12th Exam Result  Sakal
पुणे

12th Exam Result : बारावीच्या निकालात पराक्रम! पुण्याच्या पठ्ठ्याला मिळाले 15%; मित्रांनी ठेवला स्टेट्स

या निकालाचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

सकाळ डिजिटल टीम

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने आज बारावीचा निकाल जाहीर केला. त्यामध्ये अनेक विद्यार्थी नापास झाले असून ९१.२५ टक्के विद्यार्थी पास झाले आहेत. तर अनेकांना पडलेले मार्क पाहून आपल्यालाही धक्का बसेल. सध्या असाच एक निकाल सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

पुणे विभागातील हा विद्यार्थी असून त्याला केवळ १५.३३% एवढे सरासरी मार्क मिळाले आहेत. इंग्रजी विषयात ९ मार्क, मराठी विषयात २५ मार्क, हिंदीमध्ये २० मार्क, इतिहास विषयात २२ मार्क, राज्य शास्त्र या विषयामध्ये १३ मार्क आणि अर्थशास्त्र या विषयामध्ये अवघे ३ मार्क या विद्यार्थ्याला मिळाले आहेत.

१२ वीचा निकाल लागल्यानंतर त्याच्या मित्र मंडळींनी त्याच्या निकालाचा हा फोटो सोशल मीडियावर स्टेटस ला ठेवला आहे. त्याला अनेक मित्रांकडून पाठिंबा देण्यात येत आहे तर त्याचे अनेक मित्रांनी अभिनंदनही केले आहे.

12th Exam Result

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने फेब्रुवारी- मार्च २०२३ मध्ये घेतलेल्या बारावीच्या परीक्षेत १४लाख १६ हजार ३७१ विद्यार्थ्यांपैकी ९१.२५ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. राज्यात कोकण विभागातील ९६.०१ टक्के असे सर्वाधिक विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. तर मुंबई विभागाचा ८८.१३ टक्के असा सर्वात कमी आहे. पुणे विभागातील उत्तीर्ण विद्यार्थ्यांची टक्केवारी ९३.३४ टक्के इतकी आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Airport: पुणे विमानतळाचा नवा विक्रम! एका दिवसात २१६ विमानांची वाहतूक; ३३ हजार प्रवाशांचा टप्पा पार

Timber Smuggling: गडचिरोलीत वनविभागाची मोठी कारवाई; ६० लाखांचे अवैध सागवान जप्त

Latest Marathi News Live Update : राज्यात आज कोकणासह घाटमाथ्यावर जोरदार पावसाची शक्यता; IMD कडून यलो अलर्ट जारी

Krishna River Water Level : कोयना धरणातून 33 हजारांवर विसर्ग; कृष्णा नदीने ओलांडली 30 फुटांची पातळी, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा!

NMC MBBS Admission: दिव्यांग विद्यार्थ्यांचे डॉक्टर होण्याचे स्वप्न होणार साकार; एमबीबीएस प्रवेशासाठी एनएमसीची नवी मार्गदर्शक तत्त्वे दिव्यांगत्वच्या टक्केवारीऐवजी क्षमता आणि कार्यक्षमतेला महत्त्व

SCROLL FOR NEXT