल्याचे स्पष्ट होते. 

दहा दिवसांमध्ये 77 टक्के रुग्ण वाढले- शहरात सध्या सहा हजार 65 रुग्णांवर उपचार करण्यात येत आहे. त्यापैकी 77 टक्के (4660) कोरोनाबाधीतांचे निदान गेल्या दहा दिवसांमध्ये झाल्याचे महापालिकेने दिलेल्या माहितीवरून स्पष्ट होते. 

रुग्ण वाढीची कारणे
- मोठ्या संख्येने पुणेकर घराच्या बाहेर पडले
-अनलॉकच्या पहिल्या टप्प्यात पुणेकरांनी रस्त्यावर गर्दी केली
-महापालिकेने कोरोनानिदानाच्या चाचण्यांमध्ये वाढ केली
-त्यामुळे पॉझिटीव्ह येण्याचे प्रमाण वाढले
-संसर्गाची तीव्रता जास्त असल्याने दाट लोकवस्तीत रुग्णांची संख्या वाढली

इतर आजार असलेल्या कोनोबाधीत रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण सर्वाधिक आहे. सुमारे 15 टक्के रुग्णांना इतर कोणतेही आजार नव्हते. त्यांचा मृत्यू कोरोना विषाणूंच्या संसर्गामुळे झाला,”
-डॉ. संजीव वावरे, सहायक आरोग्य अधिकारी, पुणे महापालिका.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India Selection : रिषभ पंतला वन डे संघात स्थान नाही, पण मिळाले कर्णधारपद; Asian Games साठीच्या संघातही दोन बदल, भन्नाट टीम्स

MPSC Paper Leak : एमपीएससी अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी; अभिजीत दिपकेंचं उमेदवारांना आंदोलनाचं आवाहन

Umarga News : उमरगा सामाजिक वनीकरण विभागात भ्रष्टाचाराचा आरोप; कारवाईत दिरंगाईमुळे युवासेनेकडून वनरक्षकावर शाईफेक

India Squad for WI Series: हार्दिक पांड्या संघाबाहेरच, जसप्रीत बुमराहचेही नाव गायब; ऋतुराज गायकवाडची वापसी, तर एक सप्राईज पॅकेज, जाणून घ्या भन्नाट टीम इंडिया

Censor Board: केंद्राकडून सेन्सॉर बोर्डाची फेररचना! १८ सदस्यांची निवड; निशिगंधा वाड, वामन केंद्रे, मनोज जोशींचा समावेश

SCROLL FOR NEXT