129 more villages in Pune district will be Hagandari free sakal
पुणे

पुणे जिल्ह्यातील 129 गावे हागणदारी मुक्त अधिक होणार

पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांची माहिती

नवनाथ भेके

निरगुडसर - स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्त येत्या स्वातंत्र्य दिनी पुणे जिल्ह्यातील 129 गावे हागणदारी मुक्त अधिक होणार असल्याची माहिती पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी दिली आहे.

जिल्ह्यात स्वच्छ भारत मिशन (ग्रा) टप्पा दोनची प्रभावी अंमलबजावणी सुरू असून या अभियान अंतर्गत वैयक्तिक सार्वजनिक व संस्थात्मक शौचालयाची सुविधा उपलब्ध करून गाव स्तरावर घनकचरा सांडपाणी व्यवस्थापन करून गावे हागणदारी मुक्त अधिक घोषित करण्यात येतात. त्यानुसार जिल्ह्यात घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाचे काम मोहीम स्वरूपात सुरू करून कामे पूर्ण झालेले आहेत. तसेच सांडपाणी व्यवस्थापन अंतर्गत कुटुंब व सार्वजनिक ठिकाणी शोषखड्डे मनरेगा अंतर्गत बांधलेले आहे.

हागणदारी मुक्त अधिक निकषांची पूर्तता होत असलेल्या 13 तालुक्यातील 129 गावांची निवड करून येत्या स्वातंत्र्यदिनी गावे हागणदारी मुक्त अधिक घोषित करण्यात येत आहे. यापूर्वी सन 2021 22 मध्ये जिल्ह्यातील 315 गावे हागणदारी मुक्त अधिक घोषित करण्यात आलेले आहेत. जिल्ह्यातील उर्वरित सर्व गावे मार्च २३ पर्यंत हागणदारी मुक्त अधिक घोषित करण्यात येणार आहे. याकरिता गाव स्तरावर ज्या कुटुंबांकडे वैयक्तिक शौचालय नाही अशा कुटुंबांना शौचालयाची सुविधा उपलब्ध करून देणे. गावातील सर्व संस्थात्मक ठिकाणी शौचालयाची सुविधा निर्माण करणे. सर्व शाळा अंगणवाडी येथे शौचालयाची उभारणी करून वापरात आणणे तसेच गाव स्तरावर घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प पूर्ण करून सांडपाणी व्यवस्थापन अंतर्गत शोषखड्डा व इतर कामे पूर्ण करून आपले गावे हागणदारीमुक्त अधिक करावयाचे आहे.

हागणदारीमुक्त अधिकच्या निकषांची पूर्तता संबंधित गावांनी करून घ्यावे व ग्रामसभेमध्ये याबाबत विषयावर चर्चा करून ठराव करावे. असे आवाहन पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी जिल्ह्यातील सर्व गावांना केले आहे.

स्वातंत्र्यदिनी हागणदारी मुक्त अधिक घोषित करायचे तालुकानिहाय गाव संख्या

आंबेगाव : 00

बारामती : 10

भोर. : 10

दौंड. : 10

हवेली. : 10

इंदापूर : 10

जुन्नर : 12

खेड : 14

मावळ : 10

मुळशी : 10

पुरंदर : 10

शिरूर : 15

वेल्हा : 08

एकूण. : 129

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

D-Mart ची ऑफर खरी वाटली, पण अभिनेत्याला कळलंच नाही अन् खातं रिकामं झालं, वाचा नाहीतर तुमचा खिसाही होईल रिकामा

CM Yogi Adityanath: गोरखपूरला नव्या ओव्हरब्रिजची भेट! १३७.८३ कोटींच्या प्रकल्पाचे लोकार्पण; सीएम योगींचा विरोधकांवर घणाघात

Parbhani News: शेती गमावण्याचा धक्का! दारू पाजून फसवणूक केल्याच्या तणावातून शेतकऱ्याने संपवले जीवन

मध्यरात्री Epstein Files केल्या जारी; १२०० पीडित मुली, ३५०० फाइल्स, हजारो फोटो, DVD आणि कागदपत्रं

Shashikant Shinde : अजित पवारांकडून अद्याप प्रस्ताव नाही; आघाडीबाबत पक्षात दोन मतप्रवाह असल्याचे स्पष्टीकरण

SCROLL FOR NEXT