13 years girl student raped by unknown person in pune 
पुणे

पुणे हादरलं! नामांकीत शाळेत अल्पवयीन विद्यार्थिनीवर बलात्कार

या घटनेमुळे नागरिकांतून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

सकाळ डिजिटल टीम

पुणे - पुण्यातील एका नामांकित शाळेत विद्यार्थिनीवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेने शहरात खळबळ पसरली आहे. शहरातील एका नामांकित शाळेत अज्ञात माथेफिरूने १३ वर्षाच्या अल्पवयीन विद्यार्थिनीवर बलात्कार केला आहे. या घटनेमुळे नागरिकांतून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. या घटनेचा पुढील तपास पोलिस करत आहेत.

घडलेली घटना अशी, पुण्यातील एका नामांकित शाळेत अज्ञात माथेफिरूने ११ वर्षाच्या शालेय विद्यार्थिनीवर अत्याचार केला आहे. त्यामुळे संपूर्ण शहर हादरलं आहे. या शालेय विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार घडल्याची घटना बुधवारी घडली आहे. पीडित मुलीला ओळख असल्याचा बहाणा करून ढकलत शाळेतील बाथरूम नेत तिच्यावर अत्याचार केला आहे. या प्रकरणी संबंधित नराधमावर पुण्यातील शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.

दरम्यान, या धक्कादायक घटनेनंतर पुन्हा एकदा महिला सुरक्षा हा मुद्दा ऐरणीवर आला आहे. पुण्यात महिला अत्याचारच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. ही चिंतेची बाब आहे. या घटनेसंदर्भात नागरिक संताप व्यक्त करत असून पोलिस पुढील तपास करत आहेत.

एका अल्पवयीन विद्यार्थिनीवर शाळेच्या स्वच्छतागृहात अज्ञात व्यक्तीकडून बलात्कार झाल्याच्या घटनेने पुणे शहरात खळबळ उडाली. दरम्यान पोलिसांकडून या प्रकरणी संशयित व्यक्तीचे रेखाचित्र जारी करण्यात आले आहे. ओळख असल्याचा बहाणा करून या अज्ञात व्यक्तीने पीडित विद्यार्थिनीला ढकलत बाथरूममध्ये नेऊन तिच्यावर बलात्कार केला. या प्रकारानंतर या मुलीने आपल्या मैत्रिणीला हा सर्व प्रकार सांगितला. त्यानंतर त्यांनी शाळेतील शिक्षिकांच्या कानावर ही घटना घातली. मुलीच्या आईला व पोलिसांना बोलावून याची माहिती दिली. दरम्यान या आरोपीच रेखा चित्र तयार करण्यात आले असून पोलिस शोध घेत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Koregaon Bank Election 2026 : कोरेगाव मतदारसंघात पुन्हा ईश्वर चिठ्ठीचा योगायोग; पाच वर्षांनंतर इतिहासाची पुनरावृत्ती! 2021 मध्ये खत्री चिठ्ठीवर विजयी, तर 2026 मध्ये मानेंना नशिबाची साथ

Shambhuraj Desai Satara Bank Election Victory : सातारा जिल्हा बँकेत घडला इतिहास! स्व. शिवाजीराव देसाईंनंतर 45 वर्षांनी देसाई घराण्याची दमदार एन्ट्री; पालकमंत्र्यांचा उर आला भरुन

IND vs NZ, ODI: रोहित शर्मा न्यूझीलंडमध्ये घडवणार इतिहास? विश्वविक्रमांसह ७ मोठे पराक्रम करण्याची संधी

Latest Marathi News Live Update : भाजपमध्ये मोठे फेरबदल होण्याचे संकेत

Mhada House: फक्त २० लाखांत म्हाडा देणार १,४०० घरे, प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत कोकण मंडळाचा पुढाकार

SCROLL FOR NEXT