PMC Pune  
पुणे

सिंहगड रस्त्यावर उड्डाणपुलासाठी १३५ कोटींची तरतूद

कामासाठी ३६ ते ३८ महिने लागणार

सकाळ वृत्तसेवा

पुणे : सिंहगड रस्त्यावर उभारण्यात येणाऱ्या उड्डाणपुलासाठी अर्थसंकल्पात १३५ कोटी रुपयांची तरतूद करण्यास मंगळवारी स्थायी समितीने मान्यता दिली. पुलाच्या कामासाठी ३६ ते ३८ महिने लागणार आहेत, अशी माहिती स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने यांनी दिली.

पालकमंत्री अजित पवार यांनी महामेट्रोला खडकवासला ते स्वारगेट दरम्यान मेट्रो प्रकल्पाचा आराखडा तयार करण्याचा सूचना दिल्या आहेत. मेट्रोकडून तसा प्रस्ताव तयार करण्यात येत आहे. भविष्यात होणाऱ्या या रस्त्यावरील मेट्रो मार्गाला उड्डाणपुलाचा अडथळा होऊ नये, अशा दृष्टीने या पुलाचे नियोजन करण्यात येणार असल्याचे रासने यांनी सांगितले.

दरम्यान, माहिती-तंत्रज्ञानाचा उपयोग महापालिकेच्या कारभारात करून घेण्यासाठी राज्य सरकारच्या आदेशावरून दर महिना सहा रुपये खर्च करून दोन सल्लागार नेमण्याच्या प्रस्तावाला देखील समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.

ही कामे होणार

  • २१२० मीटरचा पूल उभारण्यात येणार

  • उड्डाणपुलाला जोडणारे काही पूल बांधण्यात येणार

  • यामध्ये राजाराम पूल चौकामध्ये स्वारगेटकडे जाणाऱ्या वाहनांसाठी ४९५ मीटरचा पूल

  • इंडियन ह्यूम ते इनामदार चौक या पुलाची लांबी १५४० मीटर असणार

यासाठी उड्डाणपूल

सिंहगड रस्त्यावरील धायरी, वडगाव, नऱ्हे, नांदेड, खडकवासला या भागांचा झपाट्याने विकास होत आहे. त्यामुळे या भागातील वाहतुकीचा प्रश्न निर्माण झाला आहे. या रस्त्याला पर्यायी मोठा रस्ता नसल्यामुळे उड्डाणपुलाचे काम हाती घेण्यात येणार आहे.

''शिवणे व उत्तमनगर या गावाची पाणीपट्टी माफ करणे, रामटेकडी येथील सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाची देखभाल-दुरुस्ती करणे, डॉ. नायडू हॉस्पिटल येथे ऑक्सिजन प्लांट उभारणी आदी प्रस्तावांना समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.''

- हेमंत रासने, अध्यक्ष, स्थायी समिती, पुणे महापालिका

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs NZ: प्रयोग थांबणार अन् न्यूझीलंडविरुद्धच दिसणार भारताची World Cup ची संभावित प्लेइंग-११? कर्णधार शुभमन गिलचे संकेत

France Student Protests : फ्रान्समधील विद्यार्थी आंदोलनाला हिंसक वळण; ४ हजार जणांना अटक, २०० जण जखमी

विद्युत खांबावरील स्पार्किंगमुळे आग; ४ एकर ऊस, सोलार व ठिबकचे साहित्य जळून खाक, शेतकरी उद्ध्वस्त

Irani Cup 2026: रिषभ पंतच्या नेतृत्वातील संघ ठरला चॅम्पियन! फायनलमध्ये रणजी ट्रॉफी विजेत्यांना केलं पराभूत

भाकरीसोबत तोंडाला पाणी आणणारी गोळ्याची आमटी; पाहा खानदेशी पद्धतीची रेसिपी; GOLYACHI AAMTI RECIPE

SCROLL FOR NEXT