Pune Municipal Sakal
पुणे

पुणे : पहिल्यांदा १३२ कोटींची क्रेडिट नोट

पुण्यात एक उड्डाणपूल आणि आठ रस्त्यांची उभारणी करणार

सकाळ वृत्तसेवा

पुणे : शहरातील खराडी भागातील विकास आराखड्यातील आठ रस्ते आणि मुंढवा येथे नदीवर पूल खासगी भागीदार तत्त्वावर (पीपीपी) आणि क्रेडिट नोटच्या मोबदल्यात विकसित करण्याची प्रक्रिया महापालिकेने सुरू केली आहे. महापालिकेने पहिल्यांदा १३२ कोटी रुपये किमतीच्या क्रेडिट नोटचा वापर करून रस्ते विकसन करण्याचे काम हाती घेतले आहे. (132 crore credit note for the first time pune corporation)

विकास आराखड्यातील रस्ते आणि आरक्षणे महापालिकेकडून विकसित केले जातात. परंतु, यंदा प्रथमच महापालिकेच्या अर्थसंकल्पात क्रेडिट नोटच्या माध्यमातून हे रस्ते विकसित करण्याची तरतूद केली आहे. त्यानुसार महापालिका प्रशासनाने या क्रेडिट नोटच्या मोबदल्यात खराडी परिसरातील विकास आराखड्यातील सुमारे १०१ कोटी २४ लाख रुपये किमतीचे आठ रस्ते विकसित करण्याची, तसेच मुंढवा ते खराडी भागाला जोडण्यासाठी मुळा-मुठा नदीवर २४ मीटर रुंदीचा २३ कोटी रुपये खर्च करून क्रेडिट नोटच्या मोबदल्यात पूल उभारण्याच्या कामासाठी निविदा मागविल्या आहेत.

महापालिकेने यापूर्वी २०११-१२ मध्ये मुंढवा आणि खराडी येथील रस्ते क्रेडिट नोटच्या माध्यमातून विकसित केले होते. त्यानंतर प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणावर खासगी भागीदाराच्या तत्त्वावर आणि क्रेडिट नोटच्या मोबदल्यात रस्ते विकसन आणि पूल उभारण्याच्या कामाची निविदा काढली आहे.

डेव्हलपमेंट क्रेडिट नोट म्हणजे काय

  • रस्ते विकसकास बिलाऐवजी तेवढ्या रकमेची क्रेडिट नोट देणार

  • ती टप्याटप्प्याने देण्याची सुविधा

  • जमीन विकसन शुल्क, पेड एफएसआय शुल्क, आयटी प्रिमिअम शुल्क भरण्यासाठी या क्रेडिट नोटचा वापर करता येणार

  • तसेच विविध प्रकाराचे महापालिकेचे शुल्क भरण्यासाठी ही नोट वापरता येणार

  • एका आर्थिक वर्षात जास्त जास्त २०० कोटीची मर्यादा

  • पाच वर्षापर्यंत क्रेडिट नोट वापरता येणार

"पुणे महापालिकेच्या अर्थसंकल्पात खासगी भागीदारी तत्त्वावर आणि क्रेडिट नोटच्या माध्यमातून शहरातील २१ रस्ते विकसनाची तरतूद केली आहे. त्याबाबतचे धोरणही यापूर्वीच निश्‍चित केले आहे. पहिल्या टप्प्यात आठ रस्ते आणि एका पुलाची निविदा काढली आहे," अशी माहिती स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Kisan 24th Installment 2026 : पीएम किसान योजनेच्या 24 व्या हप्ताची प्रतीक्षा संपली! 30 ऑक्टोबरला जमा होणार 2000 रुपये? खात्यात पैसे येण्यापूर्वी लगेच करा 'हे' काम

KBC Marathi: तू चूक मान्य केलीस म्हटल्यावर... गौतमी पाटीलने माधुरी दीक्षित समोर दिली त्या गोष्टीची कबुली; अभिनेत्री म्हणाली-

IND vs NZ 2nd T20I Live: वैभव सूर्यवंशीचा वर्ल्ड रेकॉर्ड! न्यूझीलंडमध्ये मोडला सचिन तेंडुलकरचा विक्रम, बांगलादेशी-पाकिस्तानी गार...

Latest Marathi News Live Update : ऑडिओ क्लिप आरोपावर मनोज जरांगे यांची रामदास कदमांवर टीका

Venus Transit Astrology : शुक्राचे 'चित्रा' नक्षत्रात आगमन; मेषसह 4 राशींच्या आयुष्यात होणार धनवर्षाव, करिअरमध्येही मोठी प्रगती

SCROLL FOR NEXT