Khadakwasala Dam Sakal
पुणे

Water Quota : पुण्यासाठी केवळ १२.८२ टीएमसी पाणी कोटा मंजूर

पुणे शहराची वाढणारी हद्द, लोकसंख्या याचा विचार करून पुणेकरांना वर्षाला २०.९० टीएमसी पाणी मिळावे अशी मागणी महापालिकेने पाटबंधारे विभागाकडे केलेली होती.

​ ब्रिजमोहन पाटील

पुणे - शहराची वाढणारी हद्द, लोकसंख्या याचा विचार करून पुणेकरांना वर्षाला २०.९० टीएमसी पाणी मिळावे अशी मागणी महापालिकेने पाटबंधारे विभागाकडे केलेली होती. त्यास ठेंगा दाखवत पाटबंधारे विभागाने खडकवासला आणि भामा आसखेड धरण प्रकल्पातून केवळ १२.८२ टीएमसी पाणी साठा २०२३-२४ या वर्षासाठी मान्य केला आहे. त्यामुळे यापेक्षा जास्त पाणी वापरल्यास महापालिकेला तीन पट दंडाचा भूर्दंड सहन करावा लागणार आहे. पाटबंधारे विभागाने यासंदर्भात आदेश काढले आहेत.

राज्य जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाच्या निर्देशानुसार महापालिकेला दरवर्षी जुलै महिन्याच्या अखेरपर्यंत पाटबंधारे विभागाला पाण्याचे अंदाजपत्रक सादर करावे लागते. २०२२-२३ या वर्षी महापालिकेने २०.३४ टीएमसी पाण्याची मागणी केली असताना पाटबंधारे विभागाने १२.४१ टीएमसी पाणी कोटा उपलब्ध करून दिला होता. त्यानंतर महापालिकेने २०२३-२४ या वर्षासाठी अंदाजपत्रक सादर केले.

यामध्ये महापालिकेत समाविष्ट झालेल्या ३४ गावांची दोन टक्के वाढलेली लोकसंख्या, पुण्यात नोकरी, व्यवसाय, शिक्षणासाठी रोज ये जा करणारे नागरिक अशी एकूण ७२ लाख लोकसंख्येला पाणी द्यावे लागणार आहे. तसेच ३५ टक्के पाणी गळतीचा याचा विचार करून २०.९० टीएमसी कोटा मंजूर करावी अशी मागणी महापालिकेने केली होती.

महापालिकेच्या पाणी वापराचा दावा पाटबंधारेने खोडून काढत १२.८२ टीएमसी पाणी कोटा १ जुलै २०२३ ते ३० जून २०२४ या कालावधीसाठी मान्य केला आहे. यामध्ये महापालिकेने ३४ समाविष्ट गावे आणि १६ संस्थांची लोकसंख्या १० लाख गृहित धरून त्यासाठी २.३६ टीएमसी पाणी कोटा मागितला होता. पण पाटबंधारे विभागाने ही मागणी नाकारत या गावांना आणि संस्थांना आम्ही पाणी देत आहोत असे स्पष्ट केले आहे.

तसेच महापालिकेने ३५ टक्के म्हणजे ७.१३ टीएमसी पाणी गळती होत असल्याचे नमूद केले होते. पण पाटबंधारे विभागाने ही गळती केवळ १३ टक्के गृहीत धरून त्यासाठी १.४७ टीएमसी इतकी धरली आहे. त्यामुळे महापालिकेने मागणी केलेल्या कोट्यापेक्षा १२.८२ टीएमसी इतके पाणी महापालिकेला मिळाले आहे.

गेल्यावर्षी केवळ ०.४१ टीएमसी पाणी जास्त

महापालिकेला गेल्यावर्षी २०.३४ टीएमसी पाणी मागितले होते, त्यापैकी १२.४१ टीएमसी पाणी कोटा मंजूर झाला होता. यंदा २०.९० टीएमसी पाणी मागितलेले असताना १२.८२ टीएमसी पाणी मिळाले आहे. गेल्यावर्षी तुलनेत केवळ ०.४१ टीएमसी पाणी जास्त मंजूर झाले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin News : रस्त्याच्या कामावरून वाद; लोखंडी रॉडने मारहाण करणारे तिघे अहिल्यानगर हद्दीजवळून ताब्यात...

Dog Bite : पिसाळलेल्या कुत्र्याचा धुमाकूळ; आळे परिसरातील बारा जणांचा घेतला चावा; नऊ जण गंभीर

Pune News : राज्यातील ऑनलाइन कामकाज ठप्प; कृषी कर्मचाऱ्यांनी लॅपटॉप जमा केले, आंदोलन तीव्र

Vastu Tips: घरात क्रिस्टल पिरामिड ठेवल्यावर काय होते? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या योग्य दिशा, फायदे अन् महत्त्वाचे नियम...

FDA Watch : प्रसादवाटप करणाऱ्या मंडळांना ‘एफडीए’ची नोंदणी बंधनकारक; प्रसादावर ‘एफडीए’ची नजर

SCROLL FOR NEXT