Biomedical waste
Biomedical waste Sakal
पुणे

राज्यातील जैववैद्यकीय कचऱ्यात १३३ पटींनी वाढ

अक्षता पवार

कोरोनामुळे राज्यातील जैववैद्यकीय कचऱ्यात तब्बल १३३ पटींची वाढ नोंदवली गेली आहे. कोरोनापुर्वी वर्ष २०१९-२० च्या तुलनेत २०२०-२१ मध्ये ही वाढ आहे.

पुणे - कोरोनामुळे (Corona) राज्यातील जैववैद्यकीय कचऱ्यात (Biomedical Waste) तब्बल १३३ पटींची वाढ (Increase) नोंदवली गेली आहे. कोरोनापुर्वी वर्ष २०१९-२० च्या तुलनेत २०२०-२१ मध्ये ही वाढ आहे. विशेष म्हणजे देशात सर्वाधिक जैववैद्यकीय कचऱ्याची वाढ ही महाराष्ट्रात (Maharashtra) नोंदली गेली आहे.

‘सेंटर फॉर सायन्स अँड एन्व्हायर्न्मेंट (सीएसई) या संस्थेद्वारे प्रकाशित करण्यात आलेल्या अहवालातून देशातील केंद्रशासित प्रदेश व राज्यांमध्ये निर्माण होणाऱ्या जैववैद्यकीय कचऱ्याची स्थिती स्पष्ट होत आहे. त्यानुसार कोरोनानंतर जैववैद्यकीय कचऱ्याचेही वर्गीकरण करण्यात आले असून, सामान्य आणि कोविड-१९ अशा प्रकारे हा जैववैद्यकीय कचरा संकलित केला जात आहे. यामध्ये २०१९-२० दरम्यान राज्यात ६२.३ टन इतका सामान्य जैववैद्यकीय कचरा निर्माण झाला होता, तर २०२०-२१ या कालावधीत राज्यात ८३०० टनांहून अधिक कोविड-१९ जैववैद्यकीय कचऱ्याची निर्मिती झाली. जैववैद्यकीय कचरा व्यवस्थापनासाठी राज्यात इनसिनिरेशन, ऑटोक्लेव्ह आणि श्रेडिंग सारख्या प्रक्रियेचा वापर केला जातो. या कचऱ्यामुळे होणारा धोका टाळण्यासाठी कचऱ्याचे योग्य पद्धतीने व्यवस्थापन करणे आवश्‍यक आहे. यासाठी जैववैद्यकीय कचरा व्यवस्थापन सुविधा वाढविणे गरजेचे असल्याचेही या अहवालात नमूद करण्यात आले आहे.

पुण्यातही अशा प्रकारच्या जैववैद्यकीय कचऱ्‍यावरील प्रक्रियेसाठी प्रकल्प तयार करण्यात आला असून पुढील महिन्यात हे प्रकल्प सुरू होण्याची शक्यता आहे. यामुळे पुढील दहा वर्षे शहरात दररोज सुमारे २० टन जैववैद्यकीय कचऱ्यावर प्रक्रिया करणे शक्य होणार आहे.

महत्त्वाच्या बाबी...

  • देशातील जैववैद्यकीय कचऱ्याची स्थिती पाहता, सामान्य जैववैद्यकीय कचऱ्याच्या १०० पटीहून अधिक कोविड-१९ जैववैद्यकीय कचऱ्याची निर्मिती.

  • ईशान्येकडील राज्यांमध्ये जैववैद्यकीय कचरा व्यवस्थापनासाठी पायाभूत सुविधांची कमतरता

  • देशातील सुमारे ५० टक्के आरोग्य सुविधा अनधिकृत असल्याने त्या ठिकाणी निर्माण होणाऱ्या जैववैद्यकीय कचऱ्याची कोणत्याही प्रकारची नोंद होत नाही.

  • देशात दररोज १० ते ५० कोटी मास्कचा कचरा तयार होतो.

कचरा व्यवस्थापनासाठी सर्वाधिक सुविधा

महाराष्ट्र आणि कर्नाटक या राज्यांमध्ये जैववैद्यकीय कचऱ्याच्या शास्त्रीय व्यवस्थापनासाठी सर्वाधिक सुविधा आहेत. या दोन्ही राज्यांमध्ये एकूण देशातील २५ टक्के जैववैद्यकीय व्यवस्थापन सुविधा उपलब्ध आहेत. यासाठी लागणाऱ्या ‘ऑटोक्लेव्ह’ आणि ‘इनसिनिरेशन’ या मशिन्स या राज्यांमध्ये जास्त आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dombivli MIDC Blast : डोंबिवली एमआयडीसी कंपनीत भीषण स्फोटात आत्तापर्यंत 8 जणांचा मृत्यू, 64 जखमी, संख्या वाढण्याची भीती

Lok Sabha Election 2024 : सहाव्या टप्प्यातीलप्रचार थंडावला! देशातील ५७ मतदारसंघांत शनिवारी मतदान

Pune Porsche Accident : अपघातानंतर पळून जाण्याचे कारण काय? विशाल अग्रवाल यांची पोलिसांकडून कसून चौकशी

Dombivli MIDC Blast : डोंबिवली MIDC दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना ५ लाखांची मदत; CM एकनाथ शिंदेंची घोषणा

Pune Porsche Accident: '...तर तुला मारून टाकेन'; कल्याणीनगर अपघातातील आरोपीच्या आजोबाचं आणखी एक अंडरवर्ल्ड कनेक्शन आलं पुढे

SCROLL FOR NEXT